Home /News /viral /

एक नंबर भावा! चार्जिंग, पेट्रोलची गरजच नाही, पठ्ठ्याने शोधला बाईक चालवण्याचा सॉलिड जुगाड; Must Watch

एक नंबर भावा! चार्जिंग, पेट्रोलची गरजच नाही, पठ्ठ्याने शोधला बाईक चालवण्याचा सॉलिड जुगाड; Must Watch

Drive bike without petrol : चार्जिंग, पेट्रोलशिवाय बाईक कशी चालवता येईल, हे प्रत्यक्षात या तरुणाने दाखवलं आहे.

    मुंबई, 22 जानेवारी : बाईक चालवायचं म्हटलं की पेट्रोल हवंच. आता इलेक्ट्रिक बाईक उपलब्ध झाल्या आहेत पण त्यासाठीही इलेक्ट्रिक चार्जिंगची गरज पडते. पण एका तरुणाने पेट्रोल आणि चार्जिंगशिवायच बाईक चालवली दाखवली आहे (Drive bike without petrol). या पठ्ठ्याने बाईक चालवण्यासाठी सॉलिड जुगाड शोधला आहे (Bike driving with desi jugaad) . हा व्हिडीओ पाहून सर्वजण हैराण झाले आहेत (Bike desi jugaad video). एका तरुणाने चक्क लाकडाचा वापर करून बाईक चालवली आहे (Drive bike with burning wood). तुम्हाला आश्चर्य वाटलं असेल ना? लाकडावर बाईक कशी काय चालू शकते. पण तुम्हाआम्हाला अशक्य वाटणारी ही गोष्ट या तरुणाने प्रत्यक्षात करून दाखवला आहे. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतो आहे. ही कोणता मजेशीर व्हिडीओ नाही बरं का? खराखुरा प्रयोग आहे. इतका खतरनाक प्रयोग तुम्ही कदाचित याआधी कधीच पाहिला नसेल. हे वाचा - VIDEO - शेळीसाठी जीव घातला धोक्यात; श्वास घेणं मुश्किल अशा खड्ड्यात गेला अखेर... लाकडाचा वापर करून बाईक कशी चालू शकते, या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला हा व्हिडीओ पाहिल्यानंतरच मिळेल. तरुणाने सर्वांसमोर याचा प्रयोग करून दाखवला आहे.  खरंतर व्हिडीओ पाहून तुमचा तुमच्या डोळ्यांवरही विश्वास बसणार नाही. व्हिडीओत पाहू शकता तरुण आपली बाईक आणतो आणि तो आज आपली गाडी पेट्रोलवर नाही, लाकडावर चालवणार असं सांगतो. त्यानंतर मित्रांची मदत घेत तो एक प्रयोग करतो. हे वाचा - Shocking! दोरीउड्या मारता मारता अचानक खड्डा झाला आणि...; भयंकर दुर्घटनेचा VIDEO एका बॉक्समध्ये लाकूड भरून त्यापासून गॅस तयार करतो. त्यासाठी तो लाकूड खूप वेळ गरम करतो. लाकूड गरम होताच त्यातून गॅस तयार होतं आणि मग तो एका ट्युबमध्ये भरतो आणि त्यावरच बाईक चालवतो. अगदी पेट्रोलवर पळवावी तशी तो सुसाट बाईक पळवतो. हा व्हिडीओ पाहणारा प्रत्येक जण हैराण झाला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Bike riding, Viral, Viral videos

    पुढील बातम्या