Home /News /money /

Petrol-Diesel Price Today: सामान्यांना दिलासा! सलग 25व्या दिवशीही नाही वाढले पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol-Diesel Price Today: सामान्यांना दिलासा! सलग 25व्या दिवशीही नाही वाढले पेट्रोल-डिझेलचे दर

Petrol-Diesel Price Today: IOCL ने गुरुवारी 12 ऑगस्टचे पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी केले आहेत. दरम्यान सरकारी कंपन्यांनी सलग 25 दिवसात पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत कोणतीही वाढ केलेली नाही.

    नवी दिल्ली, 12 ऑगस्ट: पेट्रोल-डिझेलच्या (Petrol and Diesel Price) आज गुरुवारी देखील वाढ झाली नाही आहे. गेल्या 25 दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol-Diesel Price Today) स्थिर आहेत. दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतीत (Crude Oil Price) घसरण झाली आहे. मात्र यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरावर कोणताही परिणाम झालेला नाही. क्रूड ऑइलच्या किंमती कमी होऊन देखील पेट्रोल-डिझेलचे दर कमी झालेले नाहीत.  IOCL च्या वेबसाइटनुसार, मुंबईमध्ये पेट्रोलचे दर 107.83 रुपये प्रति लीटर तर डिझेलचे दर 97.45 रुपये प्रति लीटर आहेत. मे महिन्यात झाली विशेष वाढ मे महिन्यानंतर सातत्याने पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ पाहायला मिळाली होती. मात्र त्यानंतर आता 25 दिवस पेट्रोल आणि डिझेलचे  स्थिर आहेत. त्याआधी 42 दिवस झालेल्या इंधनवाढीबाबत बोलायचे झाले कर, पेट्रोल जवळपास 11.52 रुपये प्रति लीटरने महागले होते. तर डिझेल 9.08 रुपये प्रति लीटरने महागले होते. दररोज सकाळी 6 वाजता बदलतात इंधनाचे दर दररोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती बदलतात. नवीन दर सकाळी 6 वाजल्यापासून लागू होतात. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अबकारी शुल्क, डीलर कमिशन आणि इतर गोष्टी जोडल्यानंतर त्याची किंमत जवळजवळ दुप्पट होते. परदेशी चलनांच्या आधारावर आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये कच्च्या तेलाच्या किंमती काय आहेत, या आधारावर रोज पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होत असतात. हे वाचा-पोस्टाच्या 8 योजनांमध्ये पैसे होतील डबल! कोणत्या स्कीमसाठी किती लागेल कालावधी? पेट्रोल-डिझेलचे आजचे दर >> दिल्ली - पेट्रोल 101.84 रुपये आणि डिझेल 89.87 रुपये प्रति लीटर >> मुंबई - पेट्रोल 107.83 रुपये और डीजल 97.45 रुपये प्रति लीटर >> चेन्नई - पेट्रोल 101.49 रुपये आणि डिझेल 94.39 रुपये प्रति लीटर >> कोलकाता - पेट्रोल 102.08 रुपये आणि डिझेल 93.02 रुपये प्रति लीटर >> भोपाळ - पेट्रोल 110.20 रुपये आणि डिझेल 98.67 रुपये प्रति लीटर हे वाचा-Business Idea: या व्यवसायासाठी मिळेल सरकारकडून सबसिडी, होईल 8 लाखांची कमाई >> बंगळुरु - पेट्रोल 105.25 रुपये आणि डिझेल 95.26 रुपये प्रति लीटर >> लखनऊ -पेट्रोल 98.92 रुपये आणि डिझेल 90.26 रुपये प्रति लीटर >> पाटणा - पेट्रोल 104.25 रुपये आणि डिझेल 95.57 रुपये प्रति लीटर >> जयपूर - पेट्रोल 108.71 रुपये आणि डिझेल 99.02 रुपये प्रति लीटर >> गुरुग्राम - पेट्रोल 99.46 रुपये आणि डिझेल 90.47 रुपये प्रति लीटर असे तपासा पेट्रोल-डिझेलचे नवे दर पेट्रोल आणि डिझेलचे नवे दर तुम्ही एसएमएस (SMS) च्या माध्यमातून जाणून घेऊ शकता. त्याचप्रमाणे देशातील HPCL, BPCL आणि IOC या तीन तेल विपणन कंपन्या सकाळी 6 नंतर पेट्रोल-डिझेलचे नवीन दर जारी करतात. नवीन दरांसाठी आपण वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता. तसंच आपण मोबाइल फोनवर SMS द्वारे दर तपासू शकता. तुम्ही 92249 92249 वर SMS पाठवून आपण पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीबद्दल देखील जाणून घेऊ शकता. इंडियन ऑइलच्या वेबसाइटनुसार आपल्याला RSP<स्पेस> शहराचा कोड लिहावा लागेल आणि तो 92249 92249 वर पाठवावा लागेल. प्रत्येक शहराचा एक वेगळा कोड असतो. आयओसीएलच्या वेबसाइटवर तुम्हाला हा कोड मिळेल.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: Petrol, Petrol and diesel, Petrol and diesel price, Petrol Diesel hike

    पुढील बातम्या