माऊथवॉशही करतो का कोरोनापासून बचाव? काय सांगतं नवं संशोधन

माऊथवॉशही करतो का कोरोनापासून बचाव? काय सांगतं नवं संशोधन

जगाला महासंकटात टाकणाऱ्या कोरोना विषाणूला निष्क्रिय करण्यात माउथवॉश उपयुक्त नसल्याचं जगभरातील शास्रज्ञांनी म्हटलं आहे.

  • Share this:

वॉशिंग्टन, 28 ऑक्टोबर : लिस्टरिनसारखा माऊथवॉश (mouthwash)किंवा नाक स्वच्छ करणाऱ्या लिक्विडमुळे कोरोना व्हायरस (coronavirus) निष्किय (inactivate) होत नाही, असं नव्या संशोधनातून लक्षात आलं आहे. द जर्नल ऑफ मेडिकल व्हायरॉलॉजीमध्ये गेल्या महिन्यात प्रकाशित झालेल्या एका अभ्यासाचा आधार घेऊन, गेल्या काही आठवड्यांपासून अनेक वृत्तपत्रांमध्ये ‘माऊथवॉश तुमच्या शरीरातील कोरोनाचा विषाणू निष्क्रिय करतो’अशा मथळ्यांच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या होता. त्यामुळे समाजात तसाच समज पसरत होता.

पण हे संशोधन तोकडं असून, यात उल्लेख केल्याप्रमाणे माऊथवॉशमुळे नेहमीची सर्दी होते, तो विषाणू निष्क्रिय होऊ शकतो हे सत्य दिसून आलं आहे. पण जगाला महासंकटात टाकणाऱ्या कोरोना विषाणूला निष्क्रिय करण्यात माऊथवॉश उपयुक्त नसल्याचं जगभरातील शास्रज्ञांनी म्हटलं आहे. सर्वसामान्यांनी या अभ्यासाला महत्त्व न देता माऊशवॉशच्या बातमीकडे दुर्लक्ष करावं असंच जगभरातील शास्रज्ञ सुचवत आहेत.

माऊथवॉशच्या अभ्यासाची सत्यता कशी तपासली -

या अभ्यासात मांडलेल्या तथ्यांचा शास्रज्ञांनी अभ्यास केल्यावर त्यांना लक्षात आलं की, हा अभ्यास सखोल नाही. सामान्य सर्दी होण्यासाठी कारणीभूत ठरलेल्या विषाणू 229E वर होणारा माऊथवॉशच्या परिणामांचा अभ्यास केला. पण नोव्हेल कोरोना SARS-CoV-2 या विषाणूवर प्रयोग केलेले नाहीत. नव्या कोरोना विषाणूबद्दल अभ्यास हाय सिक्युरिटी लॅबमध्येच केला जातो. त्यासाठी प्रशिक्षण घेऊन मग शास्रज्ञ अभ्यास करतात. अशी कोणतीही गोष्ट माऊथवॉशचा अभ्यास मांडणाऱ्या शास्रज्ञांनी केलेली दिसत नाही. त्याचबरोबर माऊथवॉशच्या वापराने माणसापासून माणसाला संसर्ग कसा रोखता येईल याबद्दलची स्पष्टता अभ्यासात मांडलेली नाही.

या अभ्यासाबाबत कोलंबिया विद्यापीठातील व्हायरॉलॉजिस्ट (virologist) अँजेला रासमुसेन (Angela Rasmussen)म्हणाल्या, ‘ हे दोन्ही विषाणू एकाच फॅमिलीतील आहेत आणि अनॉटॉमिकली सारखाच दिसतो. काही प्रयोगांत SARS-CoV-2 ऐवजी 229E विषाणूही वापरला जातो. पण हे विषाणू परस्परांना पर्याय नाहीत.’

शास्रज्ञांनी जॉन्सन्स बेबी शांपूचं पाणी (Johnson’s baby shampoo) आणि लिस्टरिन (Listerine), क्रेस्ट (Crest), ओराजेल (Orajel), इक्वेट (Equate) आणि सीव्हीएस (CVS) या कंपन्यांनी तयार केलेल्या माउथवॉशचा वापर लिव्हरवर वाढणाऱ्या 229E विषाणूंवर केला. प्रयोगशाळेत केलेल्या प्रयोगांत हे विषाणू निष्क्रिय झाल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

या अभ्यासातील संशोधक आणि पेनसिल्व्हेनिया स्टेट युनिव्हर्सिटीतील (Pennsylvania State University) शास्रज्ञ क्रेम मेयर्स (Craig Meyers) म्हणाले, ‘ही द्रावणं विषाणूच्या संपर्कात आली तर ती विषाणूला निष्क्रिय करतात हे सिद्ध झालं आहे.’ पण हे प्रयोग, प्रयोगशाळेतल्या डिशमध्ये केले असून यात स्वयंसेवकांना तोंडात गुळण्या करायला सांगितलं नव्हतं. माणसाच्या तोंडात अनेक प्रकारचे स्राव असता त्यामुळे त्याची केमिकल रिअक्शन वेगळी असेल.

याबद्दल येल विद्यापीठातील (Yale University) संसर्गजन्य आजारांचे तज्ज्ञ मॅरिकर मॅलिनिस (Maricar Malinis) म्हणाले, ‘जर माणसावर प्रयोग केले गेले नसतील तर कुठलाच अभ्यास परिपूर्ण मानता येणार नाही. माऊथवॉश उपयुक्त आहे का अशा पद्धतीचे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. त्यावर अनेक क्लिनिकल अभ्यासही जगभर सुरू झाले असून, माझी टीमही लवकरच याबद्दल सखोल संशोधन सुरू करेल.’

हे संकट सुरू झाल्यापासूनच शास्रज्ञांनी हँडवॉश आणि साबणाचा वापर करून हात धुण्याचा सल्ला दिला आहे. रॉजर्स विद्यापीठातील (Rutgers University) पॅथॉलॉजिस्ट व्हॅलेरि फिट्सह्युह (Valerie Fitzhugh) यांनी सांगितलं की, 1990 मध्ये संशोधकांनी 30 सेकंद लिस्टरिनचा वापर करून फ्लुचा विषाणू निष्क्रिय केल्याचा अभ्यास उपलब्ध आहे पण तो अभ्यास क्लिनिकल अभ्यासाशी सुसंगत नाही.

Published by: Karishma Bhurke
First published: October 28, 2020, 5:37 PM IST

ताज्या बातम्या