• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • WhatsApp Video Call दरम्यान मध्येच संपतोय डेटा? या टिप्स फॉलो करुन राहा टेन्शन फ्री!

WhatsApp Video Call दरम्यान मध्येच संपतोय डेटा? या टिप्स फॉलो करुन राहा टेन्शन फ्री!

अनेकदा व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हिडिओ कॉल सुरू असतानाच डेटा संपल्यानं कॉल बंद पडल्याचा अनुभव येतो. अशावेळी व्हॉट्सअ‍ॅपमुळे डेटा अधिक लागत असल्याची तक्रार ग्राहक करतात. जाणून घ्या काही सोप्या टिप्स वापरुन तुम्ही डेटा सेव्ह कसा करू शकाल

  • Share this:
मुंबई, 27 जुलै: आजकाल मोबाइल डेटाचा (Mobile Data) वापर अधिक वाढला आहे. व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp), फेसबुक (Facebook) यासह इतर अनेक अ‍ॅप्सचा वापर वाढल्यानं डेटाचं (Data) महत्त्व अधिक वाढलं आहे. मित्र, कुटुंबीय, ऑफिसचं काम करण्यासाठीही व्हॉट्सअ‍ॅपचा वापर केला जातो. तसंच बहुतांश तरुण पिढी मोबाइलवरून व्हॉइस कॉल (Voice Call) करण्यापेक्षा व्हॉट्सअ‍ॅप व्हॉइस कॉल तसंच व्हिडीओ कॉल (Video Call) करण्याला अधिक प्राधान्य देते यामुळेही डेटाची मागणी अधिक असते. व्हॉट्सअ‍ॅपनं दिलेल्या माहितीनुसार, 100 अब्जांहून अधिक पर्सनल मेसेजेस (Personal Messages) या प्लॅटफॉर्मवर शेअर केले जातात. व्हिडीओ किंवा व्हॉईस कॉलची आकडेवारी कंपनीनं सांगितलेली नाही, मात्र ही संख्याही प्रचंड आहे, यात शंका नाही. यावरून सहज लक्षात येते की याकरता डेटाचा किती वापर होत असेल. हे वाचा-Android, iPhone users, सोप्या पद्धतीने बनवू शकतात WhatsApp Stickers अनेकदा व्हॉट्सअ‍ॅपवरून व्हिडीओ कॉल सुरू असतानाच डेटा संपल्यानं कॉल बंद पडल्याचा अनुभव येतो. अशावेळी व्हॉट्सअ‍ॅपमुळे डेटा अधिक लागत असल्याची तक्रार ग्राहक करतात. त्यामुळं डेटा वाचवण्यासाठीचे (Save Data) उपाय शोधले जातात. अशाच काही उपायांबाबत ही माहिती. फॉलो करा या स्टेप्स - तुमच्या Android किंवा Apple स्मार्टफोनवर व्हॉट्सअ‍ॅप उघडा. - अ‍ॅपच्या उजव्या कोपर्‍यातील सेटिंग्ज बटणावर टॅप करा. - डेटा आणि स्टोअरेज ऑप्शनवर टॅप करा. - युज लेस डेटा फॉर कॉल्स ऑप्शन्स (Use Less Data For Calls) बटण टॉगल करा. व्हॉट्सअ‍ॅप डाउनलोड थांबवण्यासाठी  डेटा वापर कमी करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर आपोआप फोटो, व्हिडीओ आणि डॉक्युमेंटस डाउनलोड थांबवू शकता. डाउनलोड न करताही तुम्ही व्हिडीओ, फोटो आणि डॉक्युमेंटस पाहता येतात फक्त ते स्मार्टफोनच्या गॅलरीत सेव्ह होत नाहीत. हा उपाय करण्यासाठी ... - तुमच्या Android किंवा Apple स्मार्टफोनवर व्हॉट्सअ‍ॅप उघडा. हे वाचा-Apple iphone चा पासवर्ड विसरलात? चिंता करू नका; असा करा फोन अनलॉक - अ‍ॅपच्या उजव्या कोपर्‍यातील सेटिंग्ज बटणावर टॅप करा. - डेटा आणि स्टोअरेज ऑप्शनवर टॅप करा. - मीडिया ऑटो-डाउनलोड सेक्शनमध्ये जा. - फोटो ऑप्शनवर टॅप करा आणि त्यानंतर ‘नेव्हर’ ऑप्शनवर टॅप करा. - व्हिडीओ ऑप्शनवर टॅप करा आणि नंतर ‘नेव्हर’ ऑप्शनवर टॅप करा. - डॉक्युमेंटस ऑप्शनवर टॅप करा आणि नंतर ‘नेव्हर’ ऑप्शनवर टॅप करा. हे उपाय केले तर तुमचा डेटा लवकर संपणार नाही आणि तुमचा कॉल व्यवस्थित चालेल.
First published: