Freedom 251 मोबाईल मॅन पुन्हा चर्चेत; आता 200 कोटींच्या ड्रायफ्रूट घोटाळ्यात अटक

Freedom 251 मोबाईल मॅन पुन्हा चर्चेत; आता 200 कोटींच्या ड्रायफ्रूट घोटाळ्यात अटक

आपल्या नावाप्रमाणेच समोरच्या व्यक्तींना वेगवेगळ्या जाळ्यांत अडकवून 'मोहित' करणाऱ्या या उद्योजकाचं नाव आता पुन्हा चर्चेत आलं आहे. आता गोयल यांच्यावर तब्बल 200 कोटींचा ड्रायफ्रूट घोटाळा (Dryfruit Fraud) केल्याचा आरोप झाला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : मोहित गोयल (Mohit Goel) हे नाव आठवतंय का? पाच वर्षांपूर्वी या नावाची मोठी चर्चा झाली होती. नोएडातल्या या उद्योजकाने आपल्या रिंगिंग बेल्स (Ringing Bells) कंपनीमार्फत फक्त 251 रुपयांत स्मार्टफोन (Cheapest Smartphone) आणला होता. जगातला सर्वांत स्वस्त स्मार्टफोन अशी जाहिरात झालेल्या या स्मार्टफोनला मोहितने फ्रीडम 251 (Freedom 251) असं नाव दिलं होतं.

ज्या दिवशी हा फोन आला, त्या दिवशी आणखी एक विक्रम झाला, तो म्हणजे त्यांच्या वेबसाइटला एका मिनिटात सहा लाख हिट्स मिळाल्या आणि त्यांच्यावर स्मार्टफोन्सच्या ऑर्डर्सचा अक्षरशः वर्षाव झाला. त्यांना साडेसात कोटी ऑर्डर्स मिळाल्या, ज्या कधीच पूर्ण केल्या गेल्या नाहीत. स्वस्त स्मार्टफोन घेऊ इच्छिणारे फसवले गेले आणि 'रिंगिंग बेल्स'ची किणकिण ऐकताच आली नाही.

आपल्या नावाप्रमाणेच समोरच्या व्यक्तींना वेगवेगळ्या जाळ्यांत अडकवून 'मोहित' करणाऱ्या या उद्योजकाचं नाव आता पुन्हा चर्चेत आलं आहे. आता गोयल यांच्यावर तब्बल 200 कोटींचा ड्रायफ्रूट घोटाळा (Dryfruit Fraud) केल्याचा आरोप झाला आहे. सियासत डॉट कॉमने, टाइम्स ऑफ इंडियाच्या हवाल्याने याबाबतचं वृत्त दिलं आहे.

(वाचा - तुमच्या गाड्यांना अजूनही FASTag नसेल, तर Don't worry; सरकारने दिली ही सुविधा)

या प्रकरणात नोएडा (Noida) पोलिसांनी सोमवारी (11 जानेवारी) मोहित गोयल यांना अटक केली आहे. अनेक ड्रायफ्रूट व्यापाऱ्यांना फसवल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली आहे.

दुबई ड्रायफ्रूट अँड स्पायसेस हब या नावाचं ड्रायफ्रूट्सचं दुकान मोहित गोयल चालवत होते. यात आणखी पाच जण त्यांचे भागीदार होते. पोलिसांनी मोहित यांना अटक केल्यानंतर टाकलेल्या छाप्यात एक ऑडी (Audi) कार, साठ किलो ड्रायफ्रूट्स आणि काही कागदपत्रं जप्त केली.

(वाचा - WhatsApp च्या नव्या पॉलिसीमुळे तुमच्या प्रायव्हसीला धोका? वाचा हे FACTS)

मोहित यांनी केलेल्या कथित फसवणुकीची व्याप्ती एवढी मोठी आहे, की नोएडा पोलिसांना मोहित यांच्या कंपनीविरोधात किमान 40 लेखी तक्रारी आल्या आहेत. या तक्रारी पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, राजस्थान, दिल्ली, कर्नाटक, आंध्र प्रदेश यांसह अन्य काही राज्यांमधून आल्या आहेत. यावरून या फसवणुकीच्या प्रकरणाची व्याप्ती लक्षात येते.

फ्रीडम 251 हा सर्वांत स्वस्त मोबाइल उपलब्ध करून देण्याचं नोव्हेंबर 2015 मध्ये दिलेलं आश्वासन न पाळूनही मोहित यांचा इतरांची फसवणूक करण्याचा धंदा मात्र जोरात सुरू होता. 2017 मध्ये दिल्लीतल्या एका कंपनीची 16 लाखांची फसवणूक केल्याबद्दल त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. 2018 मध्येही पोलिसांनी त्यांना अटक केली होती. दिल्लीतल्या बलात्काराच्या एका प्रकरणात मांडवली करण्यासाठी त्यांनी खंडणी मागितली, असा आरोप त्यांच्यावर होता. ते प्रकरण शांत होतंय ना होतंय तोपर्यंत आता ड्रायफ्रूट घोटाळा समोर आला आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: January 13, 2021, 7:22 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading