Home /News /technology /

Explainer : प्रवासी आणि वाहन उत्पादकांसाठी Airbags बाबत नव्या नियमांचा अर्थ काय?

Explainer : प्रवासी आणि वाहन उत्पादकांसाठी Airbags बाबत नव्या नियमांचा अर्थ काय?

केंद्र सरकारने सर्व वाहनांमध्ये ड्रायव्हर शेजारील सीटवर बसून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीही वाहनात एअरबॅग देणं अनिवार्य केलं आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने शुक्रवारी 5 मार्च रोजी एअरबॅग अनिवार्य करण्याच्या तरतूदीबाबत अधिसूचना जारी केली आहे.

पुढे वाचा ...
नवी दिल्ली, 9 मार्च: केंद्र सरकारने सर्व वाहनांमध्ये ड्रायव्हर शेजारील सीटवर बसून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठीही वाहनात एअरबॅग (Air bag) देणं अनिवार्य (Dual Airbags Compulsory) केलं आहे. रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Roads, Transport and Highway Ministry) शुक्रवारी 5 मार्च रोजी एअरबॅग अनिवार्य करण्याच्या तरतूदीबाबत अधिसूचना जारी केली आहे. ‘वाहनांमध्ये ड्रायव्हरसाठी आणि त्याच्या शेजारी बसलेल्या प्रवाशांसाठी एअरबॅग अनिवार्य असल्याबाबत एकअधिसूचना जारी केली आहे. हा एक महत्त्वाचा सुरक्षा उपाय आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या (Supreme Court) रस्ता सुरक्षा समितीने त्याबाबत सूचना केली होती, असं मंत्रालयानं म्हटलं आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, 1 एप्रिल 2021 पासून तयार केलेल्या नवीन वाहनांना पुढील सीट्ससाठी एअरबॅग देणं आवश्यक असेल. जुन्या वाहनांमध्ये 31 ऑगस्ट 2021 पासून एअरबॅग देणं बंधनकारक असेल. कारमधील प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून हे पाऊल उचलण्यात आलं आहे. या नियमाचे काय परिणाम होतील - सरकारने यापूर्वी 29 डिसेंबर 2020 रोजी, 1 एप्रिल 2021 पासून नवीन वाहनांसाठी आणि 1 जून 2021 पासून जुन्या वाहनांसाठी दोन एअरबॅग्ज अनिवार्य करण्याचा निर्णय लागू करण्यात येईल, असं म्हटलं होतं. रस्ते मंत्रालयाने हा प्रस्ताव लोकांच्या सूचना आणि शिफारशीसाठी खुला केला होता. जुलै 2019 पासून हा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन होता.

(वाचा - फिरण्यासाठी कार नाही चालत-फिरतं घरच घ्या,केवळ 500 रुपयांत;पाहा या कंपन्यांची ऑफर)

आता हा नियम एम वन गटातील आठ पेक्षा जास्त प्रवासी क्षमता नसलेल्या सर्व वाहनांसाठी लागू करण्यात आला आहे. याचाच अर्थ नवीन आर्थिक वर्षात म्हणजेच एप्रिल 2021 नंतर तयार करण्यात येणाऱ्या सर्व प्रवासी वाहनांमध्ये दोन एअरबग्ज असणं बंधनकारक आहे. सध्या रस्त्यावर धावणाऱ्या मारुती सुझुकी अल्टो, एस -प्रेसो, वेगन आर, हुंदाई सेन्ट्रो, डॅटसन रेडी गो आणि महिंद्रा बोलेरो या वाहनांची बेसिक मॉडेल्स एअरबग्ज विरहीत आहेत. नवीन नियमांनुसार या मॉडेल्समध्ये 31 ऑगस्टपूर्वी एअरबग्ज बसवणं अनिवार्य आहे. जगभरात रस्ते अपघातातील (Road Accidents) बळींच्या संख्येच्या दहा टक्के बळी भारतात असतात, असं जागतिक बँकेने (World Bank) नुकत्याच जाहीर केलेल्या अहवालात म्हटलं आहे. दुसऱ्या एअरबॅगमुळे ड्रायव्हर शेजारील सीटवर बसलेल्या व्यक्तीची सुरक्षितता वाढेल. अपघात झाल्यास त्या व्यक्तीलाही संरक्षण मिळेल.

(वाचा - 1 एप्रिलपासून कारममध्ये हे फीचर नसल्यास येईल समस्या, जाणून घ्या सरकारचा नवा नियम)

