• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • आता RTO च्या फेऱ्या बंद; Aadhaar कार्डद्वारे घरबसल्याच करा महत्त्वाची कामं

आता RTO च्या फेऱ्या बंद; Aadhaar कार्डद्वारे घरबसल्याच करा महत्त्वाची कामं

ड्रायव्हिंग लायसन्सच्या रिन्यूवलपासून ते डुप्लिकेट लायसन्ससाठी आता आरटीओमध्ये (RTO) जाण्याची गरज लागणार नाही. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) 4 मार्च रोजी आधार व्हेरिफिकेशनद्वारे कॉन्टॅक्टलेस सर्व्हिसची (Contactless Service) सुरुवात केली आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 6 मार्च : जर तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्ससंबंधी सेवेसाठी ऑनलाईन सुविधेचा वापर करायचा असल्यास तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी आहे. ड्रायव्हिंग लायसन्सच्या रिन्यूवलपासून ते डुप्लिकेट लायसन्ससाठी आता आरटीओमध्ये (RTO) जाण्याची गरज लागणार नाही. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने (Ministry of Road Transport and Highways) 4 मार्च रोजी आधार व्हेरिफिकेशनद्वारे कॉन्टॅक्टलेस सर्व्हिसची (Contactless Service) सुरुवात केली आहे. यासाठी मंत्रालयाकडून नोटिफिकेशन जारी करण्यात आलं आहे. मंत्रालयाने आपल्या नोटिफिकेशनमध्ये सांगितलं की, पोर्टलद्वारे कॉन्टॅक्टलेस सर्व्हिसचा फायदा घेण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला आधार व्हेरिफिकेशन करावं लागेल. जर कोणाकडे आधार कार्ड नसेल, तर तो आधार एनरोलमेंट आयडी स्लिप (Aadhaar Enrolment ID slip) दाखवून या सुविधेचा लाभ घेऊ शकतात.

  (वाचा - Netflix वर मित्रांसोबत मोफत पाहता येणार मूव्ही, वेब सीरीज; जाणून घ्या प्रोसेस)

  आधार व्हेरिफिकेशनद्वारे या सुविधांचा फायदा घेता येणार - >> लर्निंग लाइसन्स >> ड्रायव्हिंग लाइसन्स रिन्युअल, ज्यात ड्रायव्हिंगची टेस्ट द्यायची आवश्यकता नाही >> डुप्लिकेट ड्रायव्हिंग लाइसन्स >> ड्रायव्हिंग लायसन्स अ‍ॅड्रेसमध्ये बदल, रजिस्ट्रेशन प्रमाण पत्र >> इंटरनॅशनल ड्रायव्हिंग परमिट जारी करणं

  (वाचा - 1 एप्रिलपासून कारममध्ये हे फीचर नसल्यास येईल समस्या, जाणून घ्या सरकारचा नवा नियम)

  >> कोणत्याही मोटर वाहनासाठी तात्पुरत्या नोंदणीसाठी अर्ज >> डुप्लिकेट नोंदणी प्रमाणपत्र जारी करण्यासाठी अर्ज >> एनओसीसाठी (NOC) नोंदणी प्रमाणपत्र अर्ज >> मोटर वाहनांच्या मालकीच्या हस्तांतरणाची (Trasfer) सूचना >> नोंदणी प्रमाणपत्रात पत्ता बदलल्याची सूचना >> मान्यता प्राप्त ड्रायव्हिंग प्रशिक्षण केंद्र नोंदणीसाठी अर्ज
  Published by:Karishma
  First published: