Home /News /technology /

Airtel ग्राहकांना फटका, कंपनीने या प्लॅनसह मिळणाऱ्या सुविधेत केले मोठे बदल

Airtel ग्राहकांना फटका, कंपनीने या प्लॅनसह मिळणाऱ्या सुविधेत केले मोठे बदल

टेलिकॉम कंपनी एयरटेलने (Telecom Company Airtel) आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी काही बदल केले आहेत.

  नवी दिल्ली, 23 एप्रिल : टेलिकॉम कंपनी एयरटेलने (Telecom Company Airtel) आपल्या पोस्टपेड ग्राहकांसाठी काही बदल केले आहेत. अॅमेझॉन प्राइम मेंबरशिपच्या (Amazon Prime Membership) वॅलिडिटीमध्ये बदल करण्यात आले असून ही 1 वर्षावरुन कमी करुन 6 महिने करण्यात आली आहे. ही मेंबरशिप एयरटेलच्या 499 रुपये, 999 रुपये, 1199 रुपये, 1599 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनसह उपलब्ध (Airtel Postpaid Plan) आहे. एयरटेल आपल्या काही ब्रॉडबँड प्लॅन्ससह अॅमेझॉन प्राइम मेंबरशिप देतं. या बदलांचा ब्रॉडबँड प्लॅन्सवर कोणताही बदल होणार नाही. Airtel ने सांगितलं, की नवा प्लॅन 1 एप्रिलपासून लागू झाला आहे. म्हणजेच ज्यांनी 1 एप्रिल आधी एयरटेलचा हा प्लॅन घेतला होता त्यांची मेंबरशिप 1 वर्षापर्यंत सुरू राहिल. त्यानंतर मेंबरशिप वॅलिडिटी कमी होऊन 6 महिने करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे एयरटेलच्या या बदलानंतर आता इतर टेलिकॉम ऑपरेटरही आपल्या पोस्टपेड प्लॅन्समध्ये बदल करू शकतात. Amazon Prime Membership 1 वर्षावरुन 6 महिने केली असली, तरी डिज्नी प्लस हॉटस्टारचं सब्सक्रिप्शन अद्यापही एक वर्षासाठी आहे. त्याशिवाय या पोस्टपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना दररोज 100 SMS, देशात कोणत्याही नंबरवर अनलिमिटेड कॉल्सची सुविधा मिळते. 1599 रुपयांच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना नेटफ्लिक्सची सुविधाही मिळते.

  हे वाचा - Android Smartphone वापरता? आता करता येणार नाही हे महत्त्वाचं काम, Google चं मोठं पाऊल

  मागील वर्षी डिसेंबरमध्ये अॅमेझॉन प्राइमने आपली मेंबरशिप 50 टक्क्यांपर्यंत महाग केली होती. सध्या प्राइम मेंबरशिप 1 महिन्यासाठी 179 रुपयात, 4 महिन्यांसाठी 459 रुपयांत, आणि वर्षभरासाठी 1499 रुपयांत उपलब्ध आहे. भारती एयरटेलचे साउथ एशिया आणि इंडियाचे एमडी आणि सीईओ गोपाल विट्टल यांनी फेब्रुवारीमध्ये सांगितलं, की कंपनी यावर्षी आपले टॅरिफ प्लॅन महाग करणार आहे. परंतु सध्या 4-5 महिन्यांपर्यंत यात कोणताही बदल होणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Airtel, Amazon, Telecom companies, Telecom service

  पुढील बातम्या