मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Amazon Prime युजर्सला मोठा फटका; मेंबरशिपसाठी द्यावे लागणार 50 टक्के अधिक पैसे, पाहा नवी लिस्ट

Amazon Prime युजर्सला मोठा फटका; मेंबरशिपसाठी द्यावे लागणार 50 टक्के अधिक पैसे, पाहा नवी लिस्ट

Amazon Prime Membership च्या किंमतीत 50 टक्क्यांची वाढ होणार आहे.

Amazon Prime Membership च्या किंमतीत 50 टक्क्यांची वाढ होणार आहे.

Amazon Prime Membership च्या किंमतीत 50 टक्क्यांची वाढ होणार आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 24 नोव्हेंबर : Amazon Prime Membership च्या किंमतीत 50 टक्क्यांची वाढ होणार आहे. ही दरवाढ कधीपासून लागू होणार याबाबत कंपनीकडून अद्याप कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. परंतु देसी डाइमच्या एका पोस्टनुसार, भारतात नव्या आणि जुन्या मेंबरसाठी 14 डिसेंबरपासून मेंबरशिपच्या नव्या किमती लागू होऊ शकतात. युजरकडे जुन्या किंमतीत 129, 329 आणि 999 रुपयांत मेंबरशिप घेण्याची शेवटची तारीख 13 डिसेंबर आहे.

नव्या अपडेटनंतर अॅमेझॉन प्राइम मेंबरशिपचा 999 रुपयांचा प्लॅन 1499 रुपये होईल. या प्लॅनची वॅलिडिटी 12 महिन्यांची आहे. तर 329 रुपयांचा तिमाही प्लॅन 459 रुपये होईल. तसंच 129 रुपयांच्या मासिक प्लॅनची किंमत 179 रुपये होईल. रिपोर्टनुसार, नव्या किंमती 13 डिसेंबरपासून सुरू होणार असल्याची माहिती आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, प्राइम मेंबरशिपच्या किंमती वाढण्यामागे नव्या सेवा लागू करणं हे कारणं आहे. एक वर्षासाठी 999 रुपये प्राइम सब्सक्रिप्शन नेटफ्लिक्स, Apple आणि इतर कंपन्यांना द्वारा देण्यात येणाऱ्या योजनांच्या तुलनेत सर्वात स्वस्त आणि आकर्षक प्लॅन असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Airtel नंतर VIचा प्रीपेड युजर्सना झटका! टॅरिफ प्लॅनमध्ये 20 ते 25 टक्क्यांनी वाढ

मेंबरशिपमध्ये अनेक बेनिफिट मिळतात. ज्यात Amazon.com द्वारे वन डे डिलिवरी, प्राइम व्हिडीओवर मोफत चित्रपट आणि टीव्ही शोचा अॅक्सेस, अॅमेझॉन म्युझिकवर गाण्याचा ऑफलाइन उपयोग आणि प्राइम गेमिंगवर गेमिंग सामिल आहे.

Amazon India लवकरच देशात प्राइम मेंबरशिपच्या (Prime Membership) किंमती वाढवण्याच्या तयारीत आहे. Amazon वेबसाइटनुसार, Prime Membership किंमती मासिक, तीन महिन्यांसाठी आणि वर्षासाठी अशा तीन 3 स्तरांमध्ये वाढवल्या जातील. Amazon Prime Membership जुलै 2016 मध्ये 499 रुपयांच्या सुरुवाती किंमतीत भारतात लाँच करण्यात आलं होतं. त्यानंतर त्याला 2027 पासून 999 रुपये करण्यात आलं. तेव्हापासून म्हणजेच 2017 नंतर मेंबरशिप कॉस्ट पहिल्यांदाच वाढली आहे.

दरम्यान, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म Amazon ने आपला सर्वात स्वस्त मंथली सब्सक्रिप्शन प्लॅन (Monthly Subscription Plan) बंद करण्याची घोषणा केली होती. कंपनीच्या या घोषणेनंतर आता Amazon Prime चा 129 रुपयांचा सब्सक्रिप्शन प्लॅन युजर्सला उपलब्ध होणार नाही.

First published:

Tags: Amazon subscription, Tech news