नवी दिल्ली, 7 जुलै: अॅमेझॉन कंपनीचे सर्वेसर्वा आणि जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती असलेले जेफ बेझॉस (Jeff Bezos) यांनी मंगळवारी संपत्ती कमवण्याच्या बाबतीतही उच्चांक गाठत जगातला सर्वाधिक संपत्ती कमवणारी व्यक्ती होण्याचा विक्रम नोंदवला. मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशन (Microsoft Corp.) या अॅमेझॉनच्या प्रतिस्पर्धी कंपनीला दिलेलं क्लाउड कॉम्प्टयुटिंगशी संबंधित प्रोजेक्ट रद्द करणार असल्याची घोषणा द पेंटॅगॉनकडून करण्यात आली आणि त्यांच्या अॅमेझॉन डॉट कॉम आयएनसी (Amazon.com Inc.) या कंपनीच्या शेअर्सनी शेअर बाजारात 4.7 टक्क्यांची उसळी घेतली. याचबरोबर बेझॉस यांची संपत्ती नेटवर्थ 211 अब्ज अमेरिकी डॉलर इतकी झाली. शेअरच्या किमतीत आलेल्या या उसळीने बेझॉस यांच्या मालमत्तेमध्ये 8.4 अब्ज डॉलर्सची वाढ झाली अशी माहिती ब्लूमबर्ग बिलेनियर्स इंडेक्सच्या (Bloomberg Billionaires Index) वतीने देण्यात आली आहे.
लाइव्ह मिंटने दिलेल्या वृत्तानुसार, या वर्षी जानेवारी महिन्यात टेस्ला आयएनसीचे मालक इलॉन मस्क (Elon Mask) यांची संपत्ती जवळजवळ 210 अब्ज डॉलर झाली होती. जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तींमध्ये नाव असलेल्या या अमेरिकी उद्योजकांनी या वर्षाच्या सुरुवातीचा काही काळ जगातील सर्वांत श्रीमंत व्यक्तीच्या स्थानावर दावा केला होता. पण अॅमेझॉन कंपनीच्या शेअर्समध्ये मार्चच्या मध्यापासून 20 टक्के वाढ झाल्यामुळे तेव्हापासून बेझॉस नंबर 1 वर टिकून आहेत.
शेअर्सच्या किमती गेल्या काही काळात वाढत असल्याने मस्क यांच्यासह तंत्रज्ञानाच्या उद्योगांत असलेल्या उद्योजकांच्या कंपन्यांच्या शेअर्सना बळकटी मिळाली आहे. मंगळवारी टेस्लाचे शेअर्स कोसळले असले तरीही नेटवर्थ 180.8 अब्ज डॉलर संपत्तीसह मस्क यांनी श्रीमंतांच्या यादीतलं आपलं दुसरं स्थान पक्कं ठेवलं आहे. फ्रान्समधील लक्झरी गूड्स तयार करणाऱ्या कंपनीनेच मालक बर्नार्ड अरनॉल्ट यांनी नेटवर्थ 168.5 अब्ज डॉलर संपत्तीसह या यादीत तिसरं स्थान मिळवलं आहे.
2020 मध्ये जगभरात आलेल्या कोरोना महामारीमुळे ऑनलाईन खरेदी (Online Shopping) आणि व्यवहारांना मोठं बळ मिळालं होतं आणि त्यामुळे अॅमेझॉनच्या शेअरने उसळी मारली होती, तेव्हाही बेझॉस यांची संपत्ती सर्वाधिक म्हणजे 206.9 अब्ज डॉलर इतकी झाली होती पण आताची भरारी त्यापेक्षाही अधिक उंच आहे. 57 वर्षांच्या बेझॉस यांनी 27 वर्ष अॅमेझॉन कंपनीचे चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हे पद सांभाळलं आणि नुकतंच गेल्या आठवड्यात ते या पदावरून पायउतार झाले आहेत. ते अजूनही कंपनीचे एक्झिक्युटिव्ह चेअरमन आहेत आणि त्यांच्याकडे कंपनीचे 11 टक्के शेअर्स आहेत.
2019 मध्ये त्यांनी मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनला दिलेलं क्लाउड कॉम्प्युटिंगसंबंधीचं 10 अब्ज डॉलर्सचं कॉन्ट्रक्ट रद्द करत असल्याचं मंगळवारी पेंटॅगॉनने जाहीर केलं. या डीलसाठी अमेरिकी अधिकारी आणि अनेक तंत्रज्ञानक्षेत्रातील उद्योजकांमध्ये अनेक वर्ष चर्चा झाली होती. त्यानंतर पेंटॅगॉनने हा निर्णय घेतला आहे. पेंटॅगॉनने घेतलेल्या या निर्णयावरून असं दिसून येतं की आता पेंटॅगॉन हे कॉन्ट्रॅक्ट मायक्रोसॉफ्ट आणि अॅमेझॉन या कंपन्यांना विभागून देईल. बिलेनयरच्या या यादीत बेझॉस यांच्या आधीच्या पत्नी मॅकेन्झी स्कॉट या 2.9 अब्ज डॉलर संपत्तीसह मंगळवारी 15 व्या स्थानावर होत्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amazon