चार्जिंग स्टेशन उघडा आणि करा मोठी कमाई, ही आहे केंद्र सरकारची योजना

चार्जिंग स्टेशन उघडा आणि करा मोठी कमाई, ही आहे केंद्र सरकारची योजना

देशभरात इलेक्ट्रीक व्हेईकल्ससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार आहे. त्यासाठी इफ्रास्ट्रक्चर तयार करण्यासाठी सरकार प्रयत्न करतंय. त्यात तुम्हीही भाग घेऊन तुमचा व्यावसाय सुरू करू शकता.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 जानेवारी:  देशभरात वाढतं प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकार वेगानं हालचाली करतंय. त्यासाठी देशभरात केंद्र सरकार इलेक्ट्रीक वाहनं खरेदी करण्यासाठी प्रोत्साहन देतंय. तसेच राष्ट्रीय राज्यमार्ग आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही देशात इलेक्ट्रीक गाड्यांच्या संख्येत वाढ व्हावी यासाठी प्रोत्साहन दिलं आहे. येवढचं नाही तर देशात व्हेईकल इंडस्ट्रीचं भविष्य इलेक्ट्रीक गाड्या असल्याचं गडकरी म्हणाले.  विद्यूतवर चालणाऱ्या गाड्यांच्या संख्येत वाढ व्हावी यासाठी केंद्र सरकारनं इलेक्ट्रीक गाड्यांसाठी लागणाऱ्या पार्ट्सवरील जीएसटीही कमी केला आहे. देशातील प्रदूषण कमी करण्यात इलेक्ट्रीक वाहनांचा मोठा वाटा असणार आहे. इलेक्ट्रीक गाड्यांच्या चार्जिंगसाठी लागणाऱ्या सुविधा देण्यासाठी सरकार आता खास प्रयत्न करतंय. त्यासाठी सरकार देशभरात चार्जिंग स्टेशन तयार करणार आहे.

चार्जिंग स्टेशन उघडून मोठी कमाई करता येणार

देशात सध्या केंद्र सरकार इलेक्ट्रीक वाहनांसाठी खास सुविधा देतंय. त्यामुळं भविष्यात इलेक्ट्रीक गाड्यांची संख्या वाढणार आहे. त्यामुळं इलेक्ट्रीक गाड्या खरेदी करणाऱ्या लोकांना चार्जिंगची सुविधा मिळावी यासाठी केंद्र सरकार वेगवान हालचाली करतंय. देशभरात इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशिक्षण देऊन लोकांना तयार करण्यात येणार आहे. प्रशिक्षण घेतलेले लोक त्यानंतर इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन निर्माण करू शकणार आहे. यातून तरुणांना रोजगार तर उपलब्ध होणारच आहे शिवाय चांगली कमाई करता येणार आहे.

दिल्लीत दोन दिवसांचं प्रशिक्षण

इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी केंद्र सरकार खास प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. त्यासाठी लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयानं काम सुरू केलंय. दिल्लीत दोन दिवसाचं प्रशिक्षण देण्यात येणार आहे. 25 आणि 26 जानेवारीला हे प्रशिक्षण असणार आहे. यात सहभागी होणाऱ्या लोकांना स्वत:चं चार्जिंग स्टेशन उघडण्यासाठी प्रशिक्षण देण्यात येणार आहे. नवी दिल्लीतील इस्ट कैलासच्या शुहूल कॉन्टिनेन्टमध्ये प्रशिक्षण कार्यक्रम होणार आहे. सकाळी 10 वाजेपासून ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा कार्यक्रम होणार आहे.

प्रशिक्षणात काय माहिती मिळणार ?

दोन दिवसाच्या प्रशिक्षणात तुम्हाला इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशनची संपूर्ण माहिती मिळणार आहे. यात चार्जिंग स्टेशनचे किती प्रकार आहे आणि ते प्रकार कोणकोणते आहे याची माहिती देण्यात येणार आहे. तसेच इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन कसं सुरू करावं आणि त्याचे फायदा काय आहे याची माहिती प्रशिक्षणातून देण्यात येणार आहे.

प्रशिक्षणाची फी किती असणार आहे

इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशनसाठीच्या प्रशिक्षणासाठी केवळ 100 रुपयात नोंदणी करता येणार आहे. दोन दिवसाच्या प्रशिक्षणासाठी 6 हजार 500 रुपये द्यावे लागणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर तुम्हाला भारत सरकारकडून प्रमाणपत्र दिलं जाणार आहे. हे प्रमाणपत्र मिळाल्यानंतर तुम्हाला अधिकृतरित्या इलेक्ट्रीक चार्जिंग स्टेशन सुरू करताय येणार आहे. त्यासाठी काही नियम आणि अटी सुद्धा असल्याची माहिती आहे.

प्रशिक्षणासाठी काय कागदपत्रे लागणार?

प्रशिक्षण कार्यक्रमासाठी तुम्हाला जास्त कागदपत्रांची गरज लागणार नाही. तुमच्या आधार कार्डची झेरॉक्स घेऊन तुम्हाला जावं लागणार आहे. तसेच तुमच्या शैक्षणिक पात्रतेच्या झेरॉक्स कॉपी आणि दोन पासपोर्ट साईज फोटो घेऊन जावं लागणार आहे.

हेही वाचा - निर्भयाच्या गुन्हेगारांना 1 फेब्रुवारीला फाशी होणं कठीण? हे आहे कारण

CAAवर कपिल सिब्बल यांचं मोठं वक्तव्य, काँग्रेसलाच दाखवला आरसा

अभिनेत्री शबाना आझमींच्या अपघातानंतर PM मोदींनी केलं ट्वीट

First published: January 19, 2020, 1:59 PM IST

ताज्या बातम्या