मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Starlink Satellite Internet : Elon Musk ची कंपनी भारतात लाँच करणार स्वस्त इंटरनेट सेवा, जाणून घ्या प्लॅन

Starlink Satellite Internet : Elon Musk ची कंपनी भारतात लाँच करणार स्वस्त इंटरनेट सेवा, जाणून घ्या प्लॅन

स्टारलिंक कंपनी इंटरनेटसाठी पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करणाऱ्या उपग्रहांचा वापर करते. कंपनी त्यांच्या 'स्पेसएक्स फाल्कन 9' या रॉकेटच्या...

स्टारलिंक कंपनी इंटरनेटसाठी पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करणाऱ्या उपग्रहांचा वापर करते. कंपनी त्यांच्या 'स्पेसएक्स फाल्कन 9' या रॉकेटच्या...

स्टारलिंक कंपनी इंटरनेटसाठी पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करणाऱ्या उपग्रहांचा वापर करते. कंपनी त्यांच्या 'स्पेसएक्स फाल्कन 9' या रॉकेटच्या माध्यमातून हे उपग्रह अंतराळात पाठवते.

    मुंबई, 09 नोव्हेंबर : जगातल्या सर्वांत श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या एलॉन मस्क (Elon Musk) यांची स्पेस एक्स कंपनी (SpaceX) आपलं स्टारलिंक (Starlink) हे सॅटेलाइट इंटरनेट (Satellite Internet) भारतात लॉंच करणार आहे. एका वृत्तानुसार, ही कंपनी भारतात आंतरराष्ट्रीय बाजाराच्या तुलनेत कमी दरानं इंटरनेट सेवा (Internet Service) पुरवणार आहे. 'स्टारलिंक'ने भारतात इंटरनेट सेवेसाठी आगाऊ बुकिंग सुरू केलं आहे. तुम्ही देखील ठराविक रक्कम जमा करून या सेवेसाठी बुकिंग करू शकता. भारतातल्या ग्रामीण भागात इंटरनेट सेवा देण्यासाठी ही कंपनी देशातल्या दूरसंचार कंपन्यांसोबत भागीदारी करण्याचा विचार करत असल्याचं वृत्त आहे.

    'ही सेवा महागडी आहे. त्यामुळे याचा बोजा ग्राहकांवर टाकला तर ते या सेवेकडं आकर्षित होणार नाहीत,' असं काही दिवसांपूर्वी स्टारलिंक इंडियाचे संचालक संजय भार्गव यांनी सांगितलं होतं. 'अन्य कंपन्यांच्या तुलनेत स्वस्त दरानं सेवा उपलब्ध करून देणं हे स्टारलिंकसाठी गरजेचं आहे. सुरुवातीला कंपनी मर्यादित स्तरावर सेवा सुरू करणार आहे,' असंही भार्गव यांनी सांगितलं होतं.

    पहिल्या टप्प्यात 12 जिल्ह्यांमध्ये सेवा सुरू होणार

    'पीटीआय'च्या वृत्तानुसार, संजय भार्गव यांनी म्हटलं आहे, की 'नीती आयोगाच्या फेज -1 अंतर्गत 12 महत्त्वाकांक्षी जिल्ह्यांमध्ये ही सेवा सुरू झाल्यावर ब्रॉडबॅंड सेवा प्रदात्यांशी चर्चा सुरू होईल. त्यानंतर आम्ही विविध कंपन्या आणि यूएसओएफ म्हणजेच युनिव्हर्सल सर्व्हिस ऑब्लिगेशन फंडाच्या (USOF) मताचा विचार करू. आम्हाला एक कालबद्ध 100 ब्रॉडबॅंड (Broadband) योजना मिळेल, की जी अन्य जिल्ह्यांसाठी एक मॉडेल म्हणून काम करू शकते. परंतु, सर्व गोष्टी तपशीलावर अवलंबून आहेत,' असं भार्गव म्हणाले.

    कंपनीला मिळाल्यात 5 हजारांहून अधिक ऑर्डर्स

    'स्टारलिंक'च्या म्हणण्यानुसार, भारतात त्यांना 5 हजारांहून अधिक आगाऊ ऑर्डर्स मिळाल्या आहेत. आम्ही प्रत्येक ग्राहकाकडून 99 डॉलर म्हणजेच 7350 रुपये घेत असून, 50 ते 150 मेगाबाइट प्रतिसेकंद (MBPS) वेगाने डेटा (Data) देत असल्याचा दावा कंपनी करत आहे. 'स्टारलिंक'चे सर्वाधिक उपग्रह कक्षेत स्थापित झाल्यावर हा स्पीड 1 जीबीपीएसपर्यंत पोहोचेल.

    कंपनी देणार हार्डवेअर किट

    गेल्या महिन्यात एका व्हिडिओ संदेशात संजय भार्गव यांनी सांगितलं होतं की, 'भारतातल्या ग्रामीण भागात स्टारलिंकच्या सेवांचा टप्प्याटप्प्यानं विस्तार करण्यासाठी एक योजना आखण्यात आली आहे. या अंतर्गत ग्राहकांना एक हार्डवेअर किट (Hardware Kit) दिलं जाईल. देशात अशा 2 लाख डिव्हाइसेसच्या मदतीनं सेवा सुरू करण्याचा कंपनीचा मानस आहे. यापैकी 1.6 लाख डिव्हाइसेस ग्रामीण भागात असतील.

    स्टारलिंक काय आहे?

    स्टारलिंक हे सॅटेलाइटच्या माध्यमातून हायस्पीड इंटरनेट सेवा देणाऱ्या कंपनीचं नाव आहे. ही कंपनी एलॉन मस्क यांची आहे. ही कंपनी आता भारतात सेवा सुरू करणार आहे. भारतासारख्या ज्या देशांमध्ये कनेक्टिव्हिटीची समस्या आहे, तेथे स्टारलिंकची इंटरनेट सेवा उपयुक्त ठरणार आहे. ज्या भागात ऑप्टिकल फायबर (Optical Fiber) पोहोचणं मुश्किल आहे, प्रामुख्याने अशा भागात स्टारलिंक ब्रॉडबँड सेवा पुरवते.

    ही सेवा महागडी असणार

    ही सेवा खूप महागडी आहे. या सेवेसाठी आवश्यक हार्डवेअरकरिता 37 हजार रुपये मोजावे लागणार आहेत. त्यानंतर 7 हजार रुपये प्रतिमहिना भाडं द्यावं लागणार आहे.

    स्टारलिंक अशा पद्धतीनं काम करते

    स्टारलिंक कंपनी इंटरनेटसाठी पृथ्वीच्या कक्षेत भ्रमण करणाऱ्या उपग्रहांचा वापर करते. कंपनी त्यांच्या 'स्पेसएक्स फाल्कन 9' या रॉकेटच्या माध्यमातून हे उपग्रह अंतराळात पाठवते. जून 2021 पर्यंत कंपनीकडे 1500 पेक्षा अधिक उपग्रह होते. ही यंत्रणा काहीशी टीव्ही केबल सेवा तंत्राप्रमाणे काम करते. या इंटरनेट सेवेसाठी युझरला सर्वप्रथम डिश (Dish) बसवावी लागते. ही डिश मिनी उपग्रहाकडून सिग्नल रिसीव्ह करते. या इंटरनेटच्या माध्यमातून ऑनलाइन बफरिंग, गेमिंग आणि व्हिडिओ कॉलिंगसारख्या सुविधा अधिक चांगल्या प्रकारे मिळू शकतात.

    First published:
    top videos

      Tags: Elon musk