एअरबॅग्ज महत्त्वाच्या का? कारमधील एअरबॅग अपघातात ड्रायव्हर आणि शेजारी बसलेल्या प्रवाशाच्या जीवाचा धोका कमी होतो. कार एखाद्या वाहनाला किंवा इतर वस्तूला धडकली, तर डॅशबोर्ड आणि प्रवासी यांच्यामध्ये एअरबॅग्ज उघडल्या जातात आणि प्रवाशाला सुरक्षा मिळते. जोरदार किंवा मध्यम तीव्रतेच्या धडकेनंतर एअरबॅग्ज उघडल्या जातात आणि प्रवाशाचं डोकं, छाती कठीण पृष्ठभागावर आदळण्यापासून वाचते. आपल्या देशात दररोज 415 लोकांचा रस्ते अपघातात बळी जातो. त्यामुळे एअरबॅग ही महत्त्वाची जीवरक्षक यंत्रणा ठरणार आहे. अमेरिकेतील राष्ट्रीय महामार्ग वाहतूक सुरक्षा संस्थेने (NHTSA) केलेल्या संशोधनानुसार, वाहनांमध्ये पुढच्या सीट्ससाठी असलेल्या एअरबॅग्जमुळे 44 हजार 869 जीव वाचले असल्याचं एका अहवालात म्हटलं आहे. वाहनाच्या पुढच्या बाजूने झालेल्या धडकेत एअरबॅग्जमुळे ड्रायव्हर्सचा जीव वाचाण्याचं प्रमाण 29 टक्के, तर बाजूच्या प्रवाशाचा जीव वाचण्याचे प्रमाण 32 टक्के असल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. एअरबॅग्ज आणि सीटबेल्टच्या (Seat Belts) वापरामुळे अशा अपघातांमधील जीव वाचण्याचं प्रमाण 61 टक्क्यांपर्यंत वाढू शकतं. त्यात केवळ एअरबॅग्जमुळे जीव वाचण्याचं प्रमाण 34 टक्के आहे, असंही या संशोधनात आढळलं आहे.

(वाचा - आता RTO च्या फेऱ्या बंद; Aadhaar कार्डद्वारे घरबसल्याच करा महत्त्वाची कामं)

या नव्या नियमामुळं वाहनं महागतील का? हा नवीन नियम लागू झाल्याने वाहनांच्या किंमती वाढणार असून त्याचा भार ग्राहकांच्या खिशावरच पडणार आहे. ज्या वाहनांमध्ये एअरबॅग्ज बसवल्या जातील त्यांच्या किंमती कमीत कमी पाच ते आठ हजार रुपयांनी वाढतील असा अंदाज आहे. केंद्र सरकारने केंद्रीय मोटार व्हेईकल रुल्स 1989 मध्ये दुरुस्ती करून कलम एआयएस 145 अंतर्गत जुलै 2019 पासून पुढच्या सीट्ससाठी एअरबॅग्ज असणं बंधनकारक केलं आहे. सुरक्षाविषयक वैशिष्ट्ये काय आहेत? सरकार 2022-23 पासून वाहनांमध्ये इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC) आणि ऑटोनॉमस इमर्जन्सी ब्रेकिंग (EBS) ही सुरक्षाविषयक फीचर्सही अनिवार्य करण्याचा विचार करत आहे. वाहनांमधील काही सुरक्षाविषयक फीचर्स अशी आहेत - अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम अर्थात एबीएस (ABS): महामार्गावर वाहन चालवताना ड्रायव्हर्सना अचानक मध्ये येणारे प्राणी, वाहनं यांच्यावर लक्ष द्यावं लागतं. त्यामुळे ब्रेक्स अत्यंत महत्त्वाचा घटक असतो. जीवन आणि मृत्यू यांच्यामध्ये अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीम अर्थात एबीएस यंत्रणा उभी राहू शकते. या यंत्रणेमुळे जोरात ब्रेक लावायला लागला, तरी चाकं घट्ट रोवून धरण्यात मदत होते. एप्रिल 2019 पासून सरकारने ही यंत्रणा वाहनांमध्ये असणं अनिवार्य केलं आहे.

(वाचा - Alert! बनावट FASTag बाबत वेळीच सावध व्हा; अशी करा तक्रार)

स्पीड अलर्ट सिस्टीम : कारने 80 किलोमीटर वेगाची मर्यादा ओलांडली, तर प्रत्येक मिनिटाला एक सिग्नल त्याचा संदेश देतो. वेग 120 किलोमीटरच्या पुढे गेला तर बीप असा आवाज सातत्याने येण्यास सुरुवात होते. वेग नियंत्रणात रहावा यासाठी ही यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे. ही बंद करता येत नाही किंवा काढून टाकता येत नाही. रिव्हर्स पार्किंग सेन्सर्स : कार मागे घेत असताना रिव्हर्स गिअर वापरला जात असताना हे सेन्सर्स काम करतात. कार मागे घेताना काही अडथळे आल्यास हे सेन्सर्स त्याची सूचना देतात. त्यामुळे काचेत दिसत नसलेल्या अडथळ्याला होणारी धडक टाळता येते. सीटबेल्ट रिमाईन्डर : ड्रायव्हर किंवा पुढच्या सीटवरील प्रवाशाने सीट बेल्ट लावला नसेल, तर हा अलार्म वाजू लागतो. सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाचं साधन असणाऱ्या सीट बेल्टचा वापर वाढावा यासाठी यासाठी ही यंत्रणा महत्त्वाची ठरते. मॅन्युअल ओव्हरराईड फॉर सेन्ट्रल लॉकिंग सिस्टीम : ज्या कार्समध्ये सेन्ट्रल लॉकिंग सिस्टीम आहे, त्यामध्ये मॅन्युअल ओव्हरराईड सुविधा असणं अत्यावश्यक आहे. ट्रान्सपोर्टसाठीच्या वाहनात चाईल्ड लॉकला परवानगी नाही.
First published:

Tags: Car, Central government, Travelling

पुढील बातम्या