Home /News /technology /

अतिशय स्वस्तात मिळतोय Apple चा हा पॉप्युलर iPhone, पाहा काय आहे ऑफर

अतिशय स्वस्तात मिळतोय Apple चा हा पॉप्युलर iPhone, पाहा काय आहे ऑफर

फ्लिपकार्टवर ( Flipkart) आयफोन 12 मिनी (iPhone 12 Mini) हा Apple चा लोकप्रिय फोन खूप कमी किमतीत ( low price) खरेदी करण्याची संधी आहे.

नवी दिल्ली, 13 नोव्हेंबर : आयफोन ( iPhone) ही तुमच्यापैकी अनेकांची पसंती असेल. परंतु Apple आयफोनची ( Apple iPhone) किंमत जास्त असल्यामुळे प्रत्येक जण तो खरेदी करू शकत नाही. अनेक जण आयफोन खरेदी करण्यासाठी सेल किंवा डिस्काउंटची वाट पाहतात आणि तुम्ही त्यापैकी एक असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. कारण फ्लिपकार्टवर ( Flipkart) आयफोन 12 मिनी (iPhone 12 Mini) हा Apple चा लोकप्रिय फोन खूप कमी किमतीत ( low price) खरेदी करण्याची संधी आहे. फ्लिपकार्ट डॉट कॉमवर देण्यात आलेल्या माहितीनुसार, iPhone 12 Mini 59,900 रुपयांऐवजी केवळ 45,199 रुपयांमध्ये मिळणार आहे. या फोनची सर्वांत महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्याचा मिनी लूक आणि दमदार फीचर्स... काय आहे फीचर्स - iPhone 12 Mini मध्ये 5.4 इंची सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले दिला आहे. या फोनमध्ये ड्युअल-सिम (Dual-SIM) सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये नॅनो आणि ई-सिम वापरता येणार आहे. हा फोन iOS 14 सॉफ्टवेअरवर काम करतो. यात A14 बायोनिक चिप आहे.

बाबो! तब्बल 64 लाख रुपयांत झाली या iPhone ची विक्री, कारण ऐकून हैराण व्हाल

दर्जेदार कॅमेरा - या आयफोनमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे. त्याचा प्रायमरी सेन्सर 12 मेगापिक्सेल अल्ट्रा वाइड आहे. दुसरा 12 मेगापिक्सेल वाइड सेन्सर आहे. आयफोनच्या कॅमेऱ्यात नाइट मोड, डीप फ्यूजन, स्मार्ट HDR 3, 4K नाइट मोड, 4K डॉल्बी व्हिजन एचडीआर रेकॉर्डिंगसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. फोनच्या पुढील बाजूस 12 मेगापिक्सेलचा ट्रू डेप्थ सेन्सर आहे, जो नाइट मोड आणि 4K डॉल्बी व्हिजन HDR साठी सपोर्ट म्हणून काम करतो. हा फोन IP68 वॉटर रेझिस्टंट फीचरसह येतो. हा आयफोन 64GB, 128GB आणि 256GB अशा तीन स्टोअरेज प्रकारांमध्ये येतो. या फोनची किंमत 59,900 रुपये म्हणजे जवळपास 60 हजार रुपये आहे. परंतु आता डिस्काउंटमध्ये हा फोन 45,199 रुपयांना दिला जात आहे. म्हणजेच हा फोन खरेदी करताना जवळपास 15 हजारांचा डिस्काउंट मिळणार आहे. आयफोन चाहत्यांसाठी ही गुड न्यूज म्हणावी लागेल.
First published:

Tags: Apple, Iphone, Tech news

पुढील बातम्या