जाहिरात
मराठी बातम्या / टेक्नोलाॅजी / Oppo चा अनोखा स्मार्टफोन; स्लाईड होऊन सेल्फी कॅमेरा बदलणार त्याची जागा

Oppo चा अनोखा स्मार्टफोन; स्लाईड होऊन सेल्फी कॅमेरा बदलणार त्याची जागा

Oppo चा अनोखा स्मार्टफोन; स्लाईड होऊन सेल्फी कॅमेरा बदलणार त्याची जागा

या कॅमेरातून ज्यावेळी फोटो काढायचा असेल, त्यावेळी या कॅमेरा सेन्सरला एक गाईड ब्लॉकवर ठेवलं जाईल, जो वेगवेगळ्या अँगलवर स्लाईड होऊन फोटो कॅप्चर करेल.

  • -MIN READ
  • Last Updated :

नवी दिल्ली, 20 फेब्रुवारी : चिनी स्मार्टफोन कंपनी ओप्पोने (Oppo) नुकतंच स्लायडिंग सेल्फी कॅमेरा (Sliding selfie camera) पेटेंट केला आहे. या कॅमेराचा वाईड अँगल जबरदस्त असणार आहे. हा कॅमेरा वरच्या भागापासून फोटो क्लिक करू शकतो. ओप्पोने आपला पेटेंट 33 पानांच्या डिटेल्ससह World Intellectual Property Organization (WIPO) मध्ये दाखल केला आहे. 33 पानांच्या डिटेलमध्ये या कॅमेराच्या टेक्नोलॉजीबाबत माहिती शेअर करण्यात आली आहे. GSMArena रिपोर्टनुसार, या स्लायडिंग कॅमेराला बनवण्यामागे, प्रत्येक अँगलने फोटो चांगला यावा ही कल्पना आहे. या कॅमेरातून ज्यावेळी फोटो काढायचा असेल, त्यावेळी या कॅमेरा सेन्सरला एक गाईड ब्लॉकवर ठेवलं जाईल, जो वेगवेगळ्या अँगलवर स्लाईड होऊन फोटो कॅप्चर करेल. या स्लायडिंग कॅमेरामध्ये एक छोटीशी मोटर असेल, जी कॅमेराच्या डेडिकेटेड ऍपने कंट्रोल होईल. या स्लायडिंग कॅमेराला एका ऍपने कंट्रोल केलं जाईल. या ऍपद्वारे कॅमेरा स्लाईड होऊन फोटो क्लिक करेल.

Oppo चा Detachable camera फोन!

Oppo ने नुकतंच एका नव्या Smartphone चंही पेटेंट घेतलं आहे. ज्यासह डिटॅचेबल कॅमेरा असेल. म्हणजेच या मॉडेलसह कॅमेराला हवं तेव्हा Attach करता येईल, तसंच तो जेव्हा हवं तेव्हा हटवताही येईल.

(वाचा -  लाँचआधीच OnePlus 9 चे फीचर्स लीक; जबरदस्त बॅटरीसह, खास असणार कॅमेरा )

Photo: LetsGoDigital. हा डिटॅचेबल कॅमेरा आयताकृती असेल. हा कधीही काढता येऊ शकतो. सेल्फी घेण्यासाठी याला USB-C कनेक्टरशी जोडावं लागेल. या फोनमध्ये सर्कुलर डिझाईनचे दोन कॅमेरे देण्यात येणार असून यात LED फ्लॅश असेल. हा कॅमेरा 90 डिग्री आणि 180 डिग्रीपर्यंत फिरेल अशीही माहिती पेटेंटनुसार देण्यात आली आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात