मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Apple च्या सर्वात स्वस्त iPhone ची किंमत आता आणखी कमी, पण 17 मार्चपर्यंतच आहे संधी

Apple च्या सर्वात स्वस्त iPhone ची किंमत आता आणखी कमी, पण 17 मार्चपर्यंतच आहे संधी

अ‍ॅमेझॉनवर (Amazon) अ‍ॅपल डेज (Apple Days) सेल सुरू आहे. अ‍ॅपल फोन खरेदी करण्याची इच्छा असणारे 17 मार्चपर्यंतच या सेलचा फायदा घेऊ शकतात.

अ‍ॅमेझॉनवर (Amazon) अ‍ॅपल डेज (Apple Days) सेल सुरू आहे. अ‍ॅपल फोन खरेदी करण्याची इच्छा असणारे 17 मार्चपर्यंतच या सेलचा फायदा घेऊ शकतात.

अ‍ॅमेझॉनवर (Amazon) अ‍ॅपल डेज (Apple Days) सेल सुरू आहे. अ‍ॅपल फोन खरेदी करण्याची इच्छा असणारे 17 मार्चपर्यंतच या सेलचा फायदा घेऊ शकतात.

नवी दिल्ली, 13 मार्च : जर तुम्ही Apple कंपनीचा आयफोन (iphones) खरेदी करण्यासाठी सेल किंवा ऑफरची वाट पाहत असाल, तर तुमच्यासाठी ही आनंदाची बातमी आहे. अ‍ॅमेझॉनवर (Amazon) अ‍ॅपल डेज (Apple Days) सेल सुरू आहे. अ‍ॅपल फोन खरेदी करण्याची इच्छा असणारे 17 मार्चपर्यंतच या सेलचा फायदा घेऊ शकतात. या सेलच्या माध्यमातून अ‍ॅपल कंपनीचा सर्वात स्वस्त iPhone 12 mini खरेदी करत असाल, तर तुम्हाला एचडीएफसी बँकेच्या (HDFC Bank) क्रेडिट कार्डवरुन चांगली सूट मिळेल.

अ‍ॅपल कंपनीचा iPhone 12 mini च्या 64 जीबी स्टोरेज वेरिएंटची किंमत 69,000 रुपये आहे. परंतु 2,800 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह हा फोन तुम्हाला 67,100 रुपयांना खरेदी करता येईल. यासोबतच या फोनवर 12,550 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देण्यात आली आहे. हा फोन नो कॉस्ट ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. तर, एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट कार्डच्या माध्यमातून तुम्ही जर हा फोन खरेदी केला तर तुम्हाला 6,000 रुपयांचा डिस्काउंट मिळेल.

तसंच, हा फोन खरेदी करताना पेमेंट एचडीएफसीच्या कार्डने केलं, तर तुम्हाला एकूण 8,800 रुपयांचा डिस्काउंट मिळेल. त्याचबरोबर एक्सचेंज ऑफर गृहित धरली, तर या फोनवर 21,350 रुपयांची ऑफर मिळू शकते.

(वाचा - इलेक्ट्रिक वाहनांच्या जगात पैसे कमावण्याची जबरदस्त संधी; जाणून घ्या काय आहे फंडा)

या फोनच्या 128 जीबी स्टोरेज वेरिएंटला तुम्ही 74,900 रुपयांऐवजी 71,900 रुपयात खरेदी करू शकता. तसंच, 256 जीबी स्टोरेज वेरिएंटला 84,900 रुपयांमध्ये खरेदी करू शकता.

Apple iPhone 12 Mini फीचर्स -

या फोनमध्ये 5.4 इंचाचा सुपर रेटिना XDR OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या फोनमध्ये ड्युअल सिम सपोर्ट देण्यात आला आहे. या फोनमध्ये नॅनो आणि ई-सिमचा वापर करता येऊ शकतो. हा फोन IOS 14 सॉफ्टवेअरवर काम करतो. यामध्ये A14 बायोनिक चिप देण्यात आली आहे.

(वाचा - Aadhaar च्या चुकीच्या वापराबाबत आता नो टेन्शन; गरजेनुसार असं करा लॉक-अनलॉक)

Apple iPhone 12 Mini कॅमेरा -

या फोनमध्ये ड्युअल रिअल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या फोनचा प्रायमरी सेन्सर अल्ट्रा वाइड 12 मेगापिक्सल आहे. तर दुसरा 12 मेगापिक्सलचा वाइड सेन्सर आहे. आयफोनच्या कॅमेऱ्यामध्ये नाइट मोड, डीप फ्यूजन, स्मार्ट HDR 3, 4K नाइट मोड, 4K Dollby Vision HDR रिकॉर्डिंगसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. या फोनच्या फ्रंटला 12 मेगापिक्सलचा ट्रू डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे.

First published:

Tags: Amazon, Apple, Discount offer, Iphone, Online shopping, Sale offers, Smartphone