Airtel चा ग्राहकांना मोठा झटका! खूप महाग झाला स्वस्तातला प्लान, आता येणार जास्त बिल

Airtel चा ग्राहकांना मोठा झटका! खूप महाग झाला स्वस्तातला प्लान, आता येणार जास्त बिल

ग्राहकांसाठी ही नवीन किंमत योजनेवर लागू केली गेली आहे. एअरटेलच्या पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी नियमित आणि डेटा अ‍ॅड-ऑन देण्यात येत आहेत आणि या योजना महिन्याकाठी 749 रुपयांपासून सुरू होतात.

  • Share this:

मुंबई, 19 फेब्रुवारी : एअरटेलचे (Airtel) नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन हटवल्यानंतर कंपनीने ग्राहकांना आणखी एक धक्का दिला आहे. भारतीय एअरटेलने पोस्टपेडच्या अ‍ॅड-ऑन कनेक्शनमध्ये (airtel postpaid ad on connection) बदल केले आहेत. एअरटेल आपल्या पोस्टपेड वापरकर्त्यांना महिन्याकाठी 199 रुपये पासून अॅड-ऑन कनेक्शन देते पण आता एअरटेलने ही किंमत वाढवून 249 रुपये केली आहे.

ग्राहकांसाठी ही नवीन किंमत योजनेवर लागू केली गेली आहे. एअरटेलच्या पोस्टपेड वापरकर्त्यांसाठी नियमित आणि डेटा अ‍ॅड-ऑन देण्यात येत आहेत आणि या योजना महिन्याकाठी 749 रुपयांपासून सुरू होतात.

माहितीसाठी, एअरटेलने केवळ नियमित अ‍ॅड-ऑन योजनांची किंमत बदलली आहे. ही किंमत दरमहा 249 रुपयांपासून सुरू होईल. दुसरीकडे डेटा अ‍ॅड-ऑन कोणताही बदल न करता दरमहा 99 रुपये किंमतीने सुरू होते.

यासाठी दरमहा येईल बिल

या व्यतिरिक्त अ‍ॅड-ऑन कनेक्शनसाठी ग्राहकाला 18% जीएसटी देखील भरावा लागेल. म्हणजेच, ज्या ग्राहकाकडे अ‍ॅड-ऑन कनेक्शन आहे, त्याला दरमहा 499 249 18% जीएसटी भरावा लागेल.

ब्रॉडब्रँडमध्ये ही सुविधा उपलब्ध होणार नाही

यापूर्वी एअरटेल आपल्या ब्रॉडबँड योजनेसह नेटफ्लिक्स सबस्क्रिप्शन 3 महिन्यांसाठी देत होता, परंतु अलीकडेच एअरटेलने योजना बदलून नेटफ्लिक्सची ऑफर काढून टाकली आहे. तर एअरटेल योजनेमुळे ग्राहकांना अद्याप एका वर्षासाठी अॅमेझॉन प्राइमची सदस्यता दिली जात आहे, ज्याची किंमत 999 रुपये आहे.

इतर बातम्या - राजस्थान रॉयल्स संघाच्या स्टार खेळाडूच्या गाडीला भीषण अपघात

खरंतर एकेकाळी, देशातील वेगाने वाढणारा दूरसंचार उद्योग आता संकटात सापडला आहे. गेल्या आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाच्या कडक निषेधानंतर एजीआर (Adjusted Gross Revenue) वर कोर्टाच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. चालू आर्थिक वर्षात टेलिकॉम कंपन्यांना हजारो कोटींचे नुकसान सहन करावे लागत आहे. सोमवारी एअरटेलने 10 हजार कोटी जमा केले. व्होडाफोनने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, ते शुक्रवारपर्यंत 7 हजार कोटी रुपयांच्या रकमेपैकी निम्मे रक्कम देतील.

देशाच्या टेलिकॉम कंपन्या आज रस्त्यावर येताना दिसत आहेत. या कंपन्यांनी सरकारला थकित रक्कम परत करण्यासाठी सुरुवात केली आहे. परंतु या आठवड्याच्या सुरुवातीला सर्वोच्च न्यायालयाला सामोरे जावे लागले. एजीआरवरील निर्णयाची अंमलबजावणी करण्यास दिरंगाईबद्दल सर्वोच्च न्यायालयाने तीव्र नाराजी दर्शविली होती.

इतर बातम्या - पालिका निवडणुकीआधी भाजपला मोठा हादरा बसणार, 7 नगरसेवक बांधणार शिवबंधन

सोमवारी एअरटेलने एकूण 35,586 कोटी थकबाकीपैकी 10,000 कोटी रुपये जमा केले. एअरटेलने संचार मंत्रालयाला दिलेल्या पत्रात ही माहिती दिली. एअरटेल म्हणाले की, "24 ऑक्टोबर 2019 आणि 14 फेब्रुवारी 2020 च्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार भारती एअरटेल लिमिटेडने 9500 कोटी आणि भारती हेक्साकॉम लिमिटेडने 500 कोटी जमा केले आहेत. एअरटेलची उर्वरित रक्कम सुप्रीम कोर्टात पुढील सुनावणीपूर्वी परतफेड करेल.

इतर बातम्या - अमर सिंह यांची मृत्यूशी झुंज, अंथरुणाला खिळलेले असताना मागितली अमिताभ यांची माफी

First published: February 19, 2020, 9:56 AM IST

ताज्या बातम्या