नवी दिल्ली, 11 जानेवारी - भारतातील स्मार्टफोन (Smart Phone) मार्केटमध्ये चिनी कंपन्यांची पाळेमुळे घट्ट झाली आहेत. कंपन्यांच्या यादीत शाओमी (Xiaomi), ओप्पो (Oppo), व्हिवो (Vivo) या कंपन्यांचा सर्वात वरचा क्रमांक लागतो. या कंपन्यांचे लो बजेटपासून ते प्रीमियम स्मार्टफोनपर्यंत सर्व प्रकारचे ऑप्शन उपलब्ध आहेत. भारतीय ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिल्याने या कंपन्या चांगल्याच मालामाल झाल्या आहेत. परंतु देशाच्या विकासात या कंपन्यांचे कवडीचेही योगदान नसल्याचे उघड झाले आहे.
दरवर्षी भारतीय ग्राहकांकडून एक लाख कोटी रुपयांहून अधिक कमाई करणार्या या कंपन्या भारतात टॅक्स म्हणून दमडीही देत नाहीत. टॅक्स देण्याची वेळ येते तेव्हा या कंपन्या आयकर विभागाला ठेंगा दाखवतात. परंतु आता या कंपन्या आयकर विभागाच्या रडारावर आल्या आहेत. टॅक्शशी संबंधित प्रकरणांमध्ये वेगवेगळ्या तपास संस्था चिनी कंपन्यांच्या या खेळाचा तपास करत आहेत.
कमाई लपवल्याचा आरोप
भारतातील कमाईबाबतची माहिती या कंपन्या लपवत असल्याचा आरोप आहे. टॅक्स भरण्यापासून पळ काढण्यासाठी कंपन्यांनी आपल्या नफ्याची माहिती दिली नाही. तसेच भारतीय बाजारात स्थानिक स्मार्टफोनची इंडस्ट्री उद्ध्वस्त करण्यासाठी दबावाचा वापर केला. गेल्या काही वर्षांदरम्यान या तीन कंपन्यांवर रेग्युलेटरी फायलिंगमध्ये अनियमितता केल्याचा आरोप आहे. त्यांच्या बिझनेल प्रॅक्टिसचीसुद्धा तपास केला जाणार आहे.
छोट्या व्यावसायिकांसाठी सरकार आणणार विमा योजना; पाच कोटींहून अधिक कुटुंबांना फायदा
चिनी कंपन्यांच्या ठिकाणांवर गेल्या काही दिवसांमध्ये विविध एजन्सींनी छापेमारी केली होती. यामध्ये आयकर विभाग आणि डायरेक्टोरेट ऑफ रेव्हेन्यू इंटेलिजन्स (DRI) या विभागांचा समावेश आहे. त्यामुळेच या कंपन्यांविरुद्ध सरकारने सखोल चौकशी सुरू केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कंपन्यांवर आपल्या पोझिशनचा फायदा घेऊन रेस्ट्रिक्टिव्ह ट्रेड प्रॅक्टिस करण्याचा आरोप आहे. त्यामुळे कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया (CCI) सुद्धा या तपासात सहभागी होऊ शकतो.
फायनॅन्शिअल रिपोर्टिंगमध्ये त्रुटी
या प्रकरणाशी संबंधित अधिकार्यांच्या माहितीनुसार, चिनी कंपन्यांनी गेल्या काही वर्षांमध्ये केलेल्या फायनान्शिअल रिपोर्टिंगमध्ये सुरुवातीच्या काळात त्रुटी आढळून आल्या आहेत. त्यामध्ये आयकर चोरी लपवणे, फॅक्ट्ससोबत छेडछाडीच्या काही गोष्टी समोर आल्या आहेत. सरकारकडून सर्व संभाव्य मुद्द्यांवर तपास करत आहे. मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड आयटीचीसुद्धा कंपन्यांवर नजर आहे.
नेटवर्थ दाखवले निगेटिव्ह
या प्रकरणाशी संबंधित अधिकारी सांगतात, 2019-20 मध्ये या सर्व कंपन्यांचा भारतातील एकूण उलाढाल एक लाख कोटी रुपयांहून अधिक होता. परंतु तरीही या कंपन्यांनी भारतात एक रुपयाही टॅक्स दिलेला नाही. व्हिवो आणि ओप्पो 2016-17 पासून आपला नेटवर्थ निगेटिव्ह दाखवत आहेत. देशातील स्मार्टफोन कंपन्यांच्या मार्केटमध्ये लिडर असल्याचा दावा करणार्या शाओमी कंपनी भारतात मोठे नुकसान झाल्याचे दाखवत आहे. तर कंपनीने 2018-19 मध्ये 2447 कोटी रुपये आणि 2019-20 मध्ये 3277 कोटी रुपयांचे नुकसान दाखवले होते.
भारतीय कंपन्यांची भागिदारी कमी
देशात चिनी कंपन्यांच्या दबदब्यात भारतीय कंपन्यांची पाळेमुळे खूपच नाजूक आहेत. लाव्हा, कार्बन, मायक्रोमॅक्स आणि इंटेक्ससारख्या कंपन्यांच्या विक्रीमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे. भारतीय स्मार्टफोन कंपन्यांच्या मार्केटमध्ये या कंपन्यांची भागिदारी 10 टक्क्यांहून कमी आहे. वितरण करणार्या स्थानिक कंपन्यांशी चिनी कंपन्या हातमिळवणी करत नाहीत, हासुद्धा त्यांच्यावर आरोप आहे. त्यांचे पुरवठादार चिनी कंपन्यांच आहेत. तसेच स्मार्टफोन्सचे पार्टच्या सोर्सिंगमध्ये पारदर्शकता नसल्याचाही आरोप आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Income tax, India china, Oppo, Smartphone