Home /News /technology /

दुबईतून काम करा, मिळवा भक्कम पगार आणि BMW सुपरबाईक; BharatPe ची नव्या कर्मचाऱ्यांसाठी सर्वात हटके ऑफर

दुबईतून काम करा, मिळवा भक्कम पगार आणि BMW सुपरबाईक; BharatPe ची नव्या कर्मचाऱ्यांसाठी सर्वात हटके ऑफर

BharatPe work offers: नव्याने भारत पे जॉइन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुपर बाईक्स किंवा गॅझेट्स यापैकी एक पॅकेज निवडावं लागेल.

नवी दिल्ली, 20 जुलै: भारतातील स्टार्टअप 'भारत पे'नं आता भरारी घेतली असून फिन-टेक उद्योगातील नवनवी शिखरं पादाक्रांत करण्यासाठी सज्ज झाली आहे. त्यासाठी कुशल मनुष्यबळ (Talented Human resource) असणं हे सर्वांत महत्त्वाचं आहे हे ओळखून या कंपनीने टेक्निकल क्षेत्रातील तरुणाईला भुरळ घालेल असं नोकरीचं पॅकेज ऑफर (Package offer) केलं आहे. दुबईमध्ये 17 ऑक्टोबर 21 ते 14 नोव्हेंबर 21 दरम्यान होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेवेळी दुबईतून काम करण्याची संधी भारत पे तरुणांना देणार आहे. इतकंच नाही पगाराचं चांगलं भरभक्कम पॅकेज आणि तरुणाईला भुरळ घालणाऱ्या सुपर बाईक्स (Superbikes) किंवा महागडी इलेक्ट्रॉनिक गॅजेट्सही (Electronic Gadgets) त्यांना देण्यात येणार आहेत. ‘आम्ही 100 जणांची नवी टेक टीम तयार करत आहोत. तुम्हाला आकर्षक असंच जॉइनिंगचं पॅकेज आहे. या संपूर्ण टेक टीमला आयसीसी टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपदरम्यान दुबईत काम करावं लागेल आणि त्यासोबत बीएमडब्ल्युची सुपरबाईक, सर्व अत्याधुनिक गॅजेट्स असणारं वर्क फ्रॉम होम वातावरण, इंडस्ट्रीतील सर्वाधिक पगार, हा असेल आयुष्य बदलून टाकणारा अनुभव,’ असा मेसेज भारत पेचे (Bharat Pe) सहसंस्थापक आणि चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर अशनीर ग्रोव्हर यांनी आपल्या लिंक्डइन पोस्टमध्ये लिहिला आहे. नव्याने भारत पे जॉइन करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुपर बाईक्स किंवा गॅझेट्स यापैकी एक पॅकेज निवडावं लागेल. बाईक पॅकेजमध्ये आहेत – बीएमडब्ल्यु G310R, जावा पारेक, केटीएम ड्युक 390 (KTM Duke 390), केटीएम RC390 आणि रॉयल एनफिल्ड हिमालयन या बाईक्स. गॅजेट्सच्या पॅकेजमध्ये आहेत – ॲपल आयपॅड प्रो (पेन्सिलसह) (Apple I pad pro), बोस हेडफोन, हर्मन कारडॉन स्पीकर, सॅमसंग गॅलेक्सी वॉच, वर्क फ्रॉम होम डेस्क आणि चेअर आणि फायरफॉक्स टायफून 27.5 D सायकल. यातून एका बाईकची किंवा गॅझेटची निवड कर्मचाऱ्याला करता येईल. World record! जगातील सर्वात fast internet, एका सेकंदात 57 हजार चित्रपट होतील download व्यापारी आणि ग्राहकांसाठी काम करणाऱ्या भारत पेला अनेक नवी प्रॉडक्ट्स बाजारात आणायची आहेत. त्याचबरोबर ऑक्टोबर महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कप क्रिकेट (T-20 Cricket World Cup) स्पर्धेदरम्यान आपल्या संपूर्ण टेक टीमला कामाला लावण्याचा कंपनीचा विचार आहे. सध्या कंपनीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची अपरायझल म्हणजे पगारवाढ आठ महिने आधीच केली जाणार आहे. कंपनी सध्याच्या टेक विभागातल्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के पगारवाढ देणार असून ती सीटीसी (CTC Cost To Company) आणि पगारवाढ अशी विभागलेली असेल. ही पॉलिसी 1 जुलैपासून लागू होणार असल्याचं कंपनीने जाहीर केलं आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी किंवा आधी भारत पेमध्ये नोकरी केलेल्या व्यक्तीने रेफरन्स (Refrence) दिला आणि कंपनीला नवा कर्मचारी मिळाला तरीही त्या व्यक्तीला बाईक्स आणि गॅजेट्सच्या पॅकेजचा लाभ घेता येणार आहे.

WhatsApp Chat आता आणखी सुरक्षित होणार; पाहा तुमच्यावर कसा परिणाम होणार

‘आम्ही भारतातल्या बँकिंगची पुढची पिढी घडवत आहोत त्यामुळे बाजारातील सर्वोत्तम उत्पादनं तयार करण्यासाठी आम्हाला सर्वोत्तम कर्मचारी हवे आहेत म्हणूनच आम्ही त्यांना आकर्षक वाटेल अशी ऑफर देत आहोत. त्यामुळेच आम्ही टेक्निकल क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना सर्वोत्तम पगार देण्याबाबत आम्ही भारतात आघाडीवर असणार आहोत. त्याचं कारणही तसंच आहे आमच्या व्यवसायात कौशल्यवान मनुष्यबळ हेच महत्त्वाचं असून त्यातच मोठी गुंतवणूक करणं गरजेचं आहे,’ असंही अशनीर यांनी कंपनीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे. फेब्रुवारी महिन्यात भारत पे कंपनीत नवी गुंतवणूक झाली असून तिची किंमत 900 मिलियन अमेरिकी डॉलर झाली आहे. ही कंपनी स्थापन झाली तेव्हा प्रायमरी फंडिंग 90 मिलियन डॉलर आणि 18 मिलियन डॉलर अशी तिची किंमत 108 मिलियन डॉलर होती. नव्या गुंतवणुकीचं नेतृत्व सध्याचा गुंतवणूकदार कोएट मॅनेजमेंटने (Coatue Management) केलं होतं. रिबिट कॅपिटल (Ribbit Capital), इनसाइट पार्टनर्स (Insight Partners), स्टेडव्ह्यू कॅपिटल (Steadview Capital), बीनेक्स्ट (Beenext), अँप्लो (Amplo) and सिक्विओ कॅपिटल (Sequoia Capital) या सातही कंपन्या सध्या भारत पेच्या गुंतवणूकदार असून त्यांनी या फंड रेझिंगमध्ये भाग घेतला होता.

Petrol Pump Fraud: पेट्रोल पंपावर होणारी फसवणूक अशी टाळा, जाणून घ्या महत्त्वपूर्ण नियम

नुकतंच कंपनीच्या डेट फंडिंगमध्येही 7 मिलियन डॉलरची वाढ झाली असून एकूण गुंतवणूक लक्षात घेता इक्विटी आणि डेट एकत्रितपणे कंपनीमधील गुंतवणूक 300 मिलियन डॉलर्सच्या जवळ पोहोचली आहे. टेक क्षेत्रातील सर्वोत्तम लोकांना आपल्या कंपनीत आणण्यासाठी सगळ्या स्टार्टअप कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू असतानाच भारत पेने ही इन्सेंटिव्हची योजना आणली आहे त्यामुळे तिला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. सोशल मीडियावरही याबाबत जबरदस्त चर्चा आहे. टायगर ग्लोबल कंपनीकडून नुकतंच फंडिंग मिळाल्यामुळे भारत पे आपल्या कर्मचाऱ्यांना चांगली पगारवाढ देण्यासाठी सज्ज झाली आहे.
Published by:Pooja Vichare
First published:

Tags: Money, Tech news, Techonology

पुढील बातम्या