मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

BSNL ग्राहकांना झटका! या 7 प्लॅनमध्ये कंपनीने कमी केले बेनिफिट्स, वाचा सविस्तर

BSNL ग्राहकांना झटका! या 7 प्लॅनमध्ये कंपनीने कमी केले बेनिफिट्स, वाचा सविस्तर

गेल्या काही दिवसांपासून टेलिकॉम कंपन्या हळूहळू आपले प्लॅन्स महाग करत आहेत. खासगी कंपन्यांनंतर आता सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड, म्हणजेच बीएसएनएलनेही आपले प्लॅन्स (BSNL new Plans) महाग केले आहेत.

मुंबई, 12 ऑगस्ट: गेल्या काही दिवसांपासून टेलिकॉम कंपन्या हळूहळू आपले प्लॅन्स महाग करत आहेत. खासगी कंपन्यांनंतर आता सरकारी टेलिकॉम कंपनी भारत संचार निगम लिमिटेड, म्हणजेच बीएसएनएलनेही आपले प्लॅन्स (BSNL new Plans) महाग केले आहेत. कंपनीने आपल्या स्पेशल टेरिफ प्लॅन्ससोबत प्रीपेड प्लॅन्समध्येही (BSNL special tariff vouchers) मोठे बदल केले आहेत.

बीएसएनएलने आपल्या प्लॅन्सची किंमत (BSNL plan rates) तीच ठेवली असली, तरी त्यांची वैधता (BSNL Plans validity) कमी केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कंपनीने आपल्या 49 रुपये, 75 रुपये आणि 94 रुपयांचे स्पेशल टेरिफ व्हाउचर्स; आणि 106 रुपये, 107 रुपये, 197 रुपये आणि 397 रुपयांच्या प्लॅन्सची व्हॅलिडिटी कमी करण्यात आली आहे. एक ऑगस्ट (BSNL Plans new rates) पासून कंपनीने हे बदल लागू केले आहेत.

कोणत्या प्लॅनमध्ये काय बदल

>>49 रुपयांच्या प्लॅनमध्ये यापूर्वी 28 दिवसांची व्हॅलिडिटी मिळत होती. आता याची वैधता (BSNL 49 rupee plan validity) कमी करुन 24 दिवसांवर आणण्यात आली आहे. आपल्या कार्डला सुरू ठेवण्यासाठी हा रिचार्ज करण्यात येतो, यामध्ये कॉलिंग रेट हे 45 पैसे प्रति मिनिट आहेत. तर 2 जीबी डेटा आणि 100 एसएमएसही यावर फ्री मिळतात.

हे वाचा-PM Modi आज करणार 1625 कोटी रुपयांचे वाटप, वाचा कुणाला मिळणार फायदा?

>>75 रुपयांच्या प्लॅनमध्ये (BSNL 75-rupee plan) चक्क दहा दिवसांनी व्हॅलिडिटी कमी करण्यात आली आहे. पूर्वी 60 दिवस वैधता असणाऱ्या या प्लॅनची व्हॅलिडिटी आता केवळ 50 दिवस करण्यात आली आहे. यात 100 मिनिट व्हॉईस कॉलिंग, 2 जीबी डेटा आणि 50 दिवसांसाठी फ्री बीएसएनएल ट्यून्स मिळतात. मोफतचे 100 मिनिट संपल्यानंतर कॉलिंग रेट हे 30 पैसे प्रति मिनिट एवढे लागू होतात.

>>कंपनीने आपल्या 94 रुपयांच्या प्लॅनची वैधता 90 वरुन 75 दिवसांवर आणली आहे. तसेच, 106 आणि 107 रुपयांच्या प्लॅनची वैधता 100 ऐवजी 84 दिवस करण्यात आली आहे. या सर्व प्लॅन्समध्ये 60 दिवसांसाठी बीएसएनएल ट्यून्स (BSNL Tunes) आणि 3 जीबी इंटरनेट फ्री मिळते.

>>197 रुपयांच्या रिचार्जवरील वैधता ही 180 दिवसांवरुन कमी करुन केवळ 150 दिवस ठेवण्यात आली आहे. यात अनलिमिटेड व्हॉईस कॉल, दररोज 2 जीबी डेटा, दररोज 100 फ्री एसएमएस आणि झिंग म्युझिक अॅपचे (Zing Music app) सबस्क्रिप्शन असे बेनिफिट्स मिळतात.

हे वाचा-सामान्यांना दिलासा! सलग 25व्या दिवशीही नाही वाढले पेट्रोल-डिझेलचे दर

>>तर, 397 रुपयांच्या प्लॅनची व्हॅलिडिटी ही 365 वरुन केवळ 300 दिवस करण्यात आली आहे. यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉल, दररोज 2 जीबी डेटा, दररोज 100 फ्री एसएमएस, लोकधुन कंटेंट (Lokdhun content) आणि बीएसएनएल डिफॉल्ट ट्यून्स अशा गोष्टी फ्री मिळतात.

काही दिवसांपूर्वीच एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाने आपले दर वाढवले होते. त्यानंतर आता बीएसएनलनेही आपले दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

First published:

Tags: BSNL