नवी दिल्ली, 11 जानेवारी: आधीच्या सत्रात झालेल्या घसरणीनंतर देशात मंगळवारी (11 जानेवारी) सोन्याच्या किमतींमध्ये (Gold Price Today January 11, 2022) वाढ झाली. (latest Gold and Silver rates) मल्टीकमोडिटी एक्स्चेंजमध्ये (MCX) गोल्ड काँट्रॅक्ट्सच्या दरांत 0.25 टक्के वाढ होऊन 11.50 वाजता ते प्रति 10 ग्रॅम 47,574 रुपयांवर पोहोचले. चांदीचे भावही सावरले. एक किलो चांदीचा दर (Silver price today) 0.40 टक्क्यांनी वाढून 60,909 रुपयांवर पोहोचला.
डॉलरच्या घसरलेल्या मूल्याच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या किमतींनी (Gold Price) झेप घेतली. ग्रीनिच मध्य वेळेनुसार 05.35 वाजता स्पॉट गोल्ड फ्युचर्स 0.3 टक्क्यांनी वाढून त्याचं मूल्य प्रति औंस 1805.98 डॉलर्स एवढं झालं. यूएस गोल्ड फ्युचर्स 0.4 टक्क्यांनी वाढून 1805.40 डॉलर्सवर पोहोचले. डॉलरचं मूल्यही मंगळवारी घसरलं. ट्रेडर्स यूएस फेडरल रिझर्व्ह पॉलिसीच्या नॉर्मलायझेशनच्या वेगावर लक्ष ठेवून आहेत.
वेटर ते जगातील अकरावे श्रीमंत, वाचा Crypto संस्थापकांचा Thrilling प्रवास
भारताचा सोन्याच्या आयातीवरचा खर्च 2021मध्ये 55.7 अब्ज डॉलर्सवर पोहोचला. आधीच्या वर्षीच्या दुप्पट सोन्याची खरेदी भारताने केली. 2020मध्ये 22 अब्ज डॉलर्स एवढ्या मूल्याची सोनं आयात करण्यात आली होती. 2011मध्ये 53.9 अब्ज डॉलर्स मूल्याची सोनं आयात झाली होती, असं रॉयटर्सच्या वृत्तात म्हटलं आहे.
रिलायन्स सिक्युरिटीजमधले (Reliance Securities) वरिष्ठ संशोधन विश्लेषक श्रीराम अय्यर यांनी याबद्दल माहिती दिली. 'आशियाई ट्रेडमध्ये मंगळवारी सकाळी आंतरराष्ट्रीय सोन्याच्या किमती थोड्या वाढू लागल्या. डिसेंबरमधला अमेरिकेतला महागाईबद्दलचा डेटा या आठवड्यात नंतर प्रसिद्ध होणं अपेक्षित आहे. त्यानुसार दर आणखी वाढण्याची शक्यता आहे. आज रात्री येणाऱ्या फेड चेअर जेरोम पॉवेल टेस्टिमनीची, तसंच ECBच्या प्रमुख ख्रिस्तिन लगार्ड यांच्या भाषणाचीही गुंतवणूकदार वाट पाहत आहेत. COMEX फेब्रुवारी 1796.70 डॉलरच्या पातळीवर ट्रेड करत असेल, तर त्याचा मोमेंटम 1791.40 ते 1784.00 डॉलर्सच्या पातळीपर्यंत जाऊ शकतो. तांत्रिकदृष्ट्या MCX गोल्ड फेब्रुवारी 47,420 रुपयांच्या खाली ट्रेड करत असेल, तर त्याची मोमेंटम 47,340 ते 47,220 रुपयांपर्यंत जाऊ शकते. रेझिस्टन्स झोन 47,535 रुपये ते 47,615 रुपये असा असेल.'
मिळणार कमाईची सुवर्णसंधी! आणखी दोन मोठ्या कंपन्यांच्या आयपीओला SEBI ची मंजुरी
शेअरइंडियाचे उपाध्यक्ष आणि संशोधनप्रमुख डॉ. रवी सिंग यांनीही याबद्दल सांगितलं, 'मजबूत अमेरिकी डॉलर आणि ट्रेझरी यिल्ड्सच्या पार्श्वभूमीवर सोन्याच्या किमतींचं ट्रेडिंग दबावाखाली सुरू आहे. फेडच्या डिसेंबर मीटिंगनंतर सोन्याच्या किमती खालच्या पातळीवर आल्या आहेत. ट्रेडर्स सावध आहेत. तसंच ओमिक्रॉनच्या प्रसाराकडे लक्ष ठेवून आहेत, जेणेकरून सोन्यामध्ये पोझिशन बिल्डिंग करता येईल. 47,800 रुपये टार्गेटसाठी 47,450 रुपयांवर बाय झोन असेल. 47,000 रुपये टार्गेटसाठी 47,200 रुपयांखाली सेल झोन असेल,' असं ते म्हणाले.
दैनंदिन तांत्रिक चार्टनुसार सोनं आणि चांदी हे दोन्ही धातू डिमांड झोनमध्ये ट्रेडिंग करत आहेत. दिलेल्या सपोर्ट लेव्हल्सच्या आधारे ट्रेडर्सनी फ्रेश बाय पोझिझन्स तयार कराव्यात असा सल्ला गंगानगर कमोडिटीज लिमिटेडचे अमित खरे यांनी दिला आहे. महत्त्वाच्या टेक्निकल लेव्हल्सवर ट्रेडर्सनी लक्ष केंद्रित करावं, असा सल्लाही देण्यात आला आहे.
फेब्रुवारी गोल्ड प्रायसिंग प्राइस 47,455 रुपये, सपोर्ट 1 - 47300 रुपये, सपोर्ट 2 - 47,150 रुपये, रेझिस्टन्स 1 - 47,510 रुपये, रेझिस्टन्स 2 - 47,630 रुपये
मार्च सिल्व्हर क्लोझिंग प्राइस 60,667 रुपये, सपोर्ट 1 - 60,300 रुपये, सपोर्ट 2 - 59,800 रुपये, रेझिस्टन्स 1 - 61,000 रुपये, रेझिस्टन्स 2 - 61,500 रुपये.
चांदीच्या किमतींबद्दल अय्यर यांनी सांगितलं, की आशियाई बाजारात चांदीच्या आंतरराष्ट्रीय किमती वाढायला सुरुवात झाली आहे. अमेरिकेच्या डिसेंबरच्या महागाईच्या माहितीवर काही गोष्टी अवलंबून आहेत. COMEX मार्च 22.400 डॉलर्सच्या पातळीच्या खाली ट्रेड करत असेल, तर त्याची मोमेंटम 22.265 डॉलर्स ते 22.070 डॉलर्सच्या पातळीपर्यंत जाऊ शकतो. रेझिस्टन्स झोन 22.600 डॉलर्स ते 22.740 डॉलर्सपर्यंत असू शकतो.
तांत्रिकदृष्ट्या MCX सिल्व्हर मार्च 60,860 रुपयांच्या खाली ट्रेड करत असेल, तर त्याचा मोमेंटम 60,365 ते 60,060 रुपयांपर्यंत जाऊ शकतो. रेझिस्टन्स झोन 60,860 रुपये ते 61,050 रुपयांपर्यंत असू शकतो, असं अय्यर यांनी सांगितलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.