नवी दिल्ली, 23 एप्रिल : फोनमध्ये कॉल रेकॉर्डिंगची (Call Recording) सुविधा अनेकदा फायदेशीर ठरते, तर काही वेळा ही समस्याही ठरू शकते. या सुविधेचा सर्वांसाठी वेगवेगळा फायदा-तोटा आहे. पण आता कॉल रेकॉर्डिंग सुविधेबाबत मोठी अपडेट आहे. लवकरच ही सुविधा बंद होऊ शकते. पुढील महिन्यात 11 मेपासून तुमच्या अँड्रॉइड स्मार्टफोनमध्ये (Android Smartphone) ही सुविधा मिळू शकणार नाही, असं सर्च इंजिन गुगलच्या (Google) एका निर्णयामुळे होणार आहे. गुगल आपली पॉलिसी बदलत आहे. या बदलांमध्ये थर्ड पार्टी कॉल रेकॉर्डिंग App बंद होतील. गुगलची नवी पॉलिसी 11 मेपासून लागू होणार आहे. नव्या धोरणानुसार, प्ले स्टोअरवर (Google Play Store Call Recording App) असलेले कॉल रेकॉर्डिंग App निष्क्रिय होतील. अँड्रॉइड फोनवर तुम्ही कॉल रेकॉर्डिंगसाठी या App चा वापर करू शकणार नाही. नवी प्ले स्टोअर पॉलिसी - मिळालेल्या माहितीनुसार, नव्या पॉलिसीनुसार, App डेव्हलपर्सला कॉल रेकॉर्डिंगसाठी एक्सेसिबिलिटी एपीआयची सुविधा मिळणार नाही आणि ही सुविधा बंद झाल्यास App रेकॉर्डिंगचं काम करू शकणार नाही. नव्या प्ले स्टोअर पॉलिसीनुसार, रिमोट कॉल ऑडिओ रेकॉर्डिंगसाठी एक्सेसिबिलिटी API ची सुविधा मिळणार नाही. ही सुविधा बंद झाल्यास ट्रूकॉलर, ऑटोमेटिक कॉल रेकॉर्डरसह अनेक रेकॉर्डिंग App काम करणार नाहीत. याआधी सुरक्षेच्या कारणास्तव गुगलने अँड्रॉइड 10 सह कॉल रेकॉर्डिंग फीचर हटवलं होतं. अँड्रॉइड 11 सह एक्सेसिबिलिटी API फीचर आणलं. या फीचरचा वापर करुन डेव्हलपर्सने कॉल रेकॉर्डिंग App पुन्हा लाँच केले.
हे वाचा - UPI Payment चा वापर करता? चुकूनही करू नका हे काम, रिकामं होईल बँक अकाउंट
टेक एक्सपर्ट्सनुसार, तुमच्या अँड्रॉइड फोनच्या डायलरमध्ये डिफॉल्ट रुपात कॉल रेकॉर्डिंग सुविधा असल्यास रेकॉर्डिंग करता येईल. प्री-लोडेड App किंवा फीचरसाठी एक्सेसिबिलिटी API परमिशनची गरज नाही. Google Pixel आणि शाओमी (Xiaomi) स्मार्टफोनमध्ये ही सुविधा डिफॉल्ट रुपात आहे. त्यामुळे या युजर्सला कॉल रेकॉर्डिंगची सुविधा मिळेल.