नवी दिल्ली, 12 ऑगस्ट: देशातील महिलावर्गाला अधिक सक्षम बनवण्यासाठी आणि त्यांच्या प्रगतीसाठी सरकारकडून महत्त्वाची पावलं उचलली जात आहे. सरकारने काही योजनाही सुरू केल्या आहेत. या योजनांनी देशभरातील विविध वयोगटातील, विविध ठिकाणच्या महिला जोडल्या गेल्या आहेत. देशातील महिला बचत गटही गेल्या काही महिन्यांमध्ये विशेष सक्रीय झाले आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज देशातील 4 लाख बचत गटांमधील महिलांसाठी (women Self Help Group SHG) 1625 कोटी रुपयांचा फंड जारी करणार आहेत. ‘आत्मनिर्भर नारी-शक्ति से संवाद’ (Atmanirbhar Narishakti se Samvad) या कार्यक्रमात पंतप्रधान सहभागी होणार आहेत.
आज दुपारी 12.30 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी या महिलांच्या खात्यात पैसे पाठवतील. कोरोना काळात या बचत गटातील महिलांनी महत्त्वाची काम केली आहे. मास्क, सॅनिटायझपासून अन्नपदार्थांपर्यंत अनेक गरजूंची त्यांनी मदत केली आहे. यामुळे त्यांना स्वत:लाही सक्षम होण्यास मदत झाली आहे.
जारी होणार 1625 कोटी रुपयांचा फंड
मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज (Ministry of Food Processing Industries) ने अशी माहिती दिली आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी चार लाख बचत गटांना 1625 रुपयांचा मदत निधी जारी करतील. याशिवाय ते PMFME (Pradhan Mantri Formalisation of Micro food processing Enterprises) अंतर्गत येणाऱ्या 7,500 बचत गटांना 25 कोटींची आरंभिक रक्कम देखील जारी करतील
हे वाचा-Business Idea: या व्यवसायासाठी मिळेल सरकारकडून सबसिडी, होईल 8 लाखांची कमाई
12.30 वाजता होणार कार्यक्रम
याशिवाय या मिशनअंतर्गत 75 एफपीओ (शेतकरी उत्पादन संघटना) ना 4.13 कोटींची रक्कम प्रदान केली जाणार आहे. हा कार्यक्रम 12.30 वाजता सुरू होणार आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून हा कार्यक्रम आयोजित केला जात आहे. या कार्यक्रमादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी बचत गटांशी जोडल्या गेलेल्या महिलांशी बातचीत करणार आहेत. PMO च्या मते, या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशभरातील महिला बचत गट सदस्यांचं यश आणि त्यांच्या सक्षमीकरणाबाबत सांगण्यात येईल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: PM narendra modi