• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • BSNL ची धमाकेदार ऑफर; एका दिवसाला 1600 GB पर्यंत डेटा, Disney+ Hotstar आणि फ्री कॉलिंग

BSNL ची धमाकेदार ऑफर; एका दिवसाला 1600 GB पर्यंत डेटा, Disney+ Hotstar आणि फ्री कॉलिंग

बीएसएनएलच्या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यात दैनंदिन डेटा वापराची कोणतीही मर्यादा नसून तब्बल 1600 जीबीपर्यंतचा डेटा दिला जात आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 27 जुलै : बीएसएनएल (BSNL) या सरकारी दूरसंचार कंपनीनं (PSU Telecom Company) इतर मोबाइल सेवा पुरवठादार (Mobile Service Provider) कंपन्यांच्या स्पर्धेत उतरत अनेक धमाकेदार योजना आणल्या आहेत. या योजनांसह ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे. बीएसएनएलनंही आता डेटा सेवांवर (Data Service) लक्ष केंद्रित केलं असून विविध अमर्यादित इंटरनेट ब्रॉडबँड योजना (Internet Broadband Plans) सुरू केल्या आहेत. यामध्ये अमर्याद डेटा (Unlimited Data) आणि मोफत कॉलिंगसह (Unlimited Calling) अनेक फायदे दिले जात आहेत. या योजनांची किंमतही सर्वांना परवडेल अशी आहे. बीएसएनएलच्या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे यात दैनंदिन डेटा वापराची कोणतीही मर्यादा नसून तब्बल 1600 जीबीपर्यंतचा डेटा दिला जात आहे. या शिवाय डिस्ने+ हॉटस्टार (Disney + Hotstar) या OTT सबस्क्रिप्शनची विनामूल्य मेंबरशीप दिली जात आहे. कंपनीच्या या योजना 299 रुपयांपासून सुरू होतात. लाईव्ह हिंदुस्थान डॉट कॉमनं या बाबतचं वृत्त दिलं आहे. 299 रुपयांची योजना : 100 GB सीयूएल (100 GB CUL) नावाच्या या योजनेअंतर्गत कंपनी युझरला 6 महिन्यांसाठी एक खास ऑफर देते. 6 महिन्यांनंतर ही योजना आपोआप 200 जीबी सीयूएलमध्ये रुपांतरीत होते. 299 रुपये किमतीच्या योजनेत 10 एमबीपीएस वेगाने 100 जीबी डेटा कोणत्याही दैनंदिन मर्यादेशिवाय दिला जातो. महिन्याला 100 जीबीची मर्यादा संपल्यानंतर, उर्वरीत डेटा 2 एमबीपीएस वेगानं मिळतो. या योजनेचे ग्राहक अन्य कोणत्याही नेटवर्कवर मोफत अमर्याद कॉलिंगचा लाभ घेऊ शकतात. Alert! Windows 11 Update इन्स्टॉल करण्याआधी हे वाचा नाहीतर बसेल मोठा फटका 399 रुपयांची योजना: 399 रुपयांच्या योजनेत ग्राहकांना 10 एमबीपीएस वेगाने दरमहा 200 जीबी डेटा मिळतो. जोपर्यंत ग्राहक इतर कोणत्याही योजनेची निवड करत नाही तोपर्यंत यात बदल होत नाही. यातही सर्व नेटवर्क्सवर मोफत अमर्यादित कॉलिंग सुविधा आहे. 555 रुपयांची योजना: 555 रुपयांच्या योजनेत एका महिन्यासाठी 500 GB डेटा देण्यात येत आहे. तसंच यातही कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग सुविधा आहे. 779 रुपयांची योजना: बीएसएनएलच्या या योजनेत महिन्याला 10 एमबीपीएस वेगानं 779 जीबी डेटा देण्यात येत असून, ग्राहक एका दिवसात देखील हा डेटा वापरू शकतात. याशिवाय या योजनेंतर्गत डिस्ने + हॉटस्टारचे मोफत सबस्क्रीप्शन मिळत आहे. इतर योजनांप्रमाणेच कोणत्याही नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंगची ऑफरही आहेच. WhatsApp Video Call दरम्यान मध्येच संपतोय डेटा? या टिप्स फॉलो करुन राहा टेन्शन फ्री! 949 रुपयांची योजना : या योजनेत एका महिन्यासाठी 1100 जीबी डेटा मिळेल, जो एका दिवसातही वापरता येऊ शकतो. तसंच अमर्यादित कॉलिंगसह डिस्ने + हॉटस्टार प्रीमियमचे विनामूल्य सबस्क्रीप्शन मिळेल. 1299 रुपयांची योजना : ज्या ग्राहकांना स्थिर आयपीची (Static IP) आवश्यकता असते ते या ब्रॉडबँड योजनेत सहभागी होऊ शकतात. या डीएसएल ब्रॉडबँड योजनेत 10 एमबीपीएस वेगानं 1600 जीबी डेटा मिळतो. तसंच इतर योजनांप्रमाणेच कोणत्याही नेटवर्कसाठी अमर्यादित कॉलिंगची सुविधाही आहे. फक्त या योजनेत स्थिर आयपीकरता ग्राहकांना दरवर्षी 2000 रुपये शुल्क द्यावे लागते. बीएसएनएलच्या या योजना डेटावर अवलंबून असणाऱ्या असंख्य ग्राहकांसाठी अत्यंत लाभदायी आहेत. इतर कोणत्याही सेवा पुरवठादाराच्या स्पर्धेत बीएसएनएल चांगलीच टक्कर देत आहे.
  First published: