जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / कॉल रेकॉर्डिंग करताय तर हे वाचाच! 11 मे पासून बंद होणार ही सुविधा

कॉल रेकॉर्डिंग करताय तर हे वाचाच! 11 मे पासून बंद होणार ही सुविधा

तुमचा कॉल Record तर केला जात नाही ना? ‘या’ मार्गानं येईल ओळखता

तुमचा कॉल Record तर केला जात नाही ना? ‘या’ मार्गानं येईल ओळखता

कधी एखादा महत्त्वाचा फोन आला असेल आणि आपण घाईत असू तर आपण तो कॉल रेकॉर्ड करून घेतो. याशिवाय अनेकांना कॉल रेकॉर्ड करण्याची सवय असते. फोनवर कॉल रेकॉर्डिंग (call recording) करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 26 एप्रिल: कधी एखादा महत्त्वाचा फोन आला असेल आणि आपण घाईत असू तर आपण तो कॉल रेकॉर्ड करून घेतो. याशिवाय अनेकांना कॉल रेकॉर्ड करण्याची सवय असते. फोनवर कॉल रेकॉर्डिंग (call recording) करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कॉल रेकॉर्डिंगमुळे अँड्रॉइड (android) फोनवरील सुरक्षा आणि गोपनीयतेच्या निर्माण झालेल्या समस्यांमुळे गुगलने (Google) मोठी पावलं उचलली आहेत. अँड्रॉइड स्मार्टफोन्सवरील थर्ड-पार्टी कॉल रेकॉर्डिंग अ‍ॅप्ससाठीचं गुगलचं नवीन धोरण कडक केलं जाणार आहे. रिपोर्ट्सनुसार, 11 मे पासून थर्ड पार्टी अ‍ॅप्स कॉल रेकॉर्डिंग सुविधा देऊ शकणार नाहीत. Google च्या नवीन पॉलिसीनुसार, अ‍ॅप्सना प्ले स्टोअरवर (Play Store) कॉल रेकॉर्डिंगसाठी Accessibility API वापरण्याची परवानगी दिली जाणार नाही. पॉलिसी लागू झाल्यानंतर Truecaller वरील फ्री कॉल रेकॉर्डिंग हे फीचर काढून टाकलं जाईल. हे फीचर पूर्णपणे काढून टाकण्यात आलेलं नाही; पण हे फीचर 11 मे रोजी हटवलं जाईल, असं Truecaller चं म्हणणं आहे. Digit.in ने या संदर्भात वृत्त दिलंय. हे वाचा- इलेक्ट्रिक दुचाकीमध्ये आग लागण्याच्या घटनांनंतर Ola कंपनीने घेतला महत्वाचा निर्णय थर्ड पार्टी अ‍ॅप्सवर बंदी Google ने Android 10 आणि Android 6.0 मध्ये कॉल रेकॉर्डिंग API बंद केलं आहे तेव्हापासून, डेव्हलपर मायक्रोफोनवर कॉल रेकॉर्ड करण्यासाठी अ‍ॅक्सेसिबिलिटी API वापरत आहेत. नवीन Play Store धोरण अपडेट आता थर्ड पार्टी अ‍ॅप्सनी रिमोट कॉल रेकॉर्डिंगसाठी अ‍ॅक्सेसिबिलिटी API ची केलेल्या रिक्वेस्टला परवानगी देणार नाही. हा बदल 11 मे 2022 पासून लागू होईल. तसंच हा बदल थर्ड-पार्टी अ‍ॅप्सना आपोआप लागू होईल आणि फोनमध्ये उपस्थित असलेल्या प्री-लोडेड अ‍ॅप्सवर परिणाम होणार नाही, असं Google ने स्पष्ट केलंय. गुगलचं स्पष्टीकरण ‘या संदर्भात अनेकदा असं घडतं की फोनवर बोलणाऱ्या समोरच्या व्यक्तीला आपला कॉल रेकॉर्ड होतोय, हे माहीत नसतं. म्हणून जर अ‍ॅप फोनवर डीफॉल्ट असेल किंवा ते प्री-लोडडदेखील असेल, तर येणार्‍या ऑडिओ स्ट्रीमपर्यंत पोहोचण्यासाठी अ‍ॅक्सेसिबिलिटी म्हणजे प्ले स्टोअरची परवानगी घेण्याची आवश्यकता नाही त्यामुळेच गुगलच्या नव्या नियमाचं उल्लंघन होणार नाही. अर्थात, गुगल आताच्या धोरणाचं स्पष्टीकरण देत आहे, नवीन धोरण 11 मे पासून सर्व अ‍ॅप्सवर लागू होईल,’ असं नुकत्याच स्ट्रीम केलेल्या डेव्हलपर वेबिनारमध्ये Google ने स्पष्ट केलंय. हे वाचा- ALERT! लाखो अँड्रॉइड स्मार्टफोन्स धोक्यात, हॅकर्सकडून मीडिया फाइल्सचा आधार गुगल डायलरचा वापर करणारे फोन भारतातील OnePlus, Oppo, Realme, Xiaomi आणि Poco फोन प्रायमरी डायलर म्हणून गुगल डायलर वापरतात. गुगल डायलर काही भागांत रेकॉर्डिंगला परवानगी देतो, परंतु कॉलर आणि रिसिव्हर दोघांनाही त्याचा आवाज ऐकू येतो. यामध्ये ऑटोमॅटिक कॉल रेकॉर्डिंगची सुविधा नाही. Samsung आणि Vivo अजूनही कस्टम डायलर आणि ऑटो कॉल रेकॉर्डिंगची (Auto Call Recording) सुविधा देतात. गुगलच्या या नव्या नियमाचा काय परिणाम होतो हे लवकरच स्पष्ट होईल.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात