• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Airtel नंतर आता VI ने प्रीपेड युजर्सना दिला झटका! टॅरिफ प्लॅनमध्ये 20 ते 25 टक्क्यांची होणार वाढ

Airtel नंतर आता VI ने प्रीपेड युजर्सना दिला झटका! टॅरिफ प्लॅनमध्ये 20 ते 25 टक्क्यांची होणार वाढ

टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी Vodafone Idea ने प्रीपेड युजर्ना देण्यात येणाऱ्या टॅरिफ प्लॅनमध्ये 20-25 टक्क्यांची वाढ (Vodafone Idea Prepaid Plans) केली आहे. जाणून घ्या कधीपासून हे नवे दर लागू होतील

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 नोव्हेंबर: टेलिकॉम सर्व्हिस प्रोव्हायडर कंपनी Vodafone Idea ने प्रीपेड युजर्ना देण्यात येणाऱ्या टॅरिफ प्लॅनमध्ये 20-25 टक्क्यांची वाढ (Vodafone Idea Prepaid Plans) केली आहे. कंपनीने 23 नोव्हेंबर रोजी एक्सचेंजला ही माहिती दिली आहे. 'नवीन प्लॅनमुळे ARPU सुधारण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि उद्योगाला भेडसावणार्‍या आर्थिक समस्यांचे निराकरण करण्यासाठी देखील मदत होईल', VI ने जारी केलेल्या रीलिजमध्ये म्हटले आहे. ग्राहकांना लवकरच हा अतिरिक्त खर्च सहन करावा लागणार आहे. ही दरवाढ 25 नोव्हेंबर 2021 पासून लागू होईल. याआधी 22 नोव्हेंबर रोजी एअरटेलने (Airtel Prepaid Plans) आपल्या प्रीपेड युजर्ससाठी 20 ते 25 टक्के दर वाढवण्याची घोषणा केली होती, त्यानंतर VI ने आता असेच पाऊल उचलले आहे. आता Vodafone Idea Limited चा बेसिक प्लॅन 79 रुपयांऐवजी 99 रुपयांपासून सुरू होणार आहे. याशिवाय सर्वाधिक वापरला जाणारा 249 रुपयांचा प्लॅन, ज्यात 28 दिवसांसाठी 1.5 जीबी डेटा डेली मिळत असे, तो प्लॅन आता 299 रुपये करण्यात आला आहे. हे वाचा-Gold Price Today: आज सोन्याचा भाव वधारला की कमी झाला? वाचा लेटेस्ट गोल्ड रेट्स याशिवाय 1GB डेटा पॅकसाठी 219 रुपयांऐवजी आता 269 रुपये आकारले जातील. 28 दिवसांच्या वैधतेसाठी 299 रुपयांचा 2GB डेटा पॅक 359 रुपयांवर गेला आहे. 56 दिवसांच्या 2GB पॅकसाठी 449 रुपयांमध्ये 539 रुपये द्यावे लागतील. त्याचप्रमाणे 56 दिवसांच्या 1.5GB डेटा पॅकसाठी 399 रुपयांऐवजी 479 रुपये आकारले जातील. Airtel ने वाढवले ​​सर्व प्लानचे दर, सर्वात स्वस्त प्लान झाले महाग 84 दिवसांचा पॅकची किंमत सध्या 699 रुपये आहे ज्यामध्ये दररोज 2GB डेटा उपलब्ध आहे, आता 25 नोव्हेंबरपासून तुम्हाला या पॅकसाठी 839 रुपये मोजावे लागतील. 84 दिवसांसाठी डेली 1.5GB डेटा पॅकची किंमत सध्याच्या 599 रुपयांऐवजी 719 रुपये मोजावी लागेल. याशिवाय 1499 रुपयांच्या 24GB डेटाच्या वार्षिक पॅकची किंमत आता 1799 रुपयांपर्यंत वाढणार आहे. यासोबतच टॉपअप पॅकमध्येही बदल करण्यात आले आहेत. 28 दिवसांसाठी पॅक जो 48 रुपयांचा होता, त्याकरता 58 रुपये मोजावे लागणार आहेत.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: