मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुमच्या Phone मध्ये आवाज क्लियर येत नाहीये, घसबसल्या अशी सोडवा समस्या; पाहा सोप्या ट्रिक्स

तुमच्या Phone मध्ये आवाज क्लियर येत नाहीये, घसबसल्या अशी सोडवा समस्या; पाहा सोप्या ट्रिक्स

काही ट्रिक्सद्वारे स्मार्टफोनचा आवाज क्लियर न येण्याची समस्या दूर होऊ शकते. या ट्रिक्स अँड्रॉईड (Android) स्मार्टफोनसाठी वापरू शकता.

काही ट्रिक्सद्वारे स्मार्टफोनचा आवाज क्लियर न येण्याची समस्या दूर होऊ शकते. या ट्रिक्स अँड्रॉईड (Android) स्मार्टफोनसाठी वापरू शकता.

काही ट्रिक्सद्वारे स्मार्टफोनचा आवाज क्लियर न येण्याची समस्या दूर होऊ शकते. या ट्रिक्स अँड्रॉईड (Android) स्मार्टफोनसाठी वापरू शकता.

नवी दिल्ली, 1 जून : स्मार्टफोनवर बोलताना अनेकदा आवाजाची (Voice) समस्या येते. बोलाताना आवाज क्लियर येत नसल्याने, अतिशय Irritation होतं. अशात युजर्स वैतागतात आणि सर्विस सेंटर गाठतात. परंतु तुम्ही घसबसल्या या समस्येचं निराकरण करू शकता. काही ट्रिक्सद्वारे स्मार्टफोनचा आवाज क्लियर न येण्याची समस्या दूर होऊ शकते. या ट्रिक्स अँड्रॉईड (Android) स्मार्टफोनसाठी वापरू शकता.

जर फोनमध्ये आवाज क्लियर येत नसेल, तर तुमच्या मायक्रोफोन, ईयरफोन किंवा स्पीकरमध्ये प्रोब्लेम असू शकतो. अनेकदा यात कचरा जमा झाल्यानेही Voice Quality कमी होते. अशावेळी सॉफ्ट ब्रिसल्स ट्रूथब्रश घ्या आणि मायक्रोफोन, ईयरफोन आणि स्पीकर साफ करा. यामुळे व्हॉईस क्वालिटी सुधारण्यास मदत होईल.

VoLTE -

आजकाल अँड्रॉईड फोनमध्ये हाय-क्वालिटी कॉलिंगची सुविधा दिलेली असते. याला HD व्हॉईस कॉलिंग किंवा VoLTE असं म्हणतात. हे ऑन किंवा अ‍ॅक्टिव्हेट केल्यानंतर कॉलिंगची व्हॉईस क्वालिटी चांगली होते. आजकाल अनेक फोनमध्ये हे फीचर इनबिल्ट येतं.

जर तुम्ही जुना फोन वापरत असाल, तर तुमच्या ऑपरेटशी कॉन्टॅक्ट करुन हे फीचर ऑन करण्याबाबत विचारू शकता. काही फोनमध्ये Setting मध्ये Advanced calling ऑन करुन HD Calling चा अनुभव घेता येऊ शकतो.

(वाचा - तुम्हीही Phone Charge करताना ही चूक तर करत नाही ना? जाणून घ्या योग्य पद्धत)

Wi-Fi Calling -

आवाजाची समस्या सोडवण्यासाठी Wi-Fi Calling चांगला पर्याय आहे. ज्यावेळी सिग्नल चांगला येत नाही, त्यावेळी तुम्ही हा पर्याय ऑन करू शकता. नेटवर्क चांगलं नसल्यास, कॉलिंगवेळी आवाज क्लियर येत नाही. परंतु यात व्हॉईस क्वालिटी चांगली येते आणि कोणत्याही प्रकारचा ईकोदेखील जाणवत नाही. नेटवर्क चांगलं नसल्यास, हा चांगला पर्याय आहे.

(वाचा - दारू पिऊन गाडी चालवणं दूरच,आता ती स्टार्टच होणार नाही;विद्यार्थ्याने शोधला मार्ग)

या सर्व ट्रिक्सनंतरही कॉलिंगवेळी आवाज क्लियर येत नसेल, तर कॉल करण्यासाठी Google Duo, WhatsApp, Messenger चा वापर करू शकता.

First published:
top videos

    Tags: Smartphone, Tech news