सध्या बाजारात वैविध्यपूर्ण फीचर्स असलेले बिअर्ड ट्रिमर (Beard Trimmer) उपलब्ध आहेत. स्टायलिश आणि झटकन दाढी करण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या बिअर्ड ट्रिमर्सना मागणीदेखील मोठी आहे. बाजारात साधारणपणे 800 रुपयांपासून ट्रिमर्स उपलब्ध आहेत. फीचर्सनुसार प्रत्येक ट्रिमरची किंमत वेगवेगळी आहे. एचटीसी, फिलिप्स, नोव्हा, नोयमी आदी कंपन्यांच्या ट्रिमर्सना प्रामुख्यानं युवा वर्गाकडून पसंती मिळताना दिसते. त्यातच आता शाओमी (Xiaomi) या चिनी कंपनीनं वैशिष्ट्यपूर्ण आणि भरपूर फीचर्स असलेलं ट्रिमर (Xiaomi new trimmer features) लॉंच केलं आहे. यासह अन्य कंपन्यांच्या ट्रिमर्सच्या फीचर्सविषयीची माहिती `जनसत्ता`ने दिली आहे.
2019 मध्ये एमआयनं (Mi) बिअर्ड ट्रिमर लॉंच केलं होतं. या माध्यमातून कंपनीनं ग्रुमिंग श्रेणीत प्रवेश केला होता. सध्या बाजारात 2000 रुपयांदरम्यान चांगले ट्रिमर्स उपलब्ध आहेत. हे ट्रिमर्स 2 तासांपर्यंत चालू (रनटाइम) शकतात. नोयमीचा टू इन वन इलेक्ट्रिक ट्रिमर आणि शेव्हर सध्या बाजारात उपलब्ध आहे. हा ट्रिमर 90 मिनिटं चालू शकतो. विशेष म्हणजे हा ट्रिमर वॉटरप्रूफ (Waterproof) आहे. याची मूळ किंमत 2999 रुपये असली तरी सध्या तो निम्म्या किमतीत म्हणजेच 1499 रुपयांना उपलब्ध आहे. फिलिप्स (Phillips) कंपनीचा सुमारे 1 तास चालणारा ड्युरा पॉवर ट्रिमर 1895 रुपयांना असून, सवलतीच्या किमतीत तो 1749 रुपयांना उपलब्ध आहे.
नोव्हाच्या (Nova) मल्टी ग्रुमिंग ट्रिमरमध्ये 60 मिनिटांचा बॅटरी बॅकअप मिळतो. त्याची किंमत 1999 रुपये असून, अॅमेझॉनवर (Amazon) तो 1049 रुपयांना उपलब्ध आहे.
हे वाचा - Work From Home दरम्यान लॅपटॉप होतोय हँग? वापरा या सोप्या टिप्स
शाओमी या चिनी कंपनीनं बुधवारी (29 सप्टेंबर 2021) बिअर्ड ट्रिमर 2 (Beard Trimmer 2) लॉंच केला आहे. या ट्रिमरमध्ये वैविध्यपूर्ण अशी फीचर्स देण्यात आली आहेत. हा ट्रिमर ब्लॅक मॅट कलरमध्ये उपलब्ध असून, तो स्लीक आणि कॉम्पॅक्ट दिसतो. यात टिकाऊ केसिंगमध्ये थर्मल इन्सुलेटेड मोटार बसवण्यात आली आहे. तसंच बॅटरीची पातळी कळावी यासाठी इंडिकेशन स्क्रीन डिस्प्लेही देण्यात आला आहे. यामुळे ट्रिमर किती चार्ज आहे हे युजर्सला कळू शकणार आहे.
ट्रिमरमध्ये डायल ट्रोनी आहे. तसंच वेगात चार्जिंग होण्यासाठी टाइप-सी पोर्ट (Type -c Port) आहे. 5 मिनिटं चार्जिंग केल्यास हा ट्रिमर 12 मिनिटं चालू शकतो, असा दावा कंपनीनं केला आहे. या ट्रिमरची बॉडी वॉशेबल म्हणजेच पाण्यानं स्वच्छ करता येणारी आहे. प्रवासादरम्यान सुरक्षिततेसाठी या ट्रिमरमध्ये ट्रॅव्हल लॉकही देण्यात आलं आहे. यात सेल्फ शार्पनिंग, स्टेनलेस स्टील ब्लेड्स आहेत. याच्या वैशिष्ट्यपूर्ण डिझाइनमुळे एका मिनिटात 6000 ब्लेड मूव्हमेंट करणं शक्य असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. अर्गोनॉमिक डिझाइन, एलईडी बॅटरी डिझाइन, रोटरी डायल, टाइप-सी आणि वेगात चार्जिंग, आयपीएक्स 7 रेटिंग आणि ट्रॅव्हल लॉक ही ट्रिमरची वैशिष्ट्यं आहेत.
शाओमीनं या बिअर्ड ट्रिमर 2 ची किंमत 1999 रुपये ठेवली आहे. आगामी `दिवाळी वुईथ एमआय` या सेलमध्ये ग्राहक स्पेशल ऑफर अंतर्गत हा ट्रिमर 1799 रुपयांत खरेदी करू शकणार आहेत. या कालावधीत या ट्रिमरवर ग्राहकांना 200 रुपयांची सूट मिळणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Technology