मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Three Idiots च्या 'वांगडू'ने सैनिकांसाठी तयार केलेत हे खास तंबू : पाहा 10 वैशिष्ट्यं

Three Idiots च्या 'वांगडू'ने सैनिकांसाठी तयार केलेत हे खास तंबू : पाहा 10 वैशिष्ट्यं

Wangadu

Wangadu

लडाखमधील इंजिनीअर, इनोव्हेटर आणि संशोधक सोनम वांगचुक यांनी भारतीय सैनिकांचा थंडीपासून बचाव व्हावा म्हणून हे विशिष्ट प्रकारचे तंबू तयार केले आहेत.

    नवी दिल्ली, 24 फेब्रुवारी: लडाखच्या थंड वातावरणात भारतीय सैनिकांना उब मिळण्यासाठी विशिष्ट प्रकारचे तंबू तयार आहेत. लडाखमधील इंजिनीअर (Ladakhi Engineer) आणि संशोधक सोनम वांगचुक यांनी हे विशिष्ट प्रकारचे तंबू तयार केले आहेत. ट्विटरवर त्यांनी या संदर्भातील माहिती दिली असून सोलर तंबू (High Altitude Solar Tent) तयार करण्यात आले आहेत. वांगचुक यांच्यावरून प्रेरणा घेऊनच थ्री इडियट्स (Three Idiots) मध्ये आमिर खानने साकारलेली फुंगसुक वांगडू ही व्यक्तिरेखा तयार झाली होती. त्या हरहुन्नरी लडाखी इंजिनीअरने आता भारतीय सैन्याला थंडी, बर्फवृष्टीपासून वाचवण्यासाठी पुन्हा डोकं चालवत खास तंबू तयार केले आहेत.

    सोनम यांनी 10 वर्षांपूर्वीच थंडीपासून बचाव होण्यासाठी (Cold Weather) या पद्धतीच्या तंबूच संशोधन केलं होतं. परंतु त्यांनी नुकतेच याचं अपडेटेड व्हर्जन तयार केलं आहे. या तंबूच वैशिष्ट्य म्हणजे बाहेर -14 डिग्री सेल्सियस तापमान असलं तरीही तंबूच्या आत 15 डिग्रीसेल्सिअस तापमान राहणार आहे. यामुळं पैश्यांची देखील मोठी बचत होणार असून हा तंबू पर्यावरणपूरक (Eco Friendly Innovation) असणार आहे. महत्त्वाचं म्हणजे भारतीय सैनिकांसाठी हे तंबू खूपच फायद्याचे ठरणार आहेत.

    या संशोधनाची गरज काय ?

    मागील काही काळापासून भारत आणि चीन सीमेवर तणाव सुरू आहे. यामुळं मोठ्या प्रमाणात सैन्य तैनात केलं जात आहे. या सैन्याला लडाखसारख्या थंड प्रदेशात उब मिळण्यासाठी रॉकेल जाळावं लागत आहे. यामुळं राज्यावरील भार वाढत असून पर्यावरणाला देखील धोका वाढत आहे. याचबरोबर आग लागण्याचा धोका नई सैनिकांचं आरोग्य लक्षात घरेऊन सोनम यांनी हे संशोधन केलं आहे.

    यामध्ये काय तंत्रज्ञान आहे ?

    द बेटर इंडिया पोर्टलला सोनम यांनी दिलेल्या मुलाखतीत याचा खुलासा केलेला नाही. यामध्ये कोणत्या प्रकारचं तंत्रज्ञान वापरलं आहे याचादेखील त्यांनी खुलासा केलेला नाही.या तंबूच ते पेटंट घेणार असून त्यांनी यामध्ये कोणते मटेरियल वापरलं आहे याचा खुलासा केलेला नाही. पण ज्या पद्धतीनं सोलर घरं तयार केली जातात त्याच पद्धतीनं हे तंबू बनवलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

    कशा पद्धतीनं काम करतो हा तंबू ?

