मराठी बातम्या /बातम्या /मनी /

SBI Fraud Alert: तुमच्या बँक खात्यासंदर्भातली 'ही' माहिती चुकूनही कुणाला सांगू नका; अन्यथा अकाउंट होईल रिकामं

SBI Fraud Alert: तुमच्या बँक खात्यासंदर्भातली 'ही' माहिती चुकूनही कुणाला सांगू नका; अन्यथा अकाउंट होईल रिकामं

बँक खात्यासंदर्भातली कोणतीही माहिती कुणालाही शेअर करू नका, असं बँकेने म्हटलं आहे.

बँक खात्यासंदर्भातली कोणतीही माहिती कुणालाही शेअर करू नका, असं बँकेने म्हटलं आहे.

बँक खात्यासंदर्भातली कोणतीही माहिती कुणालाही शेअर करू नका, असं बँकेने म्हटलं आहे.

मुंबई, 20 नोव्हेंबर: स्टेट बँक ऑफ इंडिया (State Bank Of India) ही देशातली सर्वांत मोठी बँक आहे. तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियाचे (SBI Fraud Alert) ग्राहक असाल तर तुमच्यासाठी खूप महत्त्वाची माहिती आहे. सध्या सायबर क्राइमचं (Cyber Crime) प्रमाण वाढलं आहे. त्यामुळे स्टेट बँक ऑफ इंडियानं आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून टि्वट करून आपल्या 44 कोटी ग्राहकांसाठी खूप महत्त्वाची सूचना जारी केली आहे. गुन्हेगार व्यक्ती ग्राहकांना मोफत भेटवस्तूच्या नावावर लिंक पाठवून वैयक्तिक माहिती चोरत आहेत. त्यामुळे बँक खात्यासंदर्भातली कोणतीही माहिती कुणालाही शेअर करू नका, असं बँकेने म्हटलं आहे.

हे महत्त्वाचे क्रमांक कोणालाही सांगू नका

ऑनलाइन बँकिंग फ्रॉडचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे. आपल्या ग्राहकांना सावधगिरीच्या सूचना बँक वेळोवेळी देते. स्टेट बँक ऑफ इंडियाने एक ट्विट केलं असून त्यात म्हटलं आहे, की आपल्या बँक खात्यासंबंधीची माहिती, म्हणजे, जन्मतारीख, डेबिट कार्ड क्रमांक, इंटरनेट बँकिंग युझर आयडी, पासवर्ड, डेबिट कार्ड पिन, सीव्हीव्ही क्रमांक आणि ओटीपी कोणालाही सांगू नका. अन्यथा तुमचं बँक खातं रिकामं होऊ शकतं.

ही चूक करू नका

एसबीआय, आरबीआय, सरकार, कार्यालय, पोलीस आणि केवायसी प्राधिकरणाच्या नावाने येणाऱ्या फोन कॉल्सपासून सावध राहा. तसंच आपल्या फोनमध्ये कुणाच्या सांगण्यावरून कोणतंही अॅप डाउनलोड करू नका. याशिवाय, अनोळखी व्यक्तींनी पाठवलेले ई-मेल्स आणि मेसेजमधल्या कोणत्याही लिंकवर क्लिक करू नका. याचबरोबर सोशल मीडियाचा वापर करताना खबरदारी बाळगा. सोशल मीडिया किंवा फोनवर येणारे कोणत्याही प्रकारचे भ्रामक संदेश आणि ऑफर्सना बळी पडू नका.

पेनी स्टॉकची कमाल! दीड वर्षात गुंतवणूकदारांच्या 1 लाखाचे झाले अडीच कोटी

सहसा आपण बँक (SBI) खाते क्रमांक, पासवर्ड, एटीएम कार्ड क्रमांकचा फोटो काढून ठेवतो; पण हे फोटो लीक होऊ शकतात. त्यामुळे फोटो काढून ठेवू नये. तसंच सार्वजनिक इंटरनेटचा वापर आर्थिक व्यवहार करण्यासाठी करू नका. यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती लीक होण्याची भीती असते, हे ग्राहकांनी लक्षात घ्यावं. गेल्या वर्षी लॉकडाउन लागू झाल्यापासून फसवणुकीच्या (fraud) घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ग्राहकांचे पैसे सुरक्षित ठेवणं हा बँकेचा उद्देश आहे. त्यामुळे बँक वेळोवेळी आपल्या ग्राहकांना ट्विटर हँडल आणि एसएमएसच्या साह्याने सतर्क करत असते. त्यामुळे बँक खात्यासंदर्भात या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे, अन्यथा नुकसान होऊ शकतं. स्टेट बँकेने हा अॅलर्ट दिला असला, तरी तो सर्वच बँकांच्या खातेदारांना लागू होतो.

First published:

Tags: Money, SBI