महिलेला 388 रुपये किमतीचं नेल-पॉलिश पडलं 92,466 रुपयांना, ऑनलाइन खरेदीचा दणका

महिलेला 388 रुपये किमतीचं नेल-पॉलिश पडलं 92,466 रुपयांना, ऑनलाइन खरेदीचा दणका

सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या महिलेनं 388 रुपयांचे नेल पॉलिश मागवलं होतं. मात्र महिलेला तब्बल 92 हजार 446 रुपयांचा फटका बसला आहे.

  • Share this:

मुंबई, 17 फेब्रुवारी : ऑनलाइन फ्रॉडची प्रकरणे दिवसेंदिवस समोर येत आहेत. एका तरुणीला ऑनलाइन नेल पॉलिश मागवणं महागात पडलं आहे. पेशाने सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेल्या महिलेनं 388 रुपयांचे नेल पॉलिश मागवलं होतं. मात्र महिलेला तब्बल 92 हजार 446 रुपयांचा फटका बसला आहे. महिलेने डिलिव्हरीसाठी उशिर होत असल्याने कस्टमर केअरला फोन केला आणि तिची फसवणूक झाली.

फसवणूक झालेल्या महिलेने शनिवारी वाकड़ पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दोघांविरुद्द गुन्हा दाखल केला आहे. पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, महिलेनं एका साइटवरून नेल पॉलिश ऑर्डर केलं. त्यासाठी खासगी बँकेच्या खात्यावरून 388 रुपयांचे बिलही दिले.

जेव्हा महिलेनं वेळेवर पार्सल आलं नाही तेव्हा वेबसाइटवर असलेल्या कस्टमर केअरशी संपर्क केला. तेव्हा कंपनीने पेमेंट मिळालं नसल्याचं महिलेला सांगितलं. तसेच पैसे परत देण्याचे आश्वासन देत महिलेकडं मोबाइल नंबर मागितला.

महिलेकडे मोबाइल नंबर मागितल्य़ानंतर थोड्याच वेळात तिच्या खात्यावरून पाच वेळा थोडी थोडी मिळून 90 हजार 846 रुपयांची रक्कम काढण्यात आली. त्याशिवाय आणखी एका खात्यावरून 1500 रुपये काढण्यात आले. महिलेनं आपण कोणत्याही प्रकारची बँकेची माहिती दिली नव्हती असं सांगितलं होतं.

वाचा : तुम्ही ऑनलाइनही होऊ शकता कोरोनाचे शिकार, तुम्हालाही आलाय का असा Email?

याआधी उत्तर प्रदेशमधील नोएडात एकाला ऑनलाइन फूड ऑर्डर करणं महागात पडलं होतं. ऑर्डर कॅन्सल केल्यानतंर असाच कस्टमर केअरला फोन केल्यानंतर त्याच्या खात्यावरून 1 लाख रुपये काढण्यात आले होते. संबंधित ऑनलाइन फूड डिलिव्हरी करणाऱ्या कंपनीने आमचा कोणताही कस्टमर केअर क्रमांक नसल्याचं स्पष्ट केलं होतं.

तुमचे पासवर्ड, डेटा सुरक्षित आहे का? चेक करा आणि नसेल तर सेटिंग बदला

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Feb 18, 2020 07:32 AM IST

ताज्या बातम्या