मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

बॅननंतरही हे चिनी App होतंय डाउनलोड; भारतात 10 कोटी यूजर्स

बॅननंतरही हे चिनी App होतंय डाउनलोड; भारतात 10 कोटी यूजर्स

गुगल प्ले स्टोरवर Snack Video टॉप ट्रेंडिंगमध्ये आहे. भारतात Snack Video  दहा कोटीहून अधिक लोकांनी इन्स्टॉल केलं आहे. Snack Video हे शॉर्ट व्हिडिओ मेकिंग ऍप आहे.

गुगल प्ले स्टोरवर Snack Video टॉप ट्रेंडिंगमध्ये आहे. भारतात Snack Video दहा कोटीहून अधिक लोकांनी इन्स्टॉल केलं आहे. Snack Video हे शॉर्ट व्हिडिओ मेकिंग ऍप आहे.

गुगल प्ले स्टोरवर Snack Video टॉप ट्रेंडिंगमध्ये आहे. भारतात Snack Video दहा कोटीहून अधिक लोकांनी इन्स्टॉल केलं आहे. Snack Video हे शॉर्ट व्हिडिओ मेकिंग ऍप आहे.

  • Published by:  Karishma Bhurke

नवी दिल्ली, 23 ऑक्टोबर : भारत सरकारने यावर्षी पबजी, टिकटॉक, यूसी ब्राउजर यांसारखे चीनचे (China) जवळपास 200 हून अधिक चायनीज ऍप बॅन केले. परंतु बॅननंतरही चायनीज ऍपचे काही लाईट व्हर्जन अद्यापही डाउनलोड होत आहेत. त्याशिवाय असे काही ऍप आहेत, ज्यांची नावं बदलून भारतात लाँच करण्यात आली आहेत. अशाप्रकारे नावं बदलून लाँच केलेले ऍप सध्या व्हायरल होत असल्याचं चित्र आहे. चिनी ऍपवरील बॅननंतरही, चीनचं एक स्नॅक व्हिडिओ ऍप (Snack Video App) जगभरात पसरलं आहे. भारतात टिकटॉक (TikTok) बॅन झाल्यानंतर या ऍपची लोकप्रियता वाढली आहे.

गुगल प्ले स्टोरवर Snack Video टॉप ट्रेंडिंगमध्ये आहे. भारतात Snack Video दहा कोटीहून अधिक लोकांनी इन्स्टॉल केलं आहे. Snack Video हे शॉर्ट व्हिडिओ मेकिंग ऍप आहे. ज्यात एडिटिंग, लिपसिंग आणि स्पेशल इफेक्ट्ससारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

(वाचा - सावधान! Google ची तुमच्या activity वर नजर; Google कडे आहे तुमचा संपूर्ण डेटा?)

मिळालेल्या माहितीनुसार, आता Snack Video ही बॅन करण्याची तयारी सुरू आहे. Centre For Digital Economy Policy Research चे अध्यक्ष जयजीत भट्टाचार्य यांनी, हे ऍप आधी बॅन करण्यात आलेल्या इतर ऍपप्रमाणे धोका निर्माण करत असल्याचं सांगितलं. Snack Video बॅन ऍपचं नवं रूप आहे. त्यामुळे हे भारत सरकारच्या आदेशाचं उल्लंघन आहे.

(वाचा - 4 लाखांहून कमी बजेटमध्ये खरेदी करू शकता या जबरदस्त कार; मायलेज जास्त, किंमत कमी)

सेंटर फॉर डिजिटल इकोनॉमी पॉलिसी रिसर्चने, यासंबंधी गृहमंत्री अमित शाह आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव राजेंद्र कुमार यांना पत्र लिहिलं आहे. आधी बॅन केलेल्या ऍपप्रमाणे Snack Video मुळे सिक्योरिटी आणि प्रायव्हसी धोका असल्याचं पत्रात लिहिलं आहे. त्यामुळे हे ऍपही बॅन होऊ शकतं.

(वाचा - जुलै ते सप्टेंबरमध्ये 5 कोटी स्मार्टफोनची विक्री; टॉप 5 मध्ये चार चीनी कंपन्या)

Snack Video ऍप बनवणारी कंपनी कुआशू टेक्नोलॉजीचं Kwai ऍप यापूर्वीही भारतात बॅन झालं होतं. कंपनीने या ऍपचं संपूर्ण ऑपरेशन बंद केलं होतं. भारताने पहिल्यांदा चीनचे 59 ऍप्स बॅन केलं, त्यावेळी 59 चीनी ऍप्समध्ये Snack Video तिसऱ्या क्रमांकावर होतं. बॅन केल्यानंतरही गुगल प्ले स्टोरवर Snack Video अद्यापही दिसत आहे.

First published:

Tags: China