मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /जेफ बेझोस यांची कंपनी पहिल्यांदा महिलेला चंद्रावर पाठवणार; होतेय खास इंजिनाची तयारी

जेफ बेझोस यांची कंपनी पहिल्यांदा महिलेला चंद्रावर पाठवणार; होतेय खास इंजिनाची तयारी

नासाच्या मार्शल स्पेस फ्लाइट सेंटरमध्ये या आठवड्यातच इंजिनची चाचणी घेण्यात आली. बेझोस यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये, तो व्हिडाओ शेअर केला आहे. अनेक वर्षांपासून ब्लू ओरिजिन कंपनी BE-7 इंजिन तयार करत आहे.

नासाच्या मार्शल स्पेस फ्लाइट सेंटरमध्ये या आठवड्यातच इंजिनची चाचणी घेण्यात आली. बेझोस यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये, तो व्हिडाओ शेअर केला आहे. अनेक वर्षांपासून ब्लू ओरिजिन कंपनी BE-7 इंजिन तयार करत आहे.

नासाच्या मार्शल स्पेस फ्लाइट सेंटरमध्ये या आठवड्यातच इंजिनची चाचणी घेण्यात आली. बेझोस यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये, तो व्हिडाओ शेअर केला आहे. अनेक वर्षांपासून ब्लू ओरिजिन कंपनी BE-7 इंजिन तयार करत आहे.

नवी दिल्ली, 7 डिसेंबर : जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती जेफ बेझोस (Jeff Bezos) याची स्पेस कंपनी ब्लू ओरिजिन (Blue Origin) पहिल्यांदाच महिलेला चंद्रावर पाठवणार आहे. या खासगी कंपनीने तयार केलेले लूनर लँडर (Lunar Lander) अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेच्या वतीने 2024 मध्ये अंतराळात सोडलं जाणार आहे. या अभियानात पहिल्यांदाच पृथ्वीवरील महिला चंद्रावर जाणार आहे, त्यात जे अवकाशयान वापरलं जाईल त्यासाठी BE-7 हे इंजिन वापरण्यात येणार आहे. बेझोस यांनी एका इन्स्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली आहे.

नासाच्या मार्शल स्पेस फ्लाइट सेंटरमध्ये या आठवड्यातच इंजिनची चाचणी घेण्यात आली. बेझोस यांनी आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये, तो व्हिडाओ शेअर केला आहे. अनेक वर्षांपासून ब्लू ओरिजिन कंपनी BE-7 इंजिन तयार करत आहे. शेवटी या इंजिनाला 1,245 टेस्ट-फायर टाइमशी जोडण्यात आलं आहे. बेझोस यांनी पोस्टमध्ये म्हटलंय, ‘पहिल्यांदा महिलेला चंद्रावर घेऊन जाणारं हेच इंजिन असेल. BE-7 हे लिक्विड हायड्रोजन-ऑक्सिजन लूनर लँडिंग इंजिन असून ते सर्वोत्तम कार्यक्षमता दाखवतं. त्यात 10 हजार lbf थ्रस्ट क्षमता आहे.’

ब्लू ओरिजनच्या राष्ट्रीय टीमने खासगी पद्धतीने 2019 मध्ये हे इंजिन तयार केलं आहे, जेणेकरून ब्लू मून लँडर तयार करता येईल. या टीममध्ये लॉकहीड मार्टिन कॉर्पोरेशन, नॉथ्रॉप गुम्मन कॉर्प आणि ड्रेपर यांचा सहभाग आहे.

View this post on Instagram

A post shared by Jeff Bezos (@jeffbezos)

(वाचा - Oppo च्या या फोनमध्ये असणार जगातील पहिला 50 मेगापिक्सलचा Sony कॅमेरा;पाहा फीचर्स)

नासाकडून कॉन्ट्रॅक्ट मिळवण्याची तयारी सुरू -

गेल्या अनेक वर्षांपासून बेझोस यांची खासगी कंपनी ब्लू ओरिजिन अमेरिकेतील सरकारी कॉन्ट्रक्ट मिळवण्याच्या प्रयत्नांत आहे. अरबपती इलॉन मस्क यांची (Elon Musk) SpaceX आणि लिडोस होल्डिंग्ज आयएनसीची (Leidos Holdings Inc) डायनेटिक्स (Dynetics) या कंपन्यांची, ब्लू ओरिजिनची स्पर्धा आहे. या सगळ्या कंपन्या नासाच्या ह्युमन लूनर लँडिंग सिस्टिम (Human Lunar Landing System) मोहिमेचं कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी धडपडत आहेत.

(वाचा - पैसे वाचण्यासाठी जगातली दुसरी श्रीमंत व्यक्ती करणार हे काम,कारण ऐकून हैराण व्हाल)

नासाने एप्रिल महिन्यात ब्लू ओरिजिनला लूनर लँडर डेव्हलपमेंट कॉन्ट्रॅक्ट (Lunar Lander Developmet Contract) 579 मिलियन डॉलरमध्ये दिलं. स्पेसएक्सला 135 मिलियन डॉलर आणि डायनेटिक्सला 253 मिलियन डॉलरमध्ये स्टारशिप सिस्टम तयार करण्याचं कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलं.

(वाचा - आजीने जमावलेल्या पैशांवर नातवाने मारला डल्ला, 2.70 लाख खात्यातून गेले गायब)

नासाची चिंता वाढली -

नासा मार्च 2021 पर्यंत यापैकी दोन कंपन्यांची निवड करून त्यांचा लँडर प्रोटोटाइप तयार करेल. ही लूनर मोहीम 2021 पर्यंत पूर्ण केली जाणार आहे. पण अमेरिकी काँग्रेसने लँडिंग सिस्टिमसाठी पुरेसा निधी अद्याप दिलेला नसल्यामुळे मोहिमेची अनिश्चितता आणि नासाची चिंता वाढली आहे. त्याचबरोबर नवनिर्वाचित अध्यक्ष जो बायडन यांच्या प्रशासनाचा (Biden Administration) अंतराळ अभियानांबाबतचा दृष्टिकोन पाहता नासाची चिंता अधिक वाढली आहे.

First published:
top videos

    Tags: Nasa, Space, Space-x