मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुमचा मोबाइल चोरी झाला? सरकारी पोर्टलवर सुरक्षितरित्या असा करा ब्लॉक

तुमचा मोबाइल चोरी झाला? सरकारी पोर्टलवर सुरक्षितरित्या असा करा ब्लॉक

आता फोन केवळ कॉल करण्यासाठी नाही, तर त्यात अनेक सोशल मीडिया अकाउंट्स, बँक अकाउंट्स त्याचे डिटेल्स सेव्ह असतात. त्यामुळे फोन चोरी झाल्यास, असा महत्त्वाचा डेटा सुरक्षित राहण्यासाठी फोन लगेच ब्लॉक करणं अतिशय महत्त्वाचं आहे.

नवी दिल्ली, 21 मे : सध्याच्या काळात स्मार्टफोन प्रत्येकासाठी अतिशय महत्त्वाची बाब झाला आहे. फोनच्या वाढत्या मागणीसह याच्या चोरीचंही प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. स्मार्टफोन चोरी झाल्यानंतर त्या व्यक्तीच्या पैशांचं नुकसान तर होतंच शिवाय फोनमध्ये सेव्ह असलेला खासगी डेटादेखील धोक्यात येतो. आता फोन केवळ कॉल करण्यासाठी नाही, तर त्यात अनेक सोशल मीडिया अकाउंट्स, बँक अकाउंट्स त्याचे डिटेल्स सेव्ह असतात. त्यामुळे फोन चोरी झाल्यास, असा महत्त्वाचा डेटा सुरक्षित राहण्यासाठी फोन लगेच ब्लॉक करणं अतिशय महत्त्वाचं आहे.

यासाठी मोबाइल फोन हरवल्यानंतर, सर्वात आधी पोलीस स्टेशनमध्ये एक FIR दाखल करावी लागेल. मोबाईल चोरीचा रिपोर्ट ऑफलाइन किंवा ऑनलाइनही दाखल करता येतो. FIR दाखल केल्यानंतर याची कॉपी आणि कम्प्लेंट नंबर स्वत:कडे ठेवा. तसंच, सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टरच्या वेबसाईटवर ceir.gov.in याबाबत माहिती देता येते. CEIR कडे देशातील प्रत्येक मोबाईल फोनचा डेटा फोन मॉडेल, सिम, IMEI नंबर उपलब्ध असतो, ज्याच्या मदतीने चोरी झालेला फोन शोधता येऊ शकतो. यामुळे फोन ब्लॉक किंवा अनब्लॉक करता येऊ शकतो.

ceir.gov.in वर क्लिक केल्यानंतर तीन ऑप्शन Block/Lost Mobile, Check Request Status आणि Un-Block Found Mobile मिळतील. चोरी झालेला फोन ब्लॉक करण्यासाठी Stolen/Lost Mobile ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर नवं पेज ओपन होईल त्यात, आपल्या मोबाईल फोनची सर्व माहिती द्यावी लागेल.

हे वाचा - कोणत्याही अ‍ॅपशिवाय समजणार अनोळखी फोन नंबरचे नाव! 'ट्राय' उभारणार खास यंत्रणा

मोबाईल नंबर, IMEI नंबर, डिव्हाईस ब्राँड, कंपनी, फोन खरेदीचं इनव्हॉईस, फोन हरवल्याची तारीख इथे भरावी लागेल. त्याशिवाय राज्य, जिल्हा, फोन चोरी झाल्याची जागा, कम्प्लेंट नंबर, FIR कॉपी अपलोड करावी लागेल.

त्यानंतर Add more complaint वर क्लिक करावं लागेल, ज्यात मोबाईलच्या मालकाचं नाव, पत्ता, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स आणि आयडेंटिटीची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर आपला मोबाईल नंबर टाकावा लागेल. वेरिफिकेशनसाठी तुमच्या नंबरवर एक OTP येईल, त्यानंतर वेरिफिकेशन होईल. याप्रमाणे फायनल सबमिट करुन मोबाईल फोन ब्लॉक होईल. तसंच फोनबाबत कोणतीही माहिती मिळाल्यास, ती युजरकडे पोहोचवली जाईल.

First published:

Tags: Smartphone, Tech news