मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

कमीत कमी किमतीत नवीकोरी कार; लाखो रुपयांची बचतही करा

कमीत कमी किमतीत नवीकोरी कार; लाखो रुपयांची बचतही करा

test drive

test drive

शो-रूमऐवजी या ठिकाणाहून तुम्ही कार खरेदी केली तर तुम्हाला अधिक फायदा होईल.

नवी दिल्ली, 10 फेब्रुवारी: नवीन कार (car) घेताना आपण किती बचत करू शकतो, यावर उत्तर असेल शोरूमवाले देतात तितकाच. नवीन कार घेताना तुम्ही एक ते दीड लाख रुपये वाचवू शकता फक्त तुम्हाला ही कार शोरूममधून नाही तर दुसऱ्या एका ठिकाणाहून घ्यावी लागेल. शोरूमऐवजी नवीन कार दुसरीकडेही मिळते यावर विश्वास ठेवणं कठीण असलं तरी ते सत्य आहे. मात्र आम्ही तुम्हाला काही अशा ठिकाणांबद्दल माहिती देणार आहोत जिथं नवीन कार्स शोरूमपेक्षा स्वस्त किमतीत मिळतात.

या कार्स अनरजिस्टर्ड (Unregistered Cars) असतात. ज्या शोरूममध्ये टेस्ट ड्राईव्हसाठी (Test Drive Cars) ठेवल्या जातात. या कार्सची विक्री शोरूम्स करू शकत नाहीत, कारण तांत्रिकदृष्ट्या त्या वापरलेल्या कार्स असतात. त्यामुळे वाहन कंपन्या कार डिलर्सना या कार्स विकतात. ते सवलतीच्या किमतीत या कार्सची विक्री करतात. ज्या कार्स टेस्ट राईडसाठी वापरल्या जातात त्या जेमतेम दोन ते तीन हजार किलोमीटर चालवलेल्या असतात, कधी कधी तर जेमतेम 500 किलोमीटरही चालवलेल्या असतात. या कार्सचे आरटीओमध्ये (RTO) रजिस्ट्रेशन केलेलं नसतं, त्यामुळे त्यांना अनरजिस्टर्ड कार्स (Unregistered Cars) म्हटलं जातं.

हे वाचा - 45 वर्षे जुना कॉम्प्युटर तोसुद्धा 11 कोटी रुपयांना; इतकं काय आहे यात खास?

 या कार्सचे रजिस्ट्रेशन केलेलं नसतं त्यामुळं जेव्हा डीलर (Dealer) या कार्सची ग्राहकांना विक्री करतात तेव्हा तेच त्या गाडीचे पहिले मालक (First Owner) असतात. या कार्स अतिशय कमी चालवलेल्या असल्यानं त्यांची तुलना सेकंडहँड (Secondhand) किंवा खराब झालेल्या कार्सशी होऊ शकत नाही. या कार्सना शोरूममधून विकल्या जाणाऱ्या नवीन कारबरोबर मिळणाऱ्या इन्श्युरन्स, वॉरंटी, सर्व्हिस डिस्काउंट अशा सर्व सुविधा मिळतात. फक्त या कार्स टेस्ट राईडच्या असल्यानं शोरूम्स किंवा कंपन्या नव्या कार्स म्हणून त्यांची विक्री करू शकत नाहीत.

हे वाचा -   FASTag बाबत कार चालकांना दिलासा; वाचा नव्या नियमानुसार काय परिणाम होणार

अशी कार खरेदी करायची असेल तर, तुमच्या शहरातील कार डीलर्स तुम्हाला त्या उपलब्ध करून देऊ शकतात. दिल्ली, मुंबई अशा मोठ्या शहरांमधील डीलर्स सेकंडहँड कार्सबरोबर अशा अनरजिस्टर्ड कार्सही विक्रीसाठी ठेवतात. अशी कार खरेदी करत असाल तर तुम्ही नवीनच कार घेत असता; मात्र तेही कमी किमतीत. दिल्लीतील एका डीलरनं शोरूम मधील किंमत आठ लाख रुपये असणाऱ्या महिंद्रा केयुव्हीचं टॉपएन्ड मॉडेल अनरजिस्टर्ड प्रकारात साडे पाच लाख रुपयांमध्ये विक्रीला काढलं होतं. ही कार फक्त दोन हजार किलोमीटर चालली होती. एका डीलरनं अजिबात न चालवलेल्या अनरजिस्टर्ड आय टेन कारवर एक लाखाची सवलत दिली होती.

First published:

Tags: Car, RTO, Tech Mahindra