    अतिशय सोप्या पद्धतीनं हा तंबू कार्य करतो. पाण्याच्या माध्यमातून उन्हाचा साठा केला जात असून रात्री याच रूपांतर रात्री गरम वातावरणात होत असून तंबू रात्रीच्या वेळी गरम राहण्यास मदत होते.

    या तंबूच वजन किती?

    या तंबूच एकूण वजन हे 30 किलो आहे. पूर्णपणे खोलून हा तंबू दुसऱ्या जागी याची ने- आण केली जाऊन शकते. त्यामुळं सैनिक आपल्या खांद्यावर देखील याची वाहतूक करू शकतात.

    तंबूत किती सैनिक राहू शकतात?

    या तंबूमध्ये गरजेप्रमाणे बदल केले जाऊ शकतात. साधारणपणे 10 सैनिक यामध्ये राहू शकतात. याचप्रमाणे एका अधिकाऱ्यांसाठी देखील हा तंबू वापरला जाऊ शकतो. 10 सैनिकांसाठी या तंबूचा वापर केल्यास याचे 40 तुकडे लागणार आहेत. त्यामुळं गरजेनुसार या तंबूचा वापर करता येऊ शकतो.

    याची किंमत किती आहे ?

    सोलर हीटेड टेंट प्रोटोटाइपची किंमत 5 लाख रुपये आहे. याचे अपडेटेड व्हर्जन हे 9ते10 लाख रुपयांना मिळणार असल्याचं देखील सोनम यांनी सांगितलं. अगदी स्वस्त किमतीमध्ये हे तंबू उपलब्ध होत असून याचा खूप फायदा असल्याचं देखील सोनम यांनी म्हटलं आहे.

    अवश्य वाचा -  Alert! वेळीच सावध व्हा; सेटिंग्जमध्ये करा हे बदल, अन्यथा WhatsApp अकाउंट हॅक होण्याचा धोका

     केवळ सैन्यासाठी तयार केले जात आहेत हे तंबू ?

    हे तंबू केवळ सैन्यासाठी तयार करण्याचं ध्येय नसून भविष्यात पर्यटनाला देखील याचा फायदा होणार आहे. लडाखसारख्या थंड प्रदेशांमधे या तंबूचा खूप फायदा होऊ शकतो. याचबरोबर बॉर्डरवर रस्ते निर्मिती करणाऱ्या मजुरांना देखील याचा फायदा होणार आहे.

    भारतीय सैन्य इच्छुक ?

    सोनम यांचं सध्या भारतीय सैन्याबरोबर याविषयी चर्चा सुरु आहे. पँगॉग झिलच्या जवळ चांग ला पास वर या तंबूची चाचणी केली जाऊ शकते. येणाऱ्या हवा आणि तापमानात देखील जर या तंबूंनी तग धरला तर या तंबूचं उत्पादन भारतीय सैन्य करू शकतं.

    कुठं बनवले आहेत हे तंबू ?

    सोनम यांनी हिमालयन इंस्‍टीट्यूट ऑफ अल्‍टरनेटिव्‍स ची स्थापना केली आहे. या संस्थेमध्येच सोनम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा तंबू तयार केला आहे. यासाठी त्यांना चार आठवड्यांचा कालावधी लागला आहे.

    वांगचुक कोण आहेत ?

    थ्री इडियट्स या चित्रपटात अमीर खान याने साकारलेली भूमिका ही वांगचुक यांच्यापासून प्रेरित झाली होती. रँचो म्हणजेच फुकशुक वांगड़ू हे कॅरेक्टर अमीर खान याने साकारले होते. लडाखमधील स्टुडंट एज्युकेशन अँड कल्चरल मुव्हमेंट ही लडाखमध्ये खूप लोकप्रिय झाली आहे.

    First published:

    Tags: Eco friendly, Indian army, Innovation, Ladakh, Technology, Weather