मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

BSNLचा ग्राहकांसाठी धमाकेदार प्लॅन, 120 दिवसांसाठी 240 जीबी डेटासह आणखी काही मिळणार सुविधा, वाचा In Details

BSNLचा ग्राहकांसाठी धमाकेदार प्लॅन, 120 दिवसांसाठी 240 जीबी डेटासह आणखी काही मिळणार सुविधा, वाचा In Details

सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल (BSNL) म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेडदेखील मागे राहिलेली नाही.  BSNLने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्वस्तात मस्त प्रीप्रेड प्लॅन ( BSNL Prepaid Plans) आणला आहे.

नवी दिल्ली, 05 ऑगस्ट:    टेलिकॉम कंपन्या (Telecom Company) आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी नवीन प्लॅन आणत असतात. या प्लॅनमध्ये हाय-स्पीड डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, मोफत एसएमएस, ओटीटी (OTT) अॅप्स आदी सुविधा दिल्या जातात. यामध्ये सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल (BSNL) म्हणजेच भारत संचार निगम लिमिटेडदेखील मागे राहिलेली नाही.

BSNLने ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्वस्तात मस्त प्रीप्रेड प्लॅन ( BSNL Prepaid Plans) आणला आहे. 666 रुपयांच्या या प्लॅनमध्ये हाय-स्पीड डेटासोबतच मोफत कॉलिंग, दररोज 100 एसएमएस अशा विविध सुविधा ग्राहकांना मिळणार आहेत. तसंच कमी पैशांमध्ये जास्तीतजास्त डेटाचा शोध घेणाऱ्या ग्राहकांसाठी हा प्लॅन फायद्याचा ठरेल. कारण या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा ग्राहकांना मिळणार आहे.

बीएसएनएलचा असा आहे प्लॅन

बीएसएनएल (BSNL) च्या 666 रुपयांच्या प्लॅनला 120 दिवसांची वैधता (Validity ) आहे. सध्या कोणतीही टेलिकॉम कंपनी 120 दिवसांच्या वैधतेसह प्लॅन देत नाही. जिओ (Jio), एअरटेल (Airtel) आणि व्हीआय (Vi) या कंपन्यांचे प्लॅन हे 28, 56, 84, 180 नंतर थेट 365 दिवसांपर्यंतच्या वैधतेचे आहेत. बीएसएनएल ही एकमेव कंपनी आहे जी 90 आणि 120 दिवसांपर्यंत वैधतेचे प्लॅन देते.

आक्षेपार्ह कंटेंट असणाऱ्या Apps वर Google घालणार बंदी, यावर होणारं कृत्य ऐकून हैराण व्हाल

प्लॅनचा फायदा

बीएसएनएलच्या या प्रीपेड प्लॅनसोबत (Prepaid Plans)) 120 दिवसांच्या वैधतेसोबतच दररोज 2 जीबी म्हणजेच एकूण 240 जीबी डेटा मिळतो. तुम्ही जर जास्त काळासाठी अधिक डेटा असलेल्या प्लॅनच्या शोधात असाल, तर बीएसएनएलचा हा प्लॅन तुमच्यासाठी चांगला पर्याय आहे. याशिवाय सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग (Unlimited Calling), दररोज 100 एमएमएमची (SMS) सुविधा मिळेल. त्यामुळे ग्राहकांसाठी हा प्लॅन कमी पैशात जास्तीतजास्त सुविधा देणारा ठरतोय.

जिओचा 599 रुपयांचा प्लॅन

दुसरीकडे जिओ कंपनी देखील ग्राहकांना आकर्षिक करण्यासाठी 599 रुपयांचा प्लॅन देत आहे. या प्लॅनमध्ये दररोज 2 जीबी डेटा मिळतो. प्लॅनची वैधता 84 दिवस आहे. म्हणजेच या प्लॅनमध्ये 168 जीबी डेटा दिला जातोय. तसेच, सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग, दररोज 100 एमएमएमची सुविधा या प्लॅनमध्ये देण्यात आली आहे. जिओ अॅप्सच्या (Jio app) मोफत सबस्क्रिप्शनची सुविधाही या प्लॅनमध्ये दिली आहे.

Google चं नवं फीचर; आता YouTube वर जाहिरातीशिवाय पाहता येणार व्हिडीओ

ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सगळ्याच कंपन्या प्रयत्न करत असतात. पण ग्राहक मात्र चोखंदळपणे निवड करतो. तुम्हीही बीएसएनएल की आणखी कोणता प्लॅन घ्यायचा याचा निर्णय घ्यालच.

First published:

Tags: BSNL