मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

36 रुपयांत मिळेल डेटा आणि इतर बेनिफिट्स, जाणून घ्या या स्वस्त प्लॅनबाबत

36 रुपयांत मिळेल डेटा आणि इतर बेनिफिट्स, जाणून घ्या या स्वस्त प्लॅनबाबत

 सरकारी टेलिकॉम कंपनी भारतीय संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL ने ग्राहकांसाठी स्वस्त आणि स्वस्तात प्लॅन आणला आहे.

सरकारी टेलिकॉम कंपनी भारतीय संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL ने ग्राहकांसाठी स्वस्त आणि स्वस्तात प्लॅन आणला आहे.

सरकारी टेलिकॉम कंपनी भारतीय संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL ने ग्राहकांसाठी स्वस्त आणि स्वस्तात प्लॅन आणला आहे.

  • Published by:  Atik Shaikh

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : देशात वाढत्या स्मार्टफोनच्या वापरामुळे आता ग्राहकांना अनलिमिटेड डेटा आणि कॉलिंगचे फीचर्स असलेले प्लॅन्स फायदेशीर ठरत आहे. त्यासाठी विविध सिमकार्ड कंपन्या युजर्सला बंपर ऑफर देत असतात. परंतु आता सरकारी टेलिकॉम कंपनी भारतीय संचार निगम लिमिटेड म्हणजेच BSNL ने ग्राहकांसाठी स्वस्त आणि (BSNL unlimited calling and data plan prepaid 2021) स्वस्तात प्लॅन आणला आहे.

आता युजर्सला केवळ 36 रूपयांच्या रिचार्जवर इंटरनेट डेटा (BSNL recharge 36 plan voucher) आणि कॉलिंगची सुविधा मिळणार आहे. त्यामुळे आता BSNL च्या ग्राहकांना याचा फायदा होणार आहे.

अतिशय स्वस्तात मिळतोय Apple चा हा पॉप्युलर iPhone, पाहा काय आहे ऑफर

काय आहे प्लॅन?

BSNL ने ग्राहकांसाठी 36 रूपयांच्या रिचार्जवर डाटा, Talktime आणि फ्री कॉलिंगची सुविधा देण्यास सुरूवात केली आहे. त्यात 36 रूपयांच्या रिचार्जवर ग्राहकांना 36 रूपयांचा Talktime मिळेल. त्याचबरोबर BSNL to BSNL नेटवर्कसाठी 250 मिनिट फ्री Voice कॉलिंगची सुविधा या रिचार्जमार्फत (BSNL 36 rupees validity plan) देण्यात येत आहे. त्याचबरोबर या प्लॅनच्या माध्यमातून युजर्सला 200MB इंटरनेट डाटा आणि 5 पैशांमध्ये SMS पाठवता येणार आहे.

Smartphone पाण्यात पडल्यास अशी घ्या काळजी, अजिबात करु नका या गोष्टी

या प्लॅनची वैधता 15 दिवस असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही BSNL चे युजर्स असाल तर या स्वस्त ऑफरचा लाभ घेऊ शकता. दरम्यान जियो कंपनीनं युजर्सला विविध रिचार्जवर मोठी सूट आणि डाटा, अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा दिल्यामुळं मार्केटमधील इतर कंपन्यासाठी मोठं आव्हान उभं राहिलं आहे. त्यामुळं आता काही कंपन्या युजर्ससाठी विविध आकर्षक प्लॅन्स आणत आहे.

First published:

Tags: BSNL, Recharge, User data