जाहिरात
मराठी बातम्या / लाइफस्टाइल / ना हेअर डाय, ना आर्टिफिशिअल कलर; फक्त तेलानं मालिश करून काळे करा केस

ना हेअर डाय, ना आर्टिफिशिअल कलर; फक्त तेलानं मालिश करून काळे करा केस

ना हेअर डाय, ना आर्टिफिशिअल कलर; फक्त तेलानं मालिश करून काळे करा केस

सध्या तरुण वयातच केस पांढरे (white hair) होण्याची समस्या वाढली आहे. यासाठी केमिकलयुक्त कलर्स तुम्ही वापरत असाल तर केसांना अधिक हानी पोहोचेल. त्यामुळे केस काळे करण्याचे हे घरगुती उपाय.

  • -MIN READ myupchar
  • Last Updated :

    तरुण वयात केस पांढरे झाल्याने मानसिकरित्या लोक अस्वस्थ होतात. लोकांमध्ये उठण्या-बसण्याची त्यांना लाज वाटते आणि अगदी कमी वयातच केसांसाठी रासायनिक रंग वापरल्यानं समस्या वाढतं. मात्र अगदी घरच्या घरी नैसर्गिक आणि केमिकल विरहित तेलांनी तुम्ही तुमचे केस पांढरे करू शकता. नारळ तेल आणि मेहंदीची पानं myupchar.com  च्या डॉ. अप्रतिम गोयल यांनी सांगितलं, पांढर्‍या केसांपासून मुक्त होण्यासाठी नारळ तेल आणि मेहंदी यांचं मिश्रण उत्तम आहे. मेहंदीचा तपकिरी रंग केसांच्या मुळांपर्यंत पोहोचतो, ज्यामुळे केस पूर्वीसारखेच तपकिरी होतात. नारळ तेल मेहंदी मुळांपर्यंत पोहोचवण्यास मदत करते. यासाठी 3-4 चमचे नारळ तेल उकळेपर्यंत गरम करावं आणि त्यात मेहंदीची पानं घालावी. तेल तपकिरी होईपर्यंत उकळवा आणि नंतर हे तेल थंड करून केसांच्या मुळांवर लावा. कमीतकमी 40 मिनिटं तेल केसांवर तसंच ठेवा आणि मग केस धुवा. ही प्रक्रिया नियमितपणे अवलंबल्यास केस काळे होतील. एरंडेल आणि मोहरीचं तेल एरंडेल तेलामध्ये भरपूर प्रमाणात प्रथिनं असतात जे केस तुटण्यास प्रतिबंधित करतात.  मोहरीच्या तेलामध्ये लोह, मॅग्नेशियम, सॅलिनिअम, झिंक आणि कॅल्शियम असतं, जे केसांना निरोगी बनवते. 2 चमचे मोहरीच्या तेलामध्ये 1 चमचा एरंडेल तेल मिसळावं आणि काही सेकंद गरम करावं. तेल थंड झाल्यावर ते केसांच्या मुळांवर लावा आणि 10 मिनिटं मालिश करा. कमीतकमी 45 मिनिटांनी केस शाम्पूने धुवा. आठवड्यातून किमान 3 वेळा या उपायाचे अनुसरण करा. नारळाचे तेल आणि आवळा केस काळे होण्यासाठी 2 चमचे आवळा पावडर 3 चमचे नारळाच्या तेलात घाला. तेल आणि पावडर एकजीव होईपर्यंत एका भांड्यात गरम करावं. तेल थंड करून त्यानं केसांच्या मुळांवर मालिश करा. रात्रभर तसंच ठेवा आणि सकाळी शाम्पूने धुवा. आवळ्यामध्ये जीवनसत्त्व सी असल्यामुळे कोलेजन वाढवण्याची क्षमता आहे. केसांच्या वाढीसाठी ते आवश्यक आहे. ऑलिव्ह आणि काळया बियाणांचं तेल काळ्या बियाणांचं तेल म्हणजे काळया जिऱ्याचं तेल आणि ऑलिव्ह ऑईलचे मिश्रण पांढर्‍या केसांपासून मुक्त होण्यास मदत करतं. केस काळे होण्याबरोबरच केसांचं पोषणदेखील करतं. केस चमकदार आणि मजबूत होतात. एका कपात 1 छोटा चमचा काळ्या जिऱ्याचं तेल घ्या, त्यात 1 चमचा ऑलिव्ह तेल मिसळा. या मिश्रणाने केसांच्या मुळांना मालिश करा आणि एक तास तसंच ठेवा. नंतर केस कोमट पाण्यानं धुवा. तुम्ही हा उपाय दररोजदेखील करू शकता. अधिक माहिती साठी वाचा आमचा लेख - केस गळणे न्यूज__18 वर प्रकाशित आरोग्य विषयक लेख भारतातील पहिल्या_,_ विस्तृत आणि प्रमाणित वैद्यकीय माहितीचा स्त्रोत असलेल्या myUpchar.com यांनी लिहिलेले आहेत_. myUpchar.com_ या संकेत स्थळासाठी लेखन करणारे संशोधक आणि पत्रकार_,_ डॉक्टरांच्या सोबत काम करून_,_ आपल्या साठी आरोग्य विषयक सर्वंकष माहिती सादर करतात_._

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात