Home /News /technology /

इलेक्ट्रिक दुचाकीमध्ये आग लागण्याच्या घटनांनंतर Ola कंपनीने घेतला महत्वाचा निर्णय

इलेक्ट्रिक दुचाकीमध्ये आग लागण्याच्या घटनांनंतर Ola कंपनीने घेतला महत्वाचा निर्णय

मागील काही दिवसांपासून इलेक्ट्रिक दुचाकीमध्ये आग लागण्याच्या घटना वाढल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अनेक कंपन्यांनी आपल्या आपली वाहने परत मागवली आहेत.

    नवी दिल्ली, 24 एप्रिल : ओला इलेक्ट्रिकने (Ola electric company) 1,441 ई-स्कूटर (E scooter) परत मागवले आहेत. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, वाहनांना आग लागण्याच्या घटना पाहता हे पाऊल उचलण्यात आले आहे. पुण्यातील 26 मार्चला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी सुरू असून प्राथमिक तपासात ही एक वेगळी घटना असल्याचे कंपनीने म्हटले आहे. भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी कंपनी पुन्हा एकदा ई-स्कूटरची चौकशी करणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे. ओला इलेक्ट्रिकने पुढे सांगितले की, या स्कूटर्सची आमच्या अभियंत्यांकडून चाचणी घेतली जाईल. भास्करने याबाबत वृत्त दिलं आहे. मानकांनुसार बॅटरी बनवली ओला इलेक्ट्रिकने सांगितले की, त्यांची बॅटरी सिस्टीम आधीपासूनच नियमांनुसार तयार करण्यात आली आहे. युरोपियन मानक ECE 136 व्यतिरिक्त, त्यांची भारतासाठी नवीन प्रस्तावित मानक AIS 156 साठी चाचणी केली गेली आहे. प्युअर ईव्ही इंडियाकडून 2,000 युनिट्स परत मागवले हैदराबादस्थित ईव्ही कंपनी प्युअर ईव्हीनेही ई-स्कूटरचे 2,000 युनिट्स परत मागवले आहेत. प्युअर ईव्ही स्कूटरच्या अलीकडच्या काळात तेलंगणा आणि तामिळनाडूमध्ये आगीच्या अनेक घटना पाहिल्या आहेत. या चुकीमुळे कंपनीने हे पाऊल उचलले आहे. इतर कंपन्यांच्या ई-स्कूटर्सनाही आग याशिवाय जितेंद्र ईव्हीच्या 20 इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये नुकतीच आग लागल्याची घटना घडली होती. ओकिनावा आणि ओलाच्या ई-स्कूटर्सना आग लागण्याच्या घटनाही घडल्या आहेत. काही काळापूर्वी ओकिनावाने त्यांच्या 3000 हून अधिक इलेक्ट्रिक स्कूटरसाठी रिकॉल देखील जारी केले आहे. वाढत्या पेट्रोल-डिझेलच्या काळात या CNG Cars ठरतील चांगला पर्याय, मिळेल 30 किमीहून अधिक मायलेज ई-स्कूटरला आग लागल्याबद्दल तज्ञ काय म्हणतात? जेव्हा भास्करने ऑटो तज्ज्ञ टुटू धवन यांना इलेक्ट्रिक वाहनांमध्ये आग लागण्याच्या कारणांबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले, "इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे चीनमधून येणाऱ्या खराब दर्जाच्या बॅटरी, ज्या प्रमाणितही नाहीत." ते म्हणाले, "दुसरे कारण म्हणजे रॅपिड किंवा योग्यरित्या चार्ज होत नाही." ते म्हणाले की, इलेक्ट्रिक वाहनांना आग लागण्याचे मुख्य कारण बॅटरी असते. धवन म्हणाले की, केवळ इलेक्ट्रिकच नाही तर डिझेल-पेट्रोल वाहनांमध्ये 5-8% आग ही बॅटरीमुळे लागते. दुसरीकडे, देशातील इलेक्ट्रिक वाहन कंपनी एथर एनर्जीचे संस्थापक तरुण मेहता यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की उत्पादने डिझाइन करण्यासाठी पुरेसा वेळ दिला जात नाही. सरकारी संस्थांनी तयार केलेले चाचणी मानक सर्व वास्तविकतेची अचूक चाचणी करण्यासाठी पुरेसे नाही.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Electric vehicles

    पुढील बातम्या