मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /तुमच्या फोनवरही असा Message आला का? Alert राहा! असू शकतो धोकादायक व्हायरस

तुमच्या फोनवरही असा Message आला का? Alert राहा! असू शकतो धोकादायक व्हायरस

मागच्या महिन्यात फ्लुबॉट मालवेअर (Flubot Malware) नावाचा व्हायरस आला होता. या मालवेअरच्या माध्यमातून मेसेज (Message) पाठवून हॅकर्स स्मार्टफोन हॅक करत होते. आता पुन्हा एकदा हा व्हायरस समोर आला आहे.

मागच्या महिन्यात फ्लुबॉट मालवेअर (Flubot Malware) नावाचा व्हायरस आला होता. या मालवेअरच्या माध्यमातून मेसेज (Message) पाठवून हॅकर्स स्मार्टफोन हॅक करत होते. आता पुन्हा एकदा हा व्हायरस समोर आला आहे.

मागच्या महिन्यात फ्लुबॉट मालवेअर (Flubot Malware) नावाचा व्हायरस आला होता. या मालवेअरच्या माध्यमातून मेसेज (Message) पाठवून हॅकर्स स्मार्टफोन हॅक करत होते. आता पुन्हा एकदा हा व्हायरस समोर आला आहे.

    नवी दिल्ली, 4 ऑक्टोबर : स्मार्टफोन (Smartphone) आणि इंटरनेट (Internet) ही आपली दैनंदिन गरज बनली आहे. जगभरात स्मार्टफोन आणि इंटरनेट युजर्सची संख्या दिवसेंदिवस वाढत असून यामुळे आपली अनेक कामं सुलभ झाली. एखादी गोष्ट जितकी उपयुक्त असते तितकाच त्याचा तोटाही असतो. स्मार्टफोन आणि इंटरनेट या गोष्टीदेखील याला अपवाद नाहीत. एकीकडे सातत्याने स्मार्टफोनच्या वापरामुळे आरोग्यविषयक समस्या निर्माण होत आहेत, तर दुसरीकडे सायबर गुन्हेगारीचे (Cyber Crime) प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे युजर्सनी अधिक दक्षता घ्यावी, असा सल्ला तज्ज्ञ देत आहेत. सायबर गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असल्याने त्याचा मोठा फटका युजर्सना बसू शकतो. कारण हॅकर्स (Hackers) नवनवीन पद्धतींचा वापर करून तुमची खासगी, आर्थिक माहिती चोरण्याचा प्रयत्न करत असल्याचं दिसून आलं आहे. यातच गेल्या महिन्यात एक नवीन व्हायरस (Virus) आढळून आला आहे. मेसेजच्या माध्यमातून हा व्हायरस स्मार्टफोनमध्ये एन्ट्री करत असल्याचं समोर आलं आहे.

    मागच्या महिन्यात फ्लुबॉट मालवेअर (Flubot Malware) नावाचा व्हायरस आला होता. या मालवेअरच्या माध्यमातून मेसेज (Message) पाठवून हॅकर्स स्मार्टफोन हॅक करत होते. सध्या हा व्हायरस पुन्हा धुमाकूळ घालत असल्याचं समोर आलं आहे. आता हॅकर्सनी स्मार्टफोन हॅक करण्यासाठी नवी पद्धत शोधून काढली असून, युजर्सनी सावधगिरी बाळगावी, असा सल्ला 'कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम ऑफ न्यूझीलॅंड'ने दिला आहे.

    या अत्यंत धोकादायक व्हायरसपासून आपल्या खासगी आणि बॅंकिंगविषयक माहितीचा बचाव करण्यासाठी सतर्कता बाळगणं अत्यंत महत्त्वाचं आहे. स्मार्टफोनवर लिंकच्या माध्यमातून कोणतंही पेज ओपन करताना त्याविषयी पूर्ण माहिती घेणं आवश्यक आहे.

    Alert! Amazon-Flipkart वरुन Online Shopping करताना या 4 गोष्टी लक्षात ठेवाच

    काय आहे Flubot Malware?

    आता हॅकर्सनी या मालवेअरच्या माध्यमातून स्मार्टफोन हॅक करण्याची पद्धत बदलली आहे. त्यानुसार, तुमच्या फोनवर एक लिंक (Link) असलेला मेसेज येईल. कदाचित तो सामानाच्या डिलिव्हरी संदर्भात असेल. तुम्ही या मेसेजवर क्लिक केल्यास स्मार्टफोनच्या स्क्रीनवर एक मेसेज डिस्प्ले (Display) होईल. त्यात तुमच्या स्मार्टफोनवर Flubot Malware ने हल्ला केला आहे, असं लिहिलं असेल. त्यानंतर अजून एक मेसेज तुमच्या स्मार्टफोन स्क्रीनवर येईल. त्यात तुम्हाला Flubot Malware पासून बचाव करण्यासाठी अँड्रॉइड सिक्युरिटी अपडेट डाउनलोड करण्यास सांगितलेलं असेल. या मेसेजमधली लिंक सिक्युरिटी अपडेटची आहे, असं समजून तुम्ही क्लिक केल्यास हा मालवेअर तुमच्या स्मार्टफोनमध्ये प्रवेश करतो.

    या व्हायरसचा परिणाम बॅंक आणि पैशांच्या व्यवहाराशी संबंधित माहितीवर होतो. हा व्हायरस फोनमधील बॅंकिंग पासवर्डदेखील चोरू शकतो. सध्या हा व्हायरस जगातल्या बहुतांश अँड्रॉइड फोनमध्ये दिसून येत आहे.

    Alert! Google ने Play Store वर बॅन केले 136 धोकादायक Apps; लगेच करा डिलीट

    Flubot Malware या अत्यंत धोकादायक व्हायरसपासून बचाव करण्यासाठी फोनवर दिसणाऱ्या पॉपअप (POP-UP) स्क्रीनकडे दुर्लक्ष करा. तसंच सिक्युरिटी अपडेट समजून कोणत्याही लिंकवर योग्य माहिती न घेता क्लिक करू नये. तुमच्या स्मार्टफोनमध्ये या व्हायरसने प्रवेश केला, तर तातडीने फोनमधल्या डेटाचा बॅकअप घेऊन, फोनच्या सेटिंग ऑप्शनमध्ये जाऊन फॅक्टरी रिसेट (Factory Reset) करा. तसंच या दरम्यान लॉगइन डिटेल्स किंवा पासवर्ड टाकू नयेत.

    तुमच्या स्मार्टफोनवर कोणतीही अनोळखी किंवा संशयास्पद लिंक पाठवली गेली, तर त्यावर क्लिक करण्यापूर्वी त्याबाबतची माहिती घेण्याचा प्रयत्न करा. सतर्कता बाळगा. तरच अशा धोकादायक व्हायरसपासून तुमचा स्मार्टफोन सुरक्षित राहू शकेल.

    First published:
    top videos

      Tags: Android, Malware, Smartphone