मराठी बातम्या /बातम्या /ऑटो अँड टेक /

8 लाखांची कार Loan वर घेतली तर भरावे लागतील 10.47 लाख रुपये; समजून घ्या व्याज दराचं गणित

8 लाखांची कार Loan वर घेतली तर भरावे लागतील 10.47 लाख रुपये; समजून घ्या व्याज दराचं गणित

5 आणि 8 लाख रुपये किमतीच्या कारसाठी 3 वर्षे, 5 वर्षे आणि 7 वर्षांच्या कालावधीचं कर्ज घेतलं तर एकूण किंमत कशी असेल याचं गणित समजून घ्या.

5 आणि 8 लाख रुपये किमतीच्या कारसाठी 3 वर्षे, 5 वर्षे आणि 7 वर्षांच्या कालावधीचं कर्ज घेतलं तर एकूण किंमत कशी असेल याचं गणित समजून घ्या.

5 आणि 8 लाख रुपये किमतीच्या कारसाठी 3 वर्षे, 5 वर्षे आणि 7 वर्षांच्या कालावधीचं कर्ज घेतलं तर एकूण किंमत कशी असेल याचं गणित समजून घ्या.

नवी दिल्ली, 30 सप्टेंबर : स्वत:ची Four Wheeler असावी, हे प्रत्येकाचं स्वप्न असतं. मात्र, कार खरेदी करता येईल इतकी रक्कम प्रत्येकाकडे शिल्लक असेलचं असं नाही. अनेक लोक जेव्हा कार खरेदी करण्याचा विचार करतात, तेव्हा ते वाहन कर्ज अर्थात Auto Loan चा पाहतात. वाहन कर्ज घेतल्यानंतर दरमहा एक निश्चित रक्कम कर्जफेडीचा हप्ता EMI म्हणून भरावी लागते. परिणामी आपल्या खिशातून एकाच वेळी मोठी रक्कम जात नाही शिवाय महिन्याचं खर्चाचं बजेटही बिघडत नाही. त्यामुळे कार खरेदी करणारे 90 टक्के लोक कर्ज घेतात. जर तुम्ही सुद्धा असंच काहीसं नियोजन करत असाल, तर ही बातमी नक्की वाचा. कोणती बँक कोणत्या व्याज दराने (Interest Rates) कार लोन देत आहे? किती मुदतीचं कर्ज घेऊन कारची एकूण किंमत (Final Cost of Car) किती रुपये पडेल? याबाबत माहिती घेणं गरजेचं आहे. यासाठी 5 आणि 8 लाख रुपये किमतीच्या कारसाठी 3 वर्षे, 5 वर्षे आणि 7 वर्षांच्या कालावधीचं कर्ज घेतलं तर एकूण किंमत कशी असेल याचं गणित समजून घ्या.

दिवाळीला नवी Car खरेदी करायचा प्लान करताय?, मग ही बातमी नक्की वाचा

बहुतेक बँकांचा व्याजदर आहे 8 टक्के -

सध्या, बहुतेक बँका वाहन कर्जावर जवळपास 8 टक्के व्याज दर आकारत आहेत. बँक ऑफ बडोदामध्ये वाहन कर्जाचा प्रारंभिक व्याज दर 7.25 टक्के आहे, तर कॅनरा बँकेत 7.30 टक्के. अॅक्सिस बँकेमध्ये 7.45 टक्क्यांपासून वाहन कर्जाची सुरुवात होते. आयसीआयसीआय बँक 7.90 टक्क्यांनी आपल्या ग्राहकांना वाहन कर्ज पुरवते. कर्ज देणारी देशातील सर्वात मोठी बँक अशी ओळख असलेल्या स्टेट बँक ऑफ इंडियातील वाहन कर्जाची सुरुवात 7.70 टक्क्यांपासून होते. सर्व बँकांतील वाहन कर्जावरील सध्याचा व्याजदर लक्षात घेता, सर्वांचा व्याजदर 8 टक्क्यांच्या जवळपास आहे. त्यामुळे वाहन कर्जाचं गणित समजून घेताना आपण 8 टक्केचं गृहीत धरू.

5 लाखांच्या कारची काय असेल अंतिम किंमत -

जर 8 टक्के व्याजासह 3 वर्षांच्या मुदतीसाठी वाहन कर्ज घेतलं, तर 15 हजार 668 रुपयांचा EMI असेल. त्याप्रमाणे तीन वर्षांत एकूण 64 हजार 55 रुपये निव्वळ व्याज म्हणून भरावे लागतील. म्हणजेचं तीन वर्षात, 5 लाख रुपयांच्या कारसाठी एकूण 5 लाख 64 हजार 55 रुपये भरावे लागतील.

जर याच व्याज दराने 5 वर्षांच्या कालावधीसाठी वाहन कर्ज घेतलं, तर 10 हजार 138 रुपयांचा EMI भरावा लागेल. म्हणजेच पाच वर्षांत 1 लाख 8 हजार 292 रुपये फक्त व्याज भरावं लागेल. अशा परिस्थितीत, 5 वर्षांनंतर एका कारची अंतिम किंमत 6 लाख 8 हजार 292 रुपये इतकी होईल.

जर 8 टक्के व्याजाने 7 वर्षांसाठी कर्ज घेतलं, तर 7 हजार 793 रुपये EMI भरावा लागेल. परिणामी 1 लाख 54 हजार 621 रुपये व्याज म्हणून भरावे लागतील. म्हणजेच 7 वर्षांनंतर, 5 लाख रुपयांच्या कारची किंमत 6 लाख 54 हजार 621 रुपये इतकी होईल.

आधी येऊ लागला धूर, अन् बघताच क्षणी Electric Scooter ने घेतला पेट, VIDEO VIRAL

8 लाखांच्या कारची काय असेल अंतिम किंमत -

जर 8 लाख रुपये किमतीची कार 8 टक्के व्याज आणि 3 वर्षांच्या कालावधीच्या वाहन कर्जासह घेतली, तर 25 हजार 69 रुपयांचा EMI भरावा लागेल. म्हणजेच तुमच्या खिशातून 1 लाख 2 हजार 487 रुपयांची रक्कम फक्त व्याज म्हणून जाईल. अशा परिस्थितीत 3 वर्षांनंतर, 8 लाख रुपयांची कार 9 लाख 2 हजार 487 रुपयांना पडेल.

जर हेच वाहन कर्ज 5 वर्षांसाठी घेतलं, तर 16 हजार 221 रुपयांचा EMI होईल. याप्रमाणे पाच वर्षात 1 लाख 73 हजार 267 रुपये व्याज म्हणून भरावे लागतील. म्हणजेचं 5 वर्षांनंतर 8 लाख रुपये किंमतीच्या कारसाठी 9 लाख 73 हजार 267 रुपये मोजावे लागतील.

7 वर्षांच्या मुदतीसाठी 8 टक्के व्याजाने कर्ज घेतलं तर, 12 हजार 469 रुपयांचा EMI भरावा लागेल. म्हणजेच एकूण 2 लाख 47 हजार 394 रुपये व्याज द्यावे लागेल. अशा परिस्थितीत कारची अंतिम किंमत 10 लाख 47 हजार 394 रुपये इतकी असेल.

First published:

Tags: Car, Loan