मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी नो टेन्शन; आता WhatsApp वर असा बुक करा LPG Gas Cylinder

गॅस सिलेंडर बुक करण्यासाठी नो टेन्शन; आता WhatsApp वर असा बुक करा LPG Gas Cylinder

आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे एलपीजी गॅस सिलेंडरही (LPG Gas Cylinder) घरबसल्या ऑर्डर करता येणार आहे.

आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे एलपीजी गॅस सिलेंडरही (LPG Gas Cylinder) घरबसल्या ऑर्डर करता येणार आहे.

आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे एलपीजी गॅस सिलेंडरही (LPG Gas Cylinder) घरबसल्या ऑर्डर करता येणार आहे.

नवी दिल्ली, 4 एप्रिल : व्हॉट्सअ‍ॅप (WhatsApp) सर्वाधिक वापरलं जाणारं मेसेजिंग अ‍ॅप आहे. व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो, व्हिडीओ, फाईल्स आता व्हॉट्सअ‍ॅप पेदेखील सुरू झाल्याने अनेक गोष्टींच्या शेअरिंगची सुविधा मिळते. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे अनेक गोष्टी सोप्या झाल्या आहेत. आता व्हॉट्सअ‍ॅपद्वारे एलपीजी गॅस सिलेंडरही (LPG Gas Cylinder) घरबसल्या ऑर्डर करता येणार आहे.

Indane, HP आणि Bharatgas व्हॉट्सअ‍ॅपद्वारे बुक करता येऊ शकतो. यात कंपनीचा नंबर सेव्ह करुन LPG गॅस सिलेंडरचं बुकिंग करता येतं.

Indane युजर्सला या नंबरवर WhatsApp करावं लागेल -

जर तुम्ही Indane ग्राहक असाल, तर 7718955555 वर कॉल करुन सिलेंडर बुक करता येईल. व्हॉट्सअ‍ॅपद्वारे बुकिंग करताना युजर्सला त्यांच्या रजिस्टर्ड नंबरवरुन 7588888824 वर REFILL लिहून मेसेज करावा लागेल, त्यानंतर बुकिंगची माहिती मिळेल. त्याशिवाय SMS द्वारे बुकिंग करता येईल. यात तुमच्या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवर एक डिलिव्हरी ऑथेंटिकेशन कोड (DAC) मिळेल. हा मेसेज डिलिव्हरी पर्सनला दाखवून सिलेंडर मिळवता येतो.

HP Gas युजर्स -

HP Gas युजर्सला हा 9222201122 नंबर सेव्ह करावा लागेल. त्यानंतर नंबरचा चॅट बॉक्स ओपन करुन BOOK लिहून मेसेज करावा लागेल. यानंतर काही माहिती विचारली जाईल आणि तुमचा गॅस सिलेंडर बुक होईल.

(वाचा - आता डेबिट कार्डची गरज नाही,UPIद्वारे QR कोड स्कॅन करुन ATM मधून काढता येणार पैसे)

WhatsApp वरुन Bharatgas सिलेंडर असा बुक करा -

युजर्सला फोनमध्ये हा 1800224344 नंबर सेव्ह करावा लागेल. त्यानंतर व्हॉट्सअ‍ॅप ओपन करुन या नंबरवर BOOK किंवा 1 लिहून मेसेज करा. त्यानंतर सिलेंडर बुक होईल आणि व्हॉट्सअ‍ॅपवर कन्फर्मेशन मेसेज येईल. महत्त्वाची बाब म्हणजे रजिस्टर्ड मोबाईल नंबर वरुनच मेसेज करावा लागेल.

First published:

Tags: LPG Price, Whatsapp