मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Jioची भन्नाट ऑफर, 129 रुपयांत 2GB डेटासह मिळणार अनेक फायदे

Jioची भन्नाट ऑफर, 129 रुपयांत 2GB डेटासह मिळणार अनेक फायदे

Jio कंपनीने आता युजर्ससाठी डेटा आणि कॉलिंगसाठी स्वस्त असा एक प्लॅन दिला आहे.

Jio कंपनीने आता युजर्ससाठी डेटा आणि कॉलिंगसाठी स्वस्त असा एक प्लॅन दिला आहे.

Jio कंपनीने आता युजर्ससाठी डेटा आणि कॉलिंगसाठी स्वस्त असा एक प्लॅन दिला आहे.

  • Published by:  Kranti Kanetkar

मुंबई, 25 जानेवारी: वोडाफोन-आयडिया, एअरटेल कंपनीला टक्कर देण्यासाठी jio सज्ज आहे. रिचार्जच्या किंमती वाढल्यानंतर युजर्स जास्त मुदतीचे प्लॅन निवडण्याऐवजी स्वस्तातल्या प्लॅनला पसंती देत आहेत. अगदी 98 रुपयांपासून 2020 पर्यंतचे प्लान जिओने आपल्या ग्राहकांसाठी आणले आहेत. टेरिफ प्लॅनच्या किंमती वाढल्यानंतर कंपन्यांकडून ग्राहकांना अनेक ऑफर दिल्या जात आहेत. जिओने आता युजर्ससाठी डेटा आणि कॉलिंगसाठी स्वस्त असा एक प्लॅन दिला आहे.

Reliance Jio 129 Rupees plan: काय आहे खास

या प्लानमध्ये तुम्हाला 28 दिवसांचा व्हॅलिडिटी मिळणार आहे. यामध्ये 2 GB डेटा, जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंग, जिओ ते इतर नेटवर्कसाठी 1 हजार मिनिटं मोफत मिळणार आहेत. यासोबत 300 SMS तुम्हाला महिन्याला मिळणार आहेत.

हेही वाचा-चांगल्या Photographyसाठी 'हे' आहेत तुमच्या बजेटमधील बेस्ट मोबाईल

कोणता प्लान सर्वात बेस्ट 98, 125 की 129?

Reliance Jio 129 Rupees plan

जिओने 125 रुपयांचा प्लॅन दिला आहे. यामध्ये अनलिमिटेड कॉलिंगसह इतरही अनेक फायदे दिले जात आहेत.125 रुपयांच्या प्लॅनची मुदत 28 दिवस असणार आहे. यात दररोज 0.5 जीबी असा 14 जीबी इंटरनेट डेटा मिळणार आहे. याशिवाय 300 एसएमस फ्री मिळतील.कंपनीने जिओ टू जिओ फ्री कॉलिंग दिले आहे. तसेच इतर नेटवर्कसाठी 500 मिनिटे दिली आहेत. हा प्लॅन फक्त जिओ फोनसाठी असणार आहे. कॉलिंग, इंटरनेट डेटाशिवाय जिओ म्युझिक, मूव्ही आणि इतर अॅप्सचा अॅक्सेस फ्री असणार आहे.

Reliance Jio 98 Rupees plan

शंभर रुपयांपेक्षा कमी असलेला हा प्लान ग्राहकांसाठी खास jio कंपनीकडून देण्यात आला आहे. यामध्ये 28 दिवसांची व्हॅलिडिटी असणार आहे. 28 दिवसांसाठी ग्राहकांना 2 GB डेटा मिळणार आहे. याशिवाय 300 SMS आणि जिओ ते जिओ अनलिमिडेट कॉलिंग फ्री मिळणार आहे. इतर नेटवर्कसाठी 124 मिनिटं मिळणार आहेत. यासोबत ग्राहकांना जिओ अॅपचा मोफत लाभ घेता येणार आहे.

सर्वसाधारण विचार करायचा झाला तर 129 प्लान हा सगळ्यात चांगला असं म्हणाय़ला हरकत नाही. कारण त्यामध्ये तुम्हाला जिओ ते इतर नेटवर्कसाठी 1 हजार मिनिटं मिळतात. यासोबत महिन्याभरासाठी 300 SMS सोबत 2GB डेटाही उपलब्ध होणार आहे. त्यामुळे तुम्हाला इंटरनेटसोबत कॉलिंगचा बेनिफिट मिळणार आहे.

हेही वाचा-TATA ची सगळ्यात सुरक्षित आणि स्वस्त कार 5.29 लाख रुपयात, जाणून घ्या फीचर्स

First published:

Tags: JIO, Mobile phone