नवी दिल्ली, 9 मे: Apple च्या सर्वात सुरक्षित मानल्या जाणाऱ्या IOS वर धोकादायक मालवेअरचा अटॅक झाला आहे. त्यामुळे जवळपास 128 मिलियन म्हणजेच 12.8 कोटी युजर्स प्रभावित झाल्याची माहिती आहे. या मालवेअरचं नाव XcodeGhost आहे. यापूर्वीही 2015 मध्ये या मालवेअरचा अटॅक झाला होता. त्यामुळे अॅप स्टोरवर अपलोड झालेल्या iPhone आणि iPad चे अनेक अॅप्स प्रभावित झाले होते.
Epic Games आणि Apple दरम्यान सुरू असलेल्या ट्रायलवेळी अॅपलच्या इंटरनल ईमेल्समध्ये खुलासा झाला आहे, की 128 मिलियन युजर्सने असे 2500 अॅप्स डाउनलोड केले होते, जे या मालवेअरने प्रभावित झाले होते. Motherboard रिपोर्टनुसार, हे 2500 इन्फेक्टेड अॅप्स 203 मिलियन वेळा अॅप स्टोरवरुन डाउनलोड करण्यात आले आहेत.
रिपोर्टनुसार, अॅपलचा सर्व्हर स्लो असल्याने काही डेव्हलपर्सने इन्फेक्टेड Xcode डाउनलोड केलं. अल्टरनेटिव डाउनलोड लिंक्सही यात शोधण्यात आल्या. यात चीनचे 55 टक्के ग्राहक आणि 66 टक्के डाउनलोड्स सामिल आहेत. अॅपलच्या इंटरनल ईमेल्सनुसार, 18 मिलियन युजर्स अमेरिकेतील आहेत.
या मालवेअरमुळे ‘Angry Birds 2’ सारखा प्रसिद्ध गेमवरही परिणाम झाला आहे. मालवेअरबाबत माहिती मिळाल्यानंतर अॅपलने त्वरित डेव्हलपर्सला त्यांच्या अॅप्सला Xcode योग्य वर्जनवरुन अॅप्स रिकम्पाईल करण्याचं सांगितलं आहे. या घटनेनंतर अॅप स्टोरमध्ये, अॅप सबमिट करताना अॅपलने Xcode इंस्टॉलेशन प्रक्रियेची सुरक्षा आणि मालवेअर स्कॅनिंग दोन्ही गोष्टी ठीक केल्याचं सांगण्यात आलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.