1.5 GB विसरा आता दररोज 5 GB फ्री इंटरनेट डेटा, असा आहे प्लॅन

1.5 GB विसरा आता दररोज 5 GB फ्री इंटरनेट डेटा, असा आहे प्लॅन

रिचार्जमध्ये 40 ते 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ग्राहकांना पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी कंपन्या वेगवेगळ्या ऑफर देत आहेत.

  • Share this:

टेरिफ चार्जेस वाढवल्यानंतर रिचार्जचे दर वाढले आहेत. यामुळे रिचार्जमध्ये 40 ते 50 टक्क्यांनी वाढ झाली आहे. ग्राहकांना पुन्हा आपल्याकडे खेचण्यासाठी कंपन्या वेगवेगळ्या ऑफर देत आहेत. आता बीएसएनलएने त्यांच्या ग्राहकांसाठी एक प्लॅन ऑफर केला आहे. यामध्ये ग्राहकांना जास्तीचा इंटरनेट डेटा दिला जाणार आहे. सध्या सर्वच कंपन्या दीड ते दोन जीबी इंटरनेट डेटा दरदिवशी देतात. तर बीएसएनएलने त्यांच्या एका प्लॅनमध्ये दररोज 5 जीबी डेटा दिला आहे.

टेलिकॉम टॉकने दिलेल्या वृत्तानुसार बीएसएनलचा 548 रुपयांचे PRBSTV  व्हाउचर आहे. या प्लॅनची वैधता 90 दिवसांची असणार आहे. दररोज 5 जीबी डेटा मिळणार आहे. हा डेटा संपल्यानंतर युजर्सना 80Kbps च्या स्पीडने इंटरनेट वापरता येईल. कंपनीने यात फक्त इंटरनेट फ्री दिलं आहे. यामध्ये कॉलिंग आणि एसएमएस मिळत नाहीत. कॉलिंग आणि एसएमएस साठी वेगळा रिचार्ज मारावा लागेल.

बीएसएनएलने वार्षिक प्लॅनही दिले आहेत. यामध्ये 1 हजार 999 रुपयांचा प्लॅन असून 365 दिवसांची मुदत मिळते. एकदा रिचार्ज केल्यानंतर ग्राहकांना 3 जीबी डेटा 80Kbps स्पीडने मिळेल. त्याशिवाय 100 एसएमएस दररोज मिळणार आहेत.

Vodafone ची प्री-पेड ग्राहकांना ऑफर, 56 दिवस मिळणार इंटरनेट आणि अनलिमिटेड कॉलिंग

वार्षिक रिचार्जवर कंपनी कॉलिंगसाठी 250 मिनिटे देते. तसेच बीएसएनएल टीव्ही, ट्यून्सची सेवाही दिली जाते. वर्षभरासाठी बीएसएनएलने हा प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनची मुदत 365 दिवस असणार आहे.

Jioची भन्नाट ऑफर, 129 रुपयांत 2GB डेटासह मिळणार अनेक फायदे

First published: February 10, 2020, 4:00 PM IST
Tags: BSNL

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading