मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /स्मार्टफोन किंवा गाडी चोरी झाल्यास नो टेन्शन, आता Google करणार हरवलेली वस्तू शोधण्यास मदत

स्मार्टफोन किंवा गाडी चोरी झाल्यास नो टेन्शन, आता Google करणार हरवलेली वस्तू शोधण्यास मदत

गाडी आणि स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी टेक कंपनी Google लवकरच एक नवं फीचर आणणार आहे. गुगल आपल्या Find My Device इकोसिस्टममध्ये नव्या सुविधा जोडण्यासाठी काम करत आहे.

नवी दिल्ली, 14 ऑगस्ट : स्मार्टफोन आणि गाडी आताच्या काळात प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट झाली आहे. त्यासोबतच या दोघांचं चोरी होण्याचं प्रमाणही वाढलं आहे. त्यामुळेच गाडी आणि स्मार्टफोन सुरक्षित ठेवण्यासाठी टेक कंपनी Google लवकरच एक नवं फीचर आणणार आहे. गुगल आपल्या Find My Device इकोसिस्टममध्ये नव्या सुविधा जोडण्यासाठी काम करत आहे.

9to5 Google च्या एका रिपोर्टनुसार, गुगल एका अशा फीचरवर काम करत आहे, ज्याद्वारे एका दुसऱ्या Android फोनचा वापर करुन हरवलेल्या Android स्मार्टफोनला ट्रॅक करण्यासाठी मदत करेल. त्याशिवाय ज्या कार नव्या अँड्रॉईड ऑटो इंफोटेनमेंट सिस्टमसह येतात, त्यादेखील चोरी झाल्यानंतर ट्रॅक करण्यासाठी मदत करतील.

9to5 रिपोर्टनुसार, Find My Device फीचर अंतर्गत आणखी एक सुविधा सामिल केली जात आहे. ज्यात तुम्ही दुसऱ्यासोबतही आपलं डिव्हाईसची ओनरशिप शेअर करू शकतात. या फीचरमुळे तुम्ही तुमचा हरवलेला फोन ट्रॅक करू शकता. इंटरनेट कनेक्शन नसलं तरीही ट्रॅक करता येऊ शकतं.

Google नव्या अँड्रॉईड ऑटो इंफोटेनमेंट सिस्टमवर युजरला Google अकाउंटशी लॉगइन करण्याची क्षमता ठेवतो. यामुळे चोरी झाल्यास, तुमची हरवलेली वस्तू ट्रॅक करण्यास तुमची मदत करेल.

असा SMS आला असल्यास, चुकूनही करून नका ओपन; मिनिटांत खाली होईल बँक अकाउंट

कार ट्रॅक करण्याची सुविधा केवळ तुमच्या वाहनाच्या सुरक्षेपर्यंत मर्यादित नाही, तर हे तुमच्या गुगल अकाउंटच्या अनऑथोराईज्ड अॅक्सेसलाही प्रतिबंध करेल. गुगल या सुविधांवर काम करत असल्याचा दावा रिपोर्टमध्ये करण्यात आला असून या सुविधा कधी अंमलात आणल्या जातील, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

First published:

Tags: Google, Tech news