नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी : आयपीएलच्या तेराव्या हंगामाला 29 मार्चपासून सुरुवात होणार आहे. मात्र त्याआधीच राजस्थान रॉयल्स संघाला मोठा धक्का बसला आहे. राजस्थान संघात असलेला वेस्ट इंडिजचा जलद गोलंदाज ओशेन थॉमस यांच्यात गाडीला मोठा अपघात झाला आहे. दोन दिवसांपूर्वी रात्री उशीरा हायवेवर ओशेनची गाडी पलटली. या अपघातात ओशेन थोडक्याच बचावला. दोन वाहनांच्या टक्करमध्ये ओशेन याच्या गाडीचा चक्काचूर झाला. वेस्ट इंडिजकडून क्रिकेट खेळणारा ओशेन आयपीएलमध्ये राजस्थान संघाकडून खेळतो. 2018मध्ये राजस्थानकडून ओशेनने आयपीएलमध्ये पदार्पण केले. त्यामुळं ओशेनच्या अपघातामुळे राजस्थान संघाच्या चिंता वाढल्या आहेत. वेस्ट इंडीज प्लेयर्स असोसिएशनने आपल्या निवेदनात, रविवारी रात्री उशीरा दोन वाहनांची धडक झाली. यात ओशेनच्या गाडीचा समावेश होता. अपघातानंतर त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जमैका ऑब्जर्व्हरने थॉमसच्या जवळच्या मित्रांना विचारले असता, त्याच्यावर उपचार व स्कॅन करून त्याला रुग्णालयातून सोडण्यात आले. वाचा- 50 दिवस चालणार IPLचा थरार! एका क्लिकवर पाहा 13व्या हंगामाचे संपूर्ण वेळापत्रक
West Indies fast bowler Oshane Thomas was involved in a motor accident on Sunday, but is now recovering at home.https://t.co/7ZgNRZhAGc
— ICC (@ICC) February 18, 2020
वाचा- ‘या’ 4 कारणांमुळे रोहितची मुंबई पलटन पुन्हा होणार IPLचे चॅम्पियन! वेस्ट इंडीज प्लेयर्स असोसिएशनने (डब्ल्यूआयपीए) एका अधिकृत निवेदनात म्हटले आहे की सेंट कॅथरीनमधील ओल्ड हार्बरजवळ हायवे 2000वर थॉमस हा दोन वाहनांच्या धडकेत सामील होता. डब्ल्यूआयपीएचे कार्यकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी ओशेनबद्दल सहानुभूती व्यक्त केली आहे. तसेच, आम्ही त्याच्या लवकर आरोग्य मिळावे अशी आमची इच्छा आहे, असे मत व्यक्त केले. वाचा- धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणार विराट आणि रोहित! ‘या’ दिवशी मुंबईत होणार सामना ओशेन स्वत: गाडी चालवत होता, त्यावेळी हा अपघात झाला. ओशेनच्या ऑडी गाडीचा या अपघातात चक्काचूर झाला. दरम्यान आयपीएलच्याआधी थॉमसचा अपघात झाल्यामुळं राजस्थान रॉयल्स संघाला मोठा झटका बसला आहे. थॉमसने 2018मध्ये भारताविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्यानं वेस्ट इंडिजकडून 20 एकदिवसीय तर 10 टी-20 सामने खेळले आहेत. यात त्यानं 36 आंतरराष्ट्रीय विकेट घेतल्या आहेत.

)







