जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / 15 हजारहून कमी किंमतीत खरेदी करा हे Best Smartphone; मिळेल जबरदस्त कॅमरा आणि फीचर्स

15 हजारहून कमी किंमतीत खरेदी करा हे Best Smartphone; मिळेल जबरदस्त कॅमरा आणि फीचर्स

15 हजारहून कमी किंमतीत खरेदी करा हे Best Smartphone; मिळेल जबरदस्त कॅमरा आणि फीचर्स

सध्या बाजारात अगदी हजार रुपयांपासून ते अगदी लाखो रुपयांपर्यंतचे स्मार्टफोन आहेत. पण बजेट सेगमेंटमध्येही चांगल्या फीचर्ससह बजेट स्मार्टफोन उपलब्ध आहेत.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी : नवीन फोन खरेदी करताना त्याच्या फीचर्ससह, किंमतीकडेही अधिक लक्ष दिलं जातं. कोणताही फोन घेताना आधी बजेटच पाहिलं जातं. सध्या बाजारात अगदी हजार रुपयांपासून ते अगदी लाखो रुपयांपर्यंतचे स्मार्टफोन आहेत. पण बजेट सेगमेंटमध्येही चांगल्या फीचर्ससह बजेट स्मार्टफोन उपलब्ध आहेत. Poco M3 - भारतात Poco M3 ची किंमत 10,999 रुपये आहे. या फोनमध्ये 6GB रॅमसह, क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन प्रोसेसर आहे. या फोनला 6.5 इंची फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनला 48 MP ट्रिपल केमॅरा सेटअप आहे. Redmi Note 9 - Redmi Note 9 ची भारतात 11,999 रुपये सुरुवातीची किंमत आहे. या 15000 रुपयांच्या आत येणाऱ्या बजेट स्मार्टफोनमध्ये मीडिया टेक हीलियो G85 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. याला 6.53 इंची फुल HD+डिस्प्ले, 5,020 mAh बॅटरी देण्यात आली आहे. तसंच 22.5W फास्ट चार्ज सुविधाही देण्यात आली आहे. Moto G9 Power - या फोनची भारतात 11,999 रुपयांपासून सुरुवातीची किंमत आहे. हा फोन ट्रिपल कॅमेरा सेटअप, चांगला डिस्प्ले आणि बॅटरीसह जबरदस्त सॉफ्टवेअरयुक्त आहे.

(वाचा -  भारतात पुरुषांच्या तुलनेत महिलांना नोकरीसाठी पहिली पसंती; रिपोर्टमधून खुलासा )

Realme Narzo 20 Pro - या फोनची 14,999 रुपये सुरुवातीची किंमत आहे. हा फोन 65W फास्ट चार्जिंग सुविधा देण्यात आली आहे. तसंच फोनला 4,500 mAh बॅटरी, 6.5 इंची Full HD+ IPS LCD डिस्प्ले आणि G95 मीडिया टेक हीलियो प्रोसेसर देण्यात आला आहे. Realme 7 - 14,999 रुपयांत Realme 7, 15000 रुपयांच्या आत मिळणारा भारतातील सर्वात मोठा स्मार्टफोन आहे. 6.5 इंची Full HD+ LCD डिस्प्ले, रिफ्रेश रेट 90Hz, 30W फास्ट चार्जिंग सपोर्ट, 5,000 mAh बॅटरी, मीडिया टेक हीलियो G95 प्रोसेसर देण्यात आला आहे.

(वाचा -  Oppo चा अनोखा स्मार्टफोन; स्लाईड होऊन सेल्फी कॅमेरा बदलणार त्याची जागा )

Samsung Galaxy M21 - Samsung Galaxy M21 ची किंमत भारतात 13,999 रुपयांपासून सुरू होते. यात युजर्सला 6.4 इंची Full HD+ Infinity-U डिस्प्ले, 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट, 6,000 mAh बॅटरी, Exynos 9611 SoC प्रोसेसर देण्यात आला आहे. Samsung Galaxy A12 - भारतात या फोनची किंमत 12,999 पासून सुरू होते. यात 48 quad-camera सेटअप, 15W फास्ट चार्जिंग सपोर्ट, 5,000 mAh बॅटरी, मीडिया टेक हीलियो P35 प्रोसेसर देण्यात आला आहे. Poco M2 Pro - या फोनची किंमत भारतात 13,999 रुपये आहे. फोनला 6.67 इंची Full HD+ LCD डिस्प्ले, 5,000 mAh बॅटरी, 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट, स्नॅपड्रॅगन 720G SoC प्रोसेसर देण्यात आला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात