मुंबई, 6 सप्टेंबर: स्मार्टफोनचा वापर आता फक्त बोलण्यापुरता मर्यादित राहिलेला नाही. इतरही अनेक कामं स्मार्टफोनच्या माध्यमातून तुम्ही करू शकता. आजच्या काळात अनेक लोक कार्यालयीन कामं तसेच घरातील कामं करतात. अशा कामांमुळं अनेकदा लोक वेळेवर मीटिंगला उपस्थित राहू शकत नाहीत. अनेक लोक मीटिंगच्या वेळा आणि तारखा विसरतात. एवढंच नाही तर घरातील इतर कार्यक्रम तसेच आपल्या मित्रांचे आणि नातेवाईकांचे वाढदिवसही अनेकजण विसरतात.
Google Calendar च्या मदतीनं मीटिंग शेड्यूल करण्यासाठी तुम्हाला जास्त काळजी करण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनवर अशा प्रकारे मीटिंग शेड्यूल करू शकता. मीटिंग शेड्यूल करण्यासाठी तुम्हाला मोबाईल फोनवर कोणतेही वेगळं अॅप इन्स्टॉल करण्याची गरज नाही. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, तुम्ही तुमच्या मोबाईल फोनच्या कॅलेंडरमध्ये मीटिंग कशी शेड्यूल करू शकता.
गुगल कॅलेंडरच्या मदतीनं करा मीटिंग शेड्यूल -
हेही वाचा- Whatsappवर चॅटिंग करत असूनही दिसाल ऑफलाइन, लवकरच येणार खास फीचर
वाढदिवस लक्षात ठेवणं खूपच सोपं-
कधी-कधी काही लोकांचे मित्र आणि नातेवाईक त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा वेळेवर दिल्या नाहीत तर रागावतात. जर तुम्ही तुमच्या मित्रांना आणि नातेवाईकांना त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यास विसरू नये, असं वाटत असेल, अशा परिस्थितीत तुम्ही गुगल कॅलेंडरची मदत घेऊन आगाऊ रिमाइंडर सेट करू शकता. जेणेकरून तुम्ही प्रथम त्यांचे अभिनंदन करू शकता. आता आम्ही तुम्हाला रिमाइंडर कशी सेट करू शकता ते सांगू.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Google, Meeting, Online meetings