जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / वेळीच सावध व्हा! या 5 Social media App ने उडवली झोप; सर्वेक्षणातून समोर आली धक्कादायक बाब

वेळीच सावध व्हा! या 5 Social media App ने उडवली झोप; सर्वेक्षणातून समोर आली धक्कादायक बाब

वेळीच सावध व्हा! या 5 Social media App ने उडवली झोप; सर्वेक्षणातून समोर आली धक्कादायक बाब

सोशल मीडिया अ‍ॅपबाबत सर्वेक्षण झालं आहे. हे अ‍ॅप तुमच्या मोबाईलमध्ये तर नाहीत ना पाहा.

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 13 जानेवारी : भारतात सोशल मीडिया अॅप्सचा (Social media apps) मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. कोट्यवधी युझर्स ही अ‍ॅप्स वापरतात. पण याच अ‍ॅपबाबत सर्वेक्षणातून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. या अ‍ॅप्सचा गंभीर दुष्परिणाम होत असल्याचं दिसून आलं आहे. या अॅप्सनी रात्रीचीही झोप (sleep)  उडवली आहे (Social media apps cause sleep problem). रिपोर्टनुसार देशात एकूण 62.4 कोटी इंटरनेट युझर्स आहेत. त्यापैकी 44.8 कोटी युझर्स सोशल मीडियाचा वापर करतात. 2021 मध्ये भारतात 31 टक्के सोशल मीडिया, तर 8 टक्के इंटरनेट युझर्स वाढले आहेत. फेसबुक हे 60 कोटी अॅक्टिव्ह युझर्स असलेले सर्वांत लोकप्रिय सोशल मीडिया अ‍ॅप आहे. युझर्स दिवसातली सरासरी 5 तास 24 मिनिटं स्मार्टफोनमध्ये सक्रिय असतात. यामध्ये सोशल मीडियावर 92 मिनिटं व्हिडिओ पाहतात. सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या अ‍ॅपचा विचार केला, तर पहिला क्रमांक यू-ट्यूबचा लागतो. 85.8 टक्के व्यक्ती हे अ‍ॅप वापरतात. त्यानंतर 75.7 टक्के व्यक्ती फेसबुक, 70.6 टक्के व्यक्ती इन्स्टाग्राम आणि 50.6 टक्के व्यक्ती ट्विटरवर अॅक्टिव्ह आहेत. पण याच अ‍ॅप्समुळे निद्रानाशाची समस्या वाढल्याचं  ‘स्लीप जंकी’ने (Sleep Junkie) केलेल्या सर्वेक्षणात दिसल्याचं वृत्त  ‘झी न्यूज’ च्या रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे. कोणत्या समस्या निर्माण होतात? - रात्री उशिरापर्यंत सोशल मीडियाचा वापर केल्याने सकाळी उशिरा जाग येते. - दिवसभर थकवा आणि डोकेदुखीची समस्या निर्माण होते. - रात्री सोशल मीडियाचा वापर केल्याने तुमच्या दैनंदिन कामावर परिणाम होतो. - डोळे जड वाटू लागतात. हे वाचा -  Alert! …तर कोरोना लशीचा बुस्टर डोस रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट निद्रानाश होण्याची समस्या निर्माण होण्यास हातभार लावणारी 5 अ‍ॅप्स आहेत. ही अ‍ॅप्स 78 टक्के युझर्सच्या झोपेवर परिणाम करतात. या यादीत सर्वांत पहिलं अ‍ॅप आहे चिनी टिकटॉक. त्यानंतर इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, ट्विटर आणि फेसबुकचा क्रमांक लागतो. याशिवाय पिंटरेस्ट ( Pinterest), यू-ट्यूब (YouTube), रेडिट (Reddit) आणि टम्बलर (Tumblr) यांचाही या यादीत समावेश होतो. रात्री बेडवर मोबाइल स्क्रोल केल्याने झोप येत नाही आणि पुन्हा पुन्हा जाग येते. हे वाचा -  Google Maps मधील ‘ही’ जबरदस्त Trick; तुम्हाला माहिती आहे का? एकदा वापरुन पाहाच झोप न येणं ही समस्या आजकाल खूप वाढताना दिसते. आजकालच्या धावपळीच्या आयुष्यात झोप घेण्याची निश्चित वेळ कमी झाली आहे. अशातच झोपण्यापूर्वी स्मार्टफोनचा वापर करणं योग्य नाही. कारण अपुऱ्या झोपेमुळे विविध आजारांची समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे स्वतःवर ताबा ठेवून झोपण्यापूर्वी मोबाइलचा वापर टाळणं गरजेचं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात