Home /News /technology /

खाण्यासाठी काय करायचं याचं उत्तर देणार टेबलक्लॉथ; त्यावर ठेवलेलं साहित्य ओळखून सूचवणार पदार्थ

खाण्यासाठी काय करायचं याचं उत्तर देणार टेबलक्लॉथ; त्यावर ठेवलेलं साहित्य ओळखून सूचवणार पदार्थ

  लंडन, 29 ऑक्टोबर : माणसाचा स्मार्टनेस दिवसेंदिवस वाढतोय त्यानंतर फोन, टीव्ही स्मार्ट झाले. आता मशीन लर्निंग तंत्रज्ञानाच्या मदतीने तुमच्या स्वयंपाकघरातल्या टेबलावर अंथरलेलं कापड, टेबलक्लॉथही स्मार्ट झाला आहे. मायक्रोसॉफ्ट Microsoft आणि अमेरिकेतील न्यू हॅम्पशायरमधील डॅरमाउथ विद्यापीठातल्या (Dartmouth College, New Hampshire) शास्रज्ञांनी एकत्र येत एक स्मार्ट फॅबरिक सिस्टिम (smart fabric system) विकसित केली असून यांच नाव कॅपसिटिव्हो (Capacitivo)आहे. शास्रज्ञांनी विकसित केलेलं हे कमी किमतीचं स्मार्ट टेबलक्लॉथ (smart tablecloth) त्याच्यावर ठेवलेले अन्न पदार्थ, पेय आणि इतर वस्तू ओळखतं. एवढंच नाही, तर हे स्मार्ट कापड फक्त स्पर्शाच्या तंत्रज्ञानावर आधारित आहे आणि या टेबलक्लॉथ ठेवलेलं साहित्य ओळखून, खाण्यासाठी काय करायचं, कोणता पदार्थ करायचा याची पाककृतीही सुचवतं. टेबलक्लॉथ पदार्थ कसं ओळखतं? हे स्मार्ट कापड मशीन लर्निंग आणि कॅपसिटिव्ह इलेक्ट्रोड ग्रीड या दोन तंत्रांचा एकत्रित वापर करून त्यावर ठेवलेल्या वस्तूचा आकार आणि त्यातले घटक ओळखतं. वस्तू किंवा पदार्थ ओळखण्यासाठी प्रामुख्याने मशीन लर्निंग सिस्टीमचा वापर केला जातो. टेलिग्राफ या वृत्तपत्राशी बोलताना मायक्रोसॉफ्टचे संशोधक टेडी सेयेद (Teddy Seyed)म्हणाले, 'तुमच्या बोटाचा स्पर्श ओळखणारं टच स्क्रीनचं तत्त्व ही यंत्रणा वापरते.’

  (वाचा - माऊथवॉशही करतो का कोरोनापासून बचाव? काय सांगतं नवं संशोधन)

  आतापर्यंत काय-काय ओळखलंय या टेबलक्लॉथने? शास्रज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत केलेल्या लॅब टेस्टमध्ये या स्मार्ट क्लॉथने 20 पदार्थ ओळखले आहेत. यामध्ये द्राक्षं (grapefruit), ऍपलच्या एअरपॉडचं कव्हर (Apple AirPods case), चष्मा (glasses), बाउल (bowls) आणि सॅनिटायझरची बाटली (bottle of hand sanitiser) यांचा समावेश आहे. हा टेबलक्लॉथ अमेझॉन एकोसारख्या (Amazon Echo) स्मार्ट स्पीकरला जोडला, तर तो त्यावर ठेवलेल्या पदार्थांचा वापर करून कोणती पाककृती करायची हे सांगतो. हे सर्व प्रायोगिक तत्त्वावर सुरू आहे, त्यामुळे या कापडाला काही मर्यादा आहेत. धातुच्या वस्तू आणि ज्यांचे काठ चौकोनी आहेत अशा वस्तू ते ओळखू शकलेलं नाही. ज्या पेयांचा विशिष्ट कपॅसिटन्स फूटप्रिंट नाही असे पदार्थ हे कापड अजून ओळखू शकलेलं नाही.

  (वाचा - ना हेअर डाय, ना आर्टिफिशिअल कलर; फक्त तेलानं मालिश करून काळे करा केस)

  कॅपसिटिव्हो Capacitivo सांगणार आणखीही काही - कॅपसिटिव्हो मातीतील आर्द्रता ओळखून झाडांना पाणी कधी घालायचं हेदेखील या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सांगितलं जाईल. कॅपसिटिव्हो हे मेमरी टूल (memory tool) म्हणूनही वापरता येईल असा शास्रज्ञांचा अंदाज आहे. त्यामुळे जर तुम्ही पदार्थ खाऊन बाउल न धुताच ठेवला, तर तो स्वच्छ करायची सूचनाही हे नवं स्मार्ट कापड तुम्हाला करणार आहे. (वाचा - झाडांमधून झुलता पूल; PHOTO पाहाल तर 'द ग्रेट वॉल ऑफ चायना'लाही विसराल) या तंत्रज्ञानात अपग्रेड करून अधिक योग्य पद्धतीने हे तंत्रज्ञान कसं वापरता येईल याचा विचार संशोधक करत आहेत. यामुळे भविष्यात इतकं स्मार्ट घर तयार होईल की किचनमध्ये काय वस्तू आहेत हे बघत बसायचीही गरज भासणार नाही.
  Published by:Karishma Bhurke
  First published:

  पुढील बातम